हॉकी खेळाची संपूर्ण माहिती Hockey Game Information In Marathi

Hockey Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणजेच हॉकी हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. या खेळास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम मेजर ध्यानचंद यांनी केले. हॉकीचा पहिला सामना भारतातील कलकत्ता या शहरांमध्ये झाला असे सांगितले जाते. भारताने अगदी ऑलम्पिक स्पर्धांमध्ये देखील सलग सामने जिंकत सहा सुवर्णपदकांचा मानकरी ठरत एक वेगळा इतिहास रचला आहे.

हॉकी खेळाची संपूर्ण माहिती Hockey Game Information In Marathi

मित्रांनो बऱ्याच नियमांच्या आधारे खेळला जाणारा हा खेळ एक सांघिक प्रकारचा असून, ज्यामध्ये दोन संघ सहभागी होतात. खेळण्यासाठी आणि बघणाऱ्यासाठी ही खूपच मनोरंजक असणारा हा खेळ भारतासह अन्य देशांमध्ये देखील मोठ्या उत्साहात खेळला जातो.

आजच्या भागामध्ये आपण हॉकी या भारताच्या राष्ट्रीय खेळाबद्दल माहिती बघणार आहोत.

खेळाचे नाव: हॉकी
इंग्रजी नाव: Hockey
प्रकार: मैदानी
उपप्रकार: सांघिक
संघांची संख्या: दोन
एका सामन्याचा वेळ: ७० मिनिटे
आवश्यक साधने: खालून वळविलेली हॉकी बॅट, आणि हॉकी बॉल

हॉकी या खेळाच्या उगमाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात, कोणाच्या मते हा खेळ सर्वप्रथम फ्रान्स देशात सुमारे पाचशे वर्षांपूर्वी खेळला गेला, तर इतरांच्या मते हा खेळ ७०० वर्षे जुना असून सर्वप्रथम हा खेळ आयर्लंडमध्ये खेळला गेला होता. जिथे त्याला होर्लिंग या नावाने ओळखले जाई. आजचा आत्याधुनिक रीतीने खेळला जाणारा हॉकीचा पहिला सामना हा इंग्लंड मध्ये खेळला गेल्याचे नोंदी आढळतात.

सर्वप्रथम १८४० साली इंग्लंडमध्ये हॉकी संघटनेची ची स्थापना करण्यात आली होती. भारताबद्दल म्हणाल तर इंग्रजांनी १९०५ मध्ये हॉकी हा खेळ भारतामध्ये आणला, आणि तो इथे इतका लोकप्रिय झाला की तो भारताचा राष्ट्रीय खेळच होऊन गेला. भारतामध्ये सर्वप्रथम कलकत्ता येथे १९०५ साली हॉकीचा पहिला सामना खेळण्यात आला.

भारतीयांना हॉकी हा खेळ इतका आवडला की, १९२६ मध्ये न्युझीलँड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने २१ पैकी तब्बल १८ सामने जिंकले होते. आणि त्यातील दोन सामने अनिर्णित राहिले होते, म्हणजे केवळ एकच सामना भारतीय संघाने हरला होता. यावरून भारतीय आणि हॉकी यांचे घट्ट नाते समजून येते. यावेळी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंमध्ये मेजर ध्यानचंद यांचा देखील समावेश होता.

महिला हॉकीची माहिती:

मित्रांनो, जसा भारतामध्ये हॉकी हा खेळ लोकप्रिय झाला तसेच महिलांमध्ये देखील या खेळाचे वारे पसरले. राणी विक्टोरिया यांच्या काळात महिलांना कुठल्याही खेळामध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात येत नसे, त्या काळात देखील महिला हॉकी अतिशय लोकप्रिय झाली. इसवी सन १८९५ पासून हॉकीचा महिला संघ नियमितरीत्या खेळ खेळू लागला, मात्र तरीही १९७० पर्यंत महिला हॉकीच्या अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जात नव्हत्या.

सर्वप्रथम इसवी सन १९७४ मध्ये महिला हॉकी विश्वचषक खेळला गेला, आणि १९८० मध्ये महिला हॉकी या खेळ प्रकाराचा समावेश ऑलिंपिक मध्ये सुद्धा करण्यात आला. ज्यामुळे महिला हॉकीला अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. असे असले तरी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला हॉकी संघटना इसवी सन १९२७ मध्येच स्थापन करण्यात आली होती.

हॉकी खेळा संदर्भातील मोजमापे:

मित्रांनो हॉकी या खेळाच्या संघामध्ये एकूण ११ खेळाडू असतात त्यातील पाच खेळाडू हे अतिरिक्त असतात तर केवळ सहाच खेळाडू खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतात. हॉकीचे मैदान हे सुमारे १०० यार्ड लांब आणि ६० यार्ड रुंद असते. या खेळाच्या सामना तब्बल सत्तर मिनिटे चालतो. ज्यापैकी एक डावाला ३५ मिनिटे मिळतात. तसेच दोन डावांच्या मध्ये पाच ते दहा मिनिटांचा मध्यंतर वेळ देखील दिला जातो.

चेंडू बद्दल बोलायचे झाल्यास सुमारे आठ ते नऊ इंच घेर असणारा हा चेंडू वजनाने पाच औंस इतका असतो. हॉकीच्या बॅटला हॉकी स्टिक असे म्हटले जाते, ज्यामध्ये महिला आणि पुरुष यांच्या हॉकी स्टिकचे वजन वेगवेगळे असते. महिलांची हॉकी स्टिक ही २३ औंस वजनाची तर पुरुषांची हॉकी स्टिक ही २८ औंस वजनाची असते. या खेळामध्ये सात यार्ड अंतरावर पेनल्टी स्ट्रोक असतो. या खेळात एक रेक्टरी आणि एक अंपायर असे दोन अधिकारी असतात.

हॉकी खेळाचे प्रकार:

मित्रांनो हॉकी लोकप्रिय आहे तसेच हॉकीचे वेगवेगळे प्रकार देखील पडलेले आहेत. आणि ते देखील सर्वत्र लोकप्रिय आहेत.

मित्रांनो, हॉकीमध्ये बंडी हॉकी, रोलर हॉकी, फिल्ड हॉकी, आईस हॉकी, अंडरवॉटर हॉकी इत्यादी वेगवेगळे प्रकार पडतात. हे सर्व प्रकार सर्वत्र लोकप्रिय आहेत. आणि हॉकी कुठे खेळली जाते, त्यात किती खेळाडू असतात, त्याचे नियम काय असतात, बॉल कोणत्या प्रकारचा आणि कसा असतो, हॉकी स्टिक कशी असते, किती डाव खेळले जातात आणि सामना किती कालावधीसाठी चालतो या विविध घटकांवर आधारित हे प्रकार पडलेले असतात.

हॉकी खेळाचे काही सर्वसाधारण नियम:

  • हॉकी या खेळामध्ये दोन संघ असावे, त्यातील प्रत्येक संघाकडे किमान ११ खेळाडू असतील. ज्यापैकी पाच खेळाडू अतिरिक्त एक खेळाडू कॅप्टन आणि एक खेळाडू गोलकीपर असेल.
  • एक सामना ७० मिनिटे चालेल ज्यामध्ये ३५-३५ मिनिटाचे दोन डाव असतील.
  • जर खेळ खेळताना गोलकीपर अथवा खेळाडू यांच्या कपड्यात किंवा पॅड मध्ये चेंडू अडकल्यास तेथे बुली बनवली जाते, आणि तिथून पुन्हा खेळ सुरू केला जातो.
  • हॉकी खेळामध्ये चेंडूला हात लावण्याची परवानगी नसते, असे केल्यास तो फॉल समजला जातो.
  • जर हॉकी स्टिक नसेल तर रोलिंग किंवा चेंडू फेकणे या गोष्टी प्रतिबंधित केल्या जातात.
  • खेळाडूच्या वर्तनानुसार खेळाडूला वेगवेगळे कार्ड दाखवले जातात, त्यामध्ये हिरवे, पिवळे आणि लाल रंगाच्या कार्ड्स चा समावेश होतो. हिरवा कार्ड हॉकी खेळताना नियम मोडू नये याबद्दलचा इशारा असतो, तर पिवळे कार्ड म्हणजे खेळाडूला पाच मिनिटे खेळपट्टीवरून हद्दपार केले जाते. आणि लाल कार्ड हे खेळाडूंनी गंभीर गैरवर्तन किंवा गुन्हा केला तर त्यासाठी दाखवले जाते.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी खेळाला जगभरात ओळख मिळवून देण्याचे काम मेजर ध्यानचंद या व्यक्तीने केले, म्हणूनच त्यांना हॉकीचा जादूगर असे म्हटले जाते. आज-काल सर्व तरुणाई मध्ये क्रिकेटचे वेड इतके आहे की त्यांना इतर खेळ खेळायला वेळच मिळत नाही. मात्र इतर खेळांना आपणच पुढे घेऊन गेले पाहिजे, त्यासाठी क्रिकेट नक्कीच खेळा मात्र सोबतच हॉकी सारख्या भारतीय खेळांना सुद्धा महत्त्व द्या.

Basic Rules of Hockey in Hindi | Hockey Ground Measurement

This video is about rules and dimension of hockey game.In this video you learn about hockey ground measurement and hockey goal post dimension and ball siz...

FAQ

हॉकी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

हॉकी हा भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांचा राष्ट्रीय खेळ आहे.

हॉकी कोणत्या प्रकारातील खेळ आहे?

हॉकी हा सांघिक प्रकारातील एक मैदानी खेळ आहे.

हॉकीचा एक सामना किती मिनिटे चालतो?

हॉकीचा एक सामना ७० मिनिटे चालतो.

हॉकीचा जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते?

हॉकीचा जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते.

भारतातील कोणत्या ठिकाणी हॉकी हा खेळ सर्वप्रथम खेळला गेला असे मानले जाते?

भारतातील कलकत्ता या ठिकाणी हॉकी हा खेळ सर्वप्रथम खेळला गेला असे मानले जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हॉकी या भारताच्या राष्ट्रीय खेळाबद्दल माहिती पाहिली, ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला तुम्ही कळवालच, मात्र ही माहिती तुमच्या हॉकी प्रेमी मित्रांना पाठवण्यास विसरू नका.

धन्यवाद…

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment