आय सी आय सी आय बँकची संपूर्ण माहिती ICICI Bank Information In Marathi

ICICI Bank Information In Marathi नमस्कार मित्रांनो, बँक म्हटलं की आपल्याला केवळ पैसा काढणे व जमा करणे इतकेच आठवते. मात्र त्याहूनही मोठ्या प्रमाणावर बँकेचे कार्य असते. आय सी आय सी आय हे देखील एक भारतातील सर्वात मोठ्या बँकांमधील एक बँक आहे. आर्थिक सेवांमध्ये ही बँक सर्वात अग्रेसर असून, तुम्ही या शाखेमध्ये बँकिंग व्यवहार किंवा बिगर बँकिंग व्यवहार देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँके विषयी माहिती असली पाहिजे. म्हणूनच आज आपण आयसीआयसीआय या बँकेची माहिती बघणार आहोत…

ICICI Bank Information In Marathi
ICICI Bank Information In Marathi

आय सी आय सी आय बँकची संपूर्ण माहिती ICICI Bank Information In Marathi

नावआय सी आय सी आय
प्रकारबँक
कार्यग्राहकांना वित्तीय व आर्थिक सेवा पुरवणे
सध्याचे सी ई ओसंदीप बक्षी (१५ ऑक्टोबर २०१८ पासून)
हेड क्वार्टरवडोदरा, गुजरात
प्रथम शाखा वडोदरा, गुजरात
स्थापनाइसविसन १९९४
संस्थापकICICI अर्थात इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
सध्याचे भागभांडवल१३०० कोटी अमेरिकी डॉलर्स
शेअर मार्केट लिस्टड आहे काहोय

मित्रांनो, आयसीआयसीआय बँकेचे संपूर्ण नाव इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे असून, तिची स्थापना १९९४ यावर्षी झाली होती. आयसीआयसीआय बँकेला भारतीय भांडवली बाजारातील जलसंधारणाचा क्षण म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. आज मितीला ९१ अब्ज निव्वळ संपत्ती असण्याबरोबरच आयसीआयसीआय बँक ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे.

आयसीआयसीआय बँकेची स्थापना:

मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये आयसीआयसीआय चे नाव घेतले जाते. पूर्वी ही एक वित्तीय सेवा कंपनी होती, जिला १९९४ मध्ये बँकेचे स्वरूप देण्यात आले. बाजार मूल्य बघितले तर ही खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक म्हणून उदयास येते.

भारतासह अनेक देशांमध्ये देखील तिचा कारभार असून, तब्बल १९ देशांमध्ये ही कार्य करत आहे. अनेक शाखा व एटीएम असण्याबरोबरच संपूर्ण भारतभर ग्राहक सेवा केंद्रांची देखील रेलचेल आहे. ज्याद्वारे किरकोळ ग्राहकांना अनेक सेवा पुरवल्या जातात. यामध्ये गुंतवणूक, बँकिंग, इन्शुरन्स, वेंचर कॅपिटल, असेट मॅनेजमेंट इत्यादी सर्व प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात.

ही बँक भारतीय शेअर बाजारांमध्ये लिस्ट झालेली असून, बी एस ई आणि एन एस ई या दोन्ही ठिकाणी या बँकेच्या व्यवहारांमध्ये व्यापार केला जातो. यासोबतच ही बँक अमेरिकन डिपॉझिटरी रिसेट ची विक्री एन वाय एस इ अर्थात न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज इथे देखील करत असते.

या बँकेबद्दल सांगायचे झाल्यास इसवी सन २००० या वर्षी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज वर सुमारे पाच लाख अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्स लिस्ट करणारी ही भारतातील पहिलीच बँक बनली होती. श्री ए रामास्वामी मुदलियार हे या बँकेचे सर्वात पहिले अध्यक्ष होते. या बँकेचे मुख्यालय आणि नोंदणीकृत कार्यालय वडोदरा गुजरात येथे असले, तरी देखील मुंबई महाराष्ट्र येथील शाखेतूनच हिचा मोठा व्यवहार चालत असतो.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आयसीआयसीआय बँकेचे योगदान:

मित्रांनो, कुठल्याही देशाचा आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक विकास व्हायचा असेल तर पैसा हा हवाच असतो. आणि या पैशांमध्ये वित्तीय संस्था फार मोठ्या प्रमाणावर भूमिका बजावत असतात. तसेच या आयसीआयसीआय बँकेने देखील भारताच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. लाखो लोकांच्या ठेवी स्वीकारून त्यांना आर्थिक साक्षर करण्यास आयसीआयसीआय बँक यांचा मोठा वाटा आहे.

या बँकेने मोबाईल बँकिंग व नेट बँकिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारताच्या तांत्रिक प्रगतीत देखील हातभार लावलेला आहे. जेणेकरून अनेक ग्राहक संगणक साक्षर होण्यास मदत झाली, कारण सर्वात प्रथम या तंत्रज्ञानाचा वापर आयसीआयसीआय याच बँकेने केला होता.

आयसीआयसीआय बँक नेहमीच पर्यावरण संवर्धनाला पाठिंबा देत आलेली आहे, त्यामुळे भारताच्या नैसर्गिक आणि पर्यावरणीय विकासाला देखील आयसीआयसीआय बँक हातभार लावते असे म्हणावे लागेल.

जगप्रसिद्ध डब्ल्यू डब्ल्यू एफ यांच्या द्वारे देण्यात येणारा इको बँक पुरस्कार इसवी सन २०१२ या वर्षी या बँकेने फटकावला होता. हा असा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच भारतीय बँक ठरली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचा विक्रम देखील याच बँकेने केलेला आहे.

आयसीआयसीआय बँकेद्वारे ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सेवा:

मित्रांनो एक वित्तीय संस्था असण्याबरोबरच आयसीआयसीआय बँक ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवते. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आणि बिजनेस कार्ड या प्रकारची कार्ड वाटप करणे, तसेच शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड वितरित करणे, विविध प्रकारचे कर्ज देणे, कर गोळा करणे, विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना सादर करून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, विविध प्रकारच्या विम्यामध्ये ग्राहकांचे डिपॉझिट करून त्यांना विमा कवच पुरविणे, तसेच एफ डी आणि आरडी यांसारख्या ठेवी स्वीकारून ग्राहकांच्या भविष्याचा ठेवा जपून ठेवणे इत्यादी कार्य करते.

निष्कर्ष:

पैसा ठेवायचा म्हटलं की एखादी सुरक्षित वित्तीय संस्था शोधावी लागते, कारण हल्ली अनेक घोटाळ्यांचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामध्ये अनेक रिप्यूटेड संस्थांचा देखील समावेश होत आहे. त्यामुळे त्या सदर संस्थेची योग्य रीतीने माहिती घेऊनच त्यामध्ये आपल्या आयुष्यभराची जमापुंजी ठेवली पाहिजे. मित्रांनो, आज आपण एका वित्तीय संस्थेबद्दल अर्थात आयसीआयसीआय या बँकेबद्दल माहिती घेतलेली आहे.

मित्रांनो या माहितीमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी वाचायला मिळाले असतील. ज्यामध्ये आयसीआयसीआय बँक नेमके काय आहे, तिची स्थापना कधी झाली, तिचा इतिहास काय आहे?, इतर कोणत्या देशांमध्ये ही बँक कार्य करत आहे का?, तिचा फुल फॉर्म काय होतो, या बरोबरीनेच त्याचा अर्थ देखील काय होतो, भारताच्या अर्थव्यवस्थेला या बँकेने कशाप्रकारे योगदान दिलेले आहे, त्या बँकेचे सध्याचे मालक कोण व अध्यक्ष कोण आहेत, तिचे मुख्यालय, तिच्याबद्दल काही वाद आहे का, तसेच तिच्याबद्दलच्या मनोरंजक तथ्यांबद्दलची माहिती घेतली.

FAQ

आयसीआयसीआय ही बँक सरकारी क्षेत्रातील आहे की खाजगी क्षेत्रातील?

आयसीआयसीआय बँक खाजगी क्षेत्रातील एक सर्वोच्च बँक असून, तिची एकत्रित मालमत्ता १४.७६ ट्रिलियन पेक्षाही जास्त आहे. या बँकेने सद्यस्थितीत संपूर्ण भारतभर १३३४३ एटीएम व ५४१८ बँक शाखा उभारलेल्या आहेत.

आयसीआयसीआय बँकेत खाते काढण्यासाठी काही किमान शिल्लक रकमेची मर्यादा आहे का?

होय, आयसीआयसीआय बँकेमध्ये खाते सुरू करायचे असेल तर बचत खाता करिता मेट्रो शहर किंवा शहरी भागात किमान दहा हजार रुपये खात्यामध्ये शिल्लक असणे आवश्यक असते. त्याचबरोबर निमशहरी भागात पाच हजार तर ग्रामीण भागात दोन हजार रुपये शिल्लक रक्कम ठेवावी लागते.

आयसीआयसीआय बँकेमध्ये सुरुवातीस नोकरी करणाऱ्यांना किती पगार दिला जातो?

आय सी आय सी आय या बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या बिगर अनुभवी व्यक्तींसाठी प्रति वर्ष एक ते दीड लाख रुपये पगार दिला जातो. तसेच शून्य ते एक वर्षापर्यंत अनुभव असणाऱ्या लोकांसाठी वार्षिक अडीच लाखांपर्यंत पगार दिला जातो, मात्र अनुभव आणि वयानुसार या पगारामध्ये झपाट्याने वाढ होत असते.

आयसीआयसीआय बँके बद्दल काय सांगता येईल?

मित्रांनो, आयसीआयसीआय ही खाजगी क्षेत्रातील एक सर्वोच्च बँक असून, तिची स्थापना १९९४ या वर्षी झाली होती, आणि सद्यस्थितीमध्ये सर्वात मोठ्या बँकेमध्ये या बँकेचा तिसरा क्रमांक लागतो.

आयसीआयसीआय या बँकेचे भारतासह इतर कोणत्या देशांमध्ये कार्य चालते?

आयसीआयसीआय बँकेचे सिंगापूर, हॉंगकॉंग, बहारीन, श्रीलंका, कतार, युनायटेड स्टेट्स, दुबई, ओमान, चीन, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, बांगलादेश व इंडोनेशिया इत्यादी विविध देशांमध्ये कार्य चालते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आयसीआयसीआय या बँकेविषयी माहिती बघितली. मित्रांनो तुम्हाला आजपर्यंत आयसीआयसीआय या शब्दाचा फुल फॉर्म माहिती होता का? अगदी पटापट कमेंट मध्ये उत्तर येऊ द्या. आणि सोबतच या माहितीला मोठ्या प्रमाणावर शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment