भारत देशाची संपूर्ण माहिती India Information In Marathi

India Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो संपूर्ण जगामध्ये एक उल्लेखनीय राष्ट्र म्हणून गणला जाणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. भौगोलिक दृष्ट्या मध्यम असणारे हे राज्य आशियाच्या सर्वात दक्षिणेकडे वसलेले आहे. भारत २०११ च्या जनगणनेनुसार जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते, मात्र आज पहिल्या क्रमांकावर आलेले असेल. भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजे भारत हा देश चोहोबाजूंनी नैसर्गिकरित्या संरक्षित झालेला आहे. ज्यामध्ये उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि समुद्राचा द्वीपकल्पीय भाग याचा समावेश होतो. त्यामुळे भारताला नैसर्गिक आपत्तीपासून देखील संरक्षण प्राप्त होते.

India Information In Marathi

भारत देशाची संपूर्ण माहिती India Information In Marathi

मित्रांनो जागतिक पातळीवरील सर्वोच्च शिखर असणारे माउंट एवरेस्ट हे भारताच्या जवळच स्थित आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचे K 2  हे भारतामध्ये आहे. दक्षिण बाजूला बघितल्यास विशाल हिंदी महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर, आणि पश्चिम दिशेला अरबी समुद्र असे पाण्याने देखील तीन बाजूंनी वेढलेले आहे. भारतामधील बहुसंख्य लोक हिंदी भाषा बोलत असले तरी देखील भारतामध्ये अजूनही मान्यताप्राप्त सुमारे २२ इतर भाषा देखील बोलल्या जातात.

आजच्या भागामध्ये आपण भारत देशाविषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

नावभारत
प्रकारदेश
भौगोलिक स्थानआशिया खंडामध्ये
भारतीय राष्ट्रगीतजण गण मन
भारतीय राष्ट्रगानवंदे मातरम
स्वातंत्र्य दिन१५ ऑगस्ट
प्रजासत्ताक दिन२६ जानेवारी
राष्ट्रीय प्राणीवाघ
राष्ट्रीय पक्षीमोर
राष्ट्रीय फुलकमळ
राष्ट्रीय फळआंबा
राष्ट्रीय फळआंबा

मित्रांनो, दक्षिण आशियामधील एक राष्ट्र म्हणून भारताला ओळखले जाते. जो एक प्रजासत्ताक देश आहे. तसेच जगामधील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताला ओळखले जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातवा असला तरी देखील लोकसंख्येबाबतीत मात्र भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

भारताची ऐतिहासिक माहिती:

मित्रांनो, १६ व्या ते १७ व्या शतकापर्यंत भारत हा छोट्या छोट्या अनेक संस्थानांमध्ये आणि राज्यांमध्ये विभागलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून इंग्रजांनी भारतामध्ये सर्वप्रथम इसवी सन १६०० मध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर संपूर्ण भारताला हळूहळू त्यांनी ब्रिटिश वर्चस्वाखाली घेतले, आणि संपूर्ण भारत देश परतंत्र्यामध्ये गेला.

मात्र या विरुद्ध नागरिकांनी अनेक वेळा शांततेने तसेच सशस्त्र उठाव करून इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध आवाज उठविला. अशा रीतीने दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर १९४७ साली १५ ऑगस्ट या दिवशी भारत स्वतंत्र झाला.

मात्र यादरम्यान भारतीय उपखंडाचे भारत व पाकिस्तान अशा दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. मात्र स्वतंत्र भारताचा राजकारभार सुरळीत करता यावा, यासाठी भारतामध्ये राज्यघटना तयार करण्यात आली. ही राज्यघटना दिनांक २६ जानेवारी १९५० या दिवशी स्वीकारण्यात अर्थातच लागू करण्यात आली. आणि तेव्हापासून भारत हा प्रजासत्ताक देश झाला.

मात्र पुढील कारकीर्द भारतासाठी काही सोपी नव्हती, १९६२ आणि १९७१ या दोन वर्षी अनुक्रमे पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान या मुद्द्यांवर भारताला युद्धाला सामोरे जावे लागले. परिणामी १९७१ मध्ये बांगलादेश या स्वतंत्र देशाची स्थापना झाली. मात्र असे होऊन देखील अनेक निर्वासित बांगलादेशी भारतामध्ये स्थायिक झाल्याने भारतापुढे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. पुढे भारताने अनेक चढ उतार बघितले. ज्यामध्ये अनेक वेळा भारतामध्ये मंदीचे सावट देखील आले.

मात्र इतके सगळे होऊन देखील भारताने हार मानली नाही. आणि योग्य नेतृत्वाच्या मुळे भारत पुढे निघून गेला. आज भारत एक प्रगतिशील राष्ट्र असले, तरीदेखील भारताची अर्थव्यवस्था ही पहिल्या पाच मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. आज मीतिला भारतामध्ये भाजप या पक्षाची एकहाती सत्ता इसविसन २०१४ पासून आहे.

भारताचा भूप्रदेश:

मित्रांनो, भारत हा देश क्षेत्रफळानुसार सातव्या क्रमांकावर येतो. ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ३२ लाख ८७ हजार २६३ चौरस किलोमीटर इतके असून पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे २.४२ टक्के भाग हा भारत देश व्यापतो.

भारत देशाच्या विविध सीमा:

मित्रांनो, भारत हा देश क्षेत्रफळाने मोठा असल्यामुळे त्याच्या सीमा देखील खूप मोठ्या आहेत. भारत देशाला सुमारे पंधरा हजार दोनशे किलोमीटर लांबीची जमिनीची सीमा अर्थात भू सीमा लाभलेली आहे. तर पाण्याची सीमा म्हणाल तर ती सुमारे ८७१६ किलोमीटर इतकी लांब आहे.

मात्र यातील केवळ सहा हजार दोनशे किलोमीटर लांबीची सीमा ही भारताच्या मुख्य भूमीला लाभलेली आहे, उर्वरित सीमा बेटांची आहे. भारताची एकूण लांबी व रुंदी बघाल तर उत्तर दक्षिण ही लांबी सुमारे ३२१४ किलोमीटर लांब, तर पूर्व पश्चिम रुंदी सुमारे २९३३ किलोमीटर एवढी लांब आहे.

भारत देशाच्या सीमांवर सात राष्ट्र येतात, ज्यामध्ये चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, व अफगाणिस्तान इत्यादी देशांचा समावेश होतो.

मित्रांनो, भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा ५१/२ तासाने पुढे असून, ती अलाहाबाद या ठिकाणावरून निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच भारताला तिरंगा हा राष्ट्रध्वज असून, त्याची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर ३:२ असे असते. आणि त्यामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा इत्यादी रंग असतात.

भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे अशोक स्तंभाचे असून ते सारसनाथ येथील स्तंभावरून घेण्यात आलेले आहे. ज्यामध्ये चार दिशेला चार सिंह असून समोरून बघितल्यास मात्र त्यातील तीनच सिंह दिसतात. आणि चौथा सिंह हा पाठीमागील बाजूस असतो. तसेच भारताने जनगणमन या रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारे लिहिलेल्या गीताला भारताच्या राष्ट्रगीताचा दर्जा दिलेला असून, त्याला गाण्यासाठीचा वेळ हा ५२ सेकंद इतका आहे. याच बरोबरीने बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताला भारताच्या राष्ट्रगानचा दर्जा देण्यात आलेला आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भारत या आपल्या स्वदेशाबद्दल माहिती पाहिली. या माहितीमध्ये तुम्ही भारत देशाविषयी महत्त्वपूर्ण माहितीसह, ऐतिहासिक माहिती, तसेच भारताचा भौगोलिक प्रदेश, सागरी आणि जमिनीच्या सीमा, तसेच आजूबाजूचे देश, प्रमाणवेळ, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, भाषा, प्राणी, पक्षी, यांच्या विषयी इत्यंभूत माहिती बघितलेली आहे.

या माहितीमध्ये तुम्हाला भारताविषयी बरीच असलेली माहिती देखील वाचायला मिळाली असेल. मात्र सोबतच नवीन माहिती देखील वाचली असेल. भारत हा एक मोठा देश असून, या आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. तसेच राज्यानुसार अनेक प्रकारची विविधता आढळून येते. मात्र असे असले तरी भारतातील सर्व लोक मिळून मिसळून राहतात. त्यामुळे विविधतेमध्ये एकता असणारा आपला हा भारत देश जगामध्ये ओळखला जातो.

FAQ

भारताला देण्यात आलेली विविध नावे कोणती आहेत?

मित्रांनो, भारताला भारत, इंडिया, आणि हिंदुस्तान अशी नाव देण्यात आलेली आहेत.

भारताला मिळालेल्या विविध नावांचा इतिहास काय आहे?

मित्रांनो भारत देशाला भारत हे नाव राजा भरत याच्यावरून पडले असे मानण्यात येते. तसेच सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यात वसलेला देश म्हणून हिंदुस्तान, तर याच सिंधू संस्कृतीला इंग्लिश मध्ये इंडस सिव्हिलायझेशन म्हणत होते त्यावरून इंडिया अशी नावे पडलेली आहेत.

भारताचे राष्ट्रीय प्राणी व पक्षी कोणकोणते आहेत?

भारताचा राष्ट्रीय प्राणी रॉयल बेंगाल टायगर, तर राष्ट्रीय पक्षी भारतीय मोर हे आहेत.

भारताचे राष्ट्रीय फूल व राष्ट्रीय फळ कोणकोणते आहेत?

भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ तर राष्ट्रीय फळ हे आंबा आहे.

भारताचे राष्ट्रगीत व राष्ट्रगान कोण कोणते आहे?

भारताचे राष्ट्रगीत जनगणमन, तर राष्ट्रगान वंदे मातरम हे आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आपल्या स्वतःच्या भारत या देशाविषयी माहिती पाहिली. ही माहिती प्रत्येक भारतीयाला नक्कीच आवडली असेल, तर आपल्या इतरही भारतीय बंधु भगिनींना ही माहिती अवश्य शेअर करा. तसेच परदेशात राहून भारताची आठवण काढणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती पाठवा.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment