कुळीद धान्याची संपूर्ण माहिती Horse Gram Information In Marathi

Horse Gram Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो कुळीद किंवा हुलगे ज्याला इंग्रजी मध्ये हॉर्स ग्राम असे म्हटले जाते ते एक कडधान्य वर्गीय पीक आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतात मुख्य आहार म्हणून वापरले जाणारे हे कुळीद आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते.

Horse Gram Information In Marathi

कुळीद धान्याची संपूर्ण माहिती Horse Gram Information In Marathi

असंख्य पोषक तत्त्वांनी भरपूर असणाऱ्या या कुळीथ अर्थात सुपरफुडमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन्स आणि लोह याचबरोबर अगणित असे खनिज द्रव्य असतात. त्यामुळे ते मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. या कुळीदापासून बनविलेले शिंगोळे किंवा कढण आमटी सर्वांच्याच अतिशय आवडीची असते.

चवदार असणारे हे हुलगे किंवा कुळीद अतिशय आरोग्यदायी देखील आहेत. याचा रस्सा पिल्यामुळे सर्दी झटकन दूर होते, तसेच मुतखड्याच्या रुग्णांसाठी देखील हे कुळीद अतिशय फायदेशीर मानले जाते. आजच्या भागामध्ये आपण या कुळीदाबद्दल माहिती बघणार आहोत…

नावकुळीद
वैज्ञानिक नावमॅक्रोटाईलोमा युनिफ्लोरम
प्रकारकडधान्य वर्गीय खाद्य
उपप्रकारडाळवर्गीय
उपलब्ध घटकप्रथिने
वापरपीठ करून/शिजवून/भाजी करून

मित्रांनो, कुळीथ हा एक प्रकारचा कडधान्य असून, त्याचे वैज्ञानिक नाव मॅक्रोटाईलोमा युनिफ्लोरम असे आहे. एका खाद्य प्रकारापेक्षा कुळीद हे औषधी वापरासाठीच जास्त वापरले जाते. रंगाने गडद तपकिरी आणि मसूरच्या आकाराचा असणारा हा कुळीद दक्षिण भारतातील लोकांचा अतिशय आवडीचा आहे.

ते कुळीदाला डाळ करून अनेक खाद्य प्रकारात वापरतात. हा कुळीद दक्षिणेतील कर्नाटक, रस्सम, आंध्रा, आणि तामिळनाडू सोबतच उर्वरित भारतातील ओडीसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश इत्यादी ठिकाणीही या कुळीथाचे पीक घेतले जाते.

कुळीदाचे आरोग्यदायी फायदे:

मित्रांनो, कुळीद डाळ ही सर्दीवर अतिशय फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि कुठल्याही रोगाची प्राथमिक लागन होणे म्हणजे सर्दी व ताप हे लक्षणे दिसणे होय. आयुर्वेदामध्ये सर्दी, खोकला, ताप, दमा यांसाठी कुळीदाच्या डाळीचा रस्सा अर्थात सूप घेणे सांगितलेले आहे.

नाक आणि छाती बंद झाल्यास कुळीथ डाळीचे सूप अतिशय फायदेशीर ठरते. हे सूप श्लेष्मल प्रकारचे असते त्यामुळे आतील बाजूची त्वचा मऊ होऊन सर्दी वितळण्यास आणि नाक मोकळे होण्यास मदत होते. त्यामुळे श्वासउच्छ्वास करण्यास देखील सोयीचे होते. सोबतच कुळीदडाळीमुळे शरीरातील चयाचय क्रिया वाढल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील तयार होते.

पचनशक्ती सुधारणेमध्ये देखील कुळीथाचा अतिशय चांगला उपयोग केला जातो. अनेक प्रकारचे विषाणू आणि जिवाणू यांच्याविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी सुद्धा या कुळद डाळीचा उपयोग केला जातो. ज्यांना आम्लपित्त किंवा ऍसिडिटी हा त्रास असेल तर त्याचा संबंध अपचनाशी असतो. अशावेळी कुळीद डाळीने आराम पडतो.

या कुळीद दाळीमध्ये जी इ आर डी आणि ऍसिड रिफ्लेक्स या दोन्ही गोष्टींवर उपचार करण्याची ताकद आहे. त्यासाठी सकाळी सकाळी कुळीत डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. आतड्यांमधील कृमी काढणे, गॅसेस आणि अपचन दूर करणे, हे कुळीद डाळीचे गुणधर्म आहेत.

आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे आपल्या वजनाकडे लक्ष राहिलेले नाही, त्यामुळे लठ्ठपणा ही समस्या सर्वत्र आढळून येत आहे. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की कुठल्याही प्रकारची डाळ खाल्ली तरी आपले शरीर अतिशय सुडौल आणि चांगले राहू शकते.

आपल्याला वजन कमी करायचे असेल तर जिऱ्याची पावडर आणि कुळीथाचे पीठ एकत्र करून ते पाण्यामध्ये मिसळावे, आणि रोज दिवसातून दोन वेळेस प्रत्येकी एक ग्लास रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे आपले वजन तर कमी होईलच, मात्र आपली मसल्स बिल्डप होण्यासाठी देखील मदत मिळेल. शरीराचे वजन वाढण्यामागे मेद म्हणजेच चरबी व कफ या दोन गोष्टी कारणीभूत असतात. मात्र या दोन्ही घटकांना शरीरातून बाहेर काढण्याचे काम करतो. त्यामुळे आपोआपच वजन कमी होण्यास मदत मिळते.

मधुमेह हा आजकाल सर्वत्र आढळून येतो, आजकाल प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी मधुमेहाचा रुग्ण आहेच. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार गावरान प्रकारची कुळीद पीठ करून घेतल्याने ते मधुमेहावर अतिशय गुणकारी ठरते. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते.

तसेच कार्बोहायड्रेटचे पचन नियंत्रित करण्यासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या सर्व गुणधर्मामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कुळीद डाळ ही एक वरदान ठरली आहे. तसेच टाईप टू मधुमेही रुग्णांसाठी कुळीद आणि मसूर एकत्र घेतल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत मिळते.

कुळीद डाळ खाण्याचे तोटे:

मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचे फायदे असले तरी अति तेथे माती या उक्तीनुसार कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की तिचे तोटे समोर येतात. तसेच कुळीद डाळीचे देखील काही तोटे आहेत. प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यदायी ठरणारे हे कुळीद जास्त प्रमाणात खाल्ल्यास मात्र आरोग्याला हानिकारक ठरते. यामुळे नाकातून रक्त येणे, मासिक पाळी जास्त वेळा येणे, पाळीच्या वेळी अति रक्तस्त्राव होणे इत्यादी तोटे होऊ शकतात.

ज्या लोकांना ॲनिमिया आहे आणि त्यासाठी त्यांचे औषध उपचार सुरू आहेत अशा रुग्णांनी देखील कुळीद न खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच क्षयरोग, वंध्यत्वावर उपचार घेत असलेले पुरुष अथवा स्त्री यांच्यासाठी सुद्धा कुळीद डाळ व्यर्ज सांगितलेली आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारतीय खाद्य संस्कृती ही अतिशय समृद्ध अशी आहे. भारतीय लोक विविध प्रकारचे अन्न चवीने खातात. भारतामध्ये शाकाहारी अन्नाचेच इतके प्रकार आहेत की रोज नवीन अन्न खाल्ले तर पुन्हा रिपीट होणारे अन्न मागे केव्हा खाल्ले होते हे देखील लक्षात राहणार नाही.

कुळीद हे अतिशय आरोग्यदायी कडधान्य आहे. कडधान्य असल्यामुळे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रथिने आढळतात. तसेच इतर खनिज द्रव्य देखील आढळतात. कुळीद हे अनेक आजारावर देखील औषध म्हणून वापरले जाते. शेंगोळी केल्यानंतर त्याचा गरम गरम रस्सा पिल्यामुळे कितीही जुनी सर्दी क्षणात नाहीशी झाल्याशिवाय राहत नाही. तसेच या कुळीथाचे पाणी आठ दिवस उकळून पिल्यामुळे मुतखड्यापासून आराम मिळू शकतो. अशा या बहुपयोगी कुळीदाबद्दल आज आपण माहिती पाहिली.

kulith | कुळीथ (हुलगे) खाण्याचे फायदे | horse gram benefits | by Neha K. | Marathi |

For Healthy Shopping follow us on Amazon - https://www.amazon.in/shop/justforheartsTo Purchase - https://amzn.to/3ZjSaEbTo Chat with Neha about this - Whatsa...

FAQ

कुळीद हे कोण कोणत्या आजारावर उपयुक्त समजले जाते?

कुळीद हे सर्दी आणि मुतखडा या दोन आजारांवर अतिशय गुणकारी आहे. सर्दी साठी कुळीथाचे सूप करून पिणे आणि मुतखड्यासाठी कुळीद उकळून त्याचे पाणी पिणे व थोडेसे चावून खाणे असा उपचार सांगितला जातो.

कुळीद हा कशा पद्धतीने पिकविला जातो?

कुळीद हा वेलवर्गीय झुडूप प्रकारचा असतो, त्याला इतर पिकांप्रमाणेच पेरून उगविले जाते.

कुळीद कसा ओळखावा?

कुळीद हा लिंबाच्या बी इतक्या आकाराचा आणि चपटा असतो. तसेच त्याचा रंग हा पांढरट तपकिरी असा असतो. या गुणधर्मावरून तुम्ही कुळीद ओळखू शकता.

बद्धकोष्ठतेवर कुळीद गुणकारी आहे का?

होय, बद्धकोष्ठतेवर कुळीद अतिशय गुणकारी आहे, कारण कुळीद मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायबर्स असल्याने ते सहजरित्या पोट साफ करते.

मधुमेह व कुळीद यांचे काय संबंध आहे?

मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनी असा शोध लावलेला आहे की कुळीद डाळीमध्ये मधुमेहविरोधी घटक देखील असतात, त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी कुळीद हा संजीवनीच ठरत असतो.

 मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कुळीद या कडधान्य वर्गीय अन्नाबद्दल माहिती पाहिली. ती माहिती तुम्हाला नक्कीच ज्ञानवर्धक ठरली असेल, त्यामुळे आपल्या मित्र-मैत्रिणींचेही ज्ञानवर्धन करण्यासाठी ही माहिती त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि या माहितीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये अवश्य कळवा.

धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment