हार्मोनियम वाद्यची संपूर्ण माहिती Harmonium Instrument Information In Marathi

Harmonium Instrument Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजकाल अनेक धार्मिक भजन कार्यक्रमांमध्ये तुम्ही हार्मोनियम अर्थात मराठीमध्ये पेटी म्हणून ओळखले जाणारे वाद्य बघितलेच असेल. सर्वसाधारणपणे भात्याच्या साहाय्याने हवा भरून आणि व्हाईस कॉर्ड अर्थात बटन दाबून त्यापासून आवाजाची किंवा नोट्सच्या स्वरूपात संगीताची निर्मिती केली जाते. याकरिता संगीताच्या नोट्स बद्दल चांगले ज्ञान असणे गरजेचे असते.

Harmonium Instrument Information In Marathi

हार्मोनियम वाद्यची संपूर्ण माहिती Harmonium Instrument Information In Marathi

मित्रांनो, आपल्या मधील अनेकांना असे वाटत असेल की हार्मोनियम हे भारतीय वाद्य आहे, मात्र मूळ युरोपमध्ये तयार केले गेलेले हे वाद्य भारतीय नाही. युरोपमध्ये तयार झालेले हे वाद्य आपल्याकडे कसे आले असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, तर काही फ्रेंच लोकांनी सुमारे १९ व्या शतकाच्या दरम्यान भारतीय भूमीवर या हार्मोनियमला ओळख निर्माण करून दिली. वापरण्यास अतिशय साधे आणि भारतीय संगीतामध्ये सहज सामावणारे असल्यामुळे भारतामध्ये ते अतिशय लोकप्रिय झाले.

हार्मोनियम बनवण्यासाठी वापरलेली सामग्री आणि त्याचा मूळ उगम या गोष्टींवर आधारित हार्मोनियमचे विविध प्रकार पडतात, सर्वसामान्य लोकांना या प्रकारांमधील आवाजात फरक जाणवत नसला, तरी देखील एक कुशल संगीतकार त्यातील आवाजाचा आणि मधुरपणाचा फरक लगेच ओळखू शकतो.

चला तर मग आजच्या भागामध्ये आपण मराठी मध्ये सर्वसाधारणपणे पेटी म्हणून ओळखले जाणारे हार्मोनियम याबद्दल माहिती घेऊया…

नावहार्मोनियम
मराठी नावपेटी
वापरमुख्यत्वे धार्मिक भजन कार्यक्रमात संगीत निर्मितीसाठी
ऊर्जा स्रोतहाताच्या साहाय्याने हलविला जाणारा भाता
वादन प्रकारबटनाच्या साहाय्याने हवेचा मार्ग मोकळा करून देऊन
वापरलेले साहित्यशक्यतो लाकूड
आवाज निर्माण करणारी यंत्रणाविविध तार

मित्रांनो, वाराणसी आणि जोनपुर या ठिकाणांना भारतीय शास्त्रीय संगीताचे मानबिंदू किंवा केंद्रबिंदू मानले जाते. वाराणसीच्या खालोखाल जोंनपुरचा भारतीय संगीताशी अतिशय निकटचा संबंध आहे. जौनपूर या ठिकाणी अनेक शास्त्रीय संगीतामधील रागांची निर्मिती करण्यात आली आहे, त्यापैकीच जौनपुरी राग देखील एक आहे.

जो हार्मोनियमच्या साह्याने तयार करण्यात आला होता. हा राग तयार करण्यामागे जोनपुर येथील सुलतान हुसेन शर्की हा व्यक्ती होता. “पहाट राग, आसावरी थाट” या रागावर आधारित असलेला हा जौनपुरी राग हार्मोनियम साठी अतिशय महत्त्वाचा समजला जातो.

असे असले तरी देखील हिंदू धार्मिक भजन कीर्तनांसह मुस्लिम धर्मियांच्या गझल आणि कव्वाली इत्यादी संगीत प्रकारांमध्ये देखील हार्मोनियम बिनदिक्कतपणे वापरला जातो.

हार्मोनियमच्या आवाज निर्मितीचे तंत्र किंवा यंत्रणा ही सर्वप्रथम युरोपमध्ये तयार केली गेली, ज्यामध्ये भात्याद्वारे तयार करण्यात आलेल्या हवेला व्होकल कॉर्डच्या साह्याने धक्का देऊन आवाजाच्या विविध नोट्स तयार केल्या जातात, आणि या नोट्स लयदार पद्धतीने वाजविल्यामुळे संगीताची निर्मिती केली जाई.

मित्रांनो, एक गमतीची बाब म्हणजे हा हार्मोनियम युरोपमध्ये तयार झाला असला, तरी देखील विसाव्या शतकानंतर युरोप मधून जवळपास हा हार्मोनियम वाद्य नाहीसे झाले होते. मात्र १९ व्या शतकात भारतात आयात झालेले हे हार्मोनियम इथल्या शास्त्रीय संगीताशी खूप जुळले आणि भारतीयांनी देखील याला फार मोठी पसंती दिली.

परिणामी त्याच्या उगमस्थानी नाहीसे होत चाललेले हे हार्मोनियम भारतात मात्र सर्वात जास्त लोकप्रिय होऊ लागले. १९१५ पर्यंत भारत हा हार्मोनियम तयार करणारा सर्वात मोठा उत्पादक देश होता, यावरून हार्मोनियम भारतामध्ये किती रुचले याची प्रचिती येऊ शकते.

भारतामध्ये केवळ हार्मोनियमची आयात होऊन उत्पादनच झाले नाही तर दिवसेंदिवस गरजेनुसार त्यामध्ये बदलही करण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे बसून वाजवता येईल असा हाताने ओढण्याचा भाता असलेला हार्मोनियम तयार करणे होय. या कामी द्वारकानाथ घोष या व्यक्तीचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.

हार्मोनियम चा वापर विविध ठिकाणी केला जातो. त्यामध्ये पारशी आणि मराठी संगीत आणि खास करून मराठी नाट्यसंगीत आघाडीवर येते. याच बरोबरीने तमाशासारख्या लोककलेमध्ये देखील या हार्मोनियम ला स्थान देण्यात आलेले आहे.

या हार्मोनियम बद्दलची एक मजेशीर गोष्ट ऐकायला तुम्हाला नक्की आवडेल, आणि ती म्हणजे आज भारतामध्ये खूप प्रसिद्ध असणारे हे हार्मोनियम कोणे एके काळी वाजवण्यास मनाई करण्यात आलेली होती. त्याचे कारण म्हणजे हे हार्मोनियम एका वेळी एकच नोट तयार करू शकत होते, मात्र तत्कालीन भारतीय वाद्य जसे की विना सितार इत्यादी एका नोटेवरून दुसऱ्या नोटेवर सहज परावर्तित होत असत, त्यामुळे हार्मोनियम सारखे बटणे असलेले वाद्य भारतीय संगीताची योग्य निर्मिती करू शकत नाही, किंवा भारतातील संगीत स्वरांना न्याय देऊ शकत नाही असे लोकांना वाटत असे. आणि काही अंशी ते खरे देखील होते. कारण हार्मोनियमच्या नोट मधून बारीक-सारीक संगीताच्या टिपा तयार करणे शक्य नाही, त्यामुळेच की काय ऑल इंडिया रेडिओ अर्थात ए आय आर ने सुमारे १९४० ते १९७१ या प्रदीर्घ कालावधी करिता हार्मोनियमचे हे तंत्र वापरण्यास पूर्णपणे बंद केले होते. मात्र या हार्मोनियमने आपल्या लोकप्रियतेच्या माध्यमातून हा समज खोटा ठरविला, आणि भारतीयांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केले.

निष्कर्ष:

मित्रांनो, काही पाश्चात्य गोष्टी भारतामध्ये येऊन इतक्या सहजतेने इथल्या वातावरणाशी आणि संस्कृतीशी मिसळून गेल्या, की त्या मुळ भारतीयच आहेत असे वाटते. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे हार्मोनियम होय. शक्यतो धार्मिक विधीच्या वेळी, किंवा भजन कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे वाद्य म्हणजे पेटी किंवा हार्मोनियम होय.

त्याच्या धार्मिक वापरामुळे तसेच सहज आणि सोपे असल्यामुळे,  यंत्रणादेखील अतिशय साधी असल्यामुळे, आणि अगदी छोट्याशा गावातही आढळल्यामुळे हे वाद्य म्हणजे मूळ भारतीयच असावे असा अनेकांचा समज होतो. मात्र हे मूळच्या युरोपमध्ये तयार झालेले वाद्य आहे.

असे असले तरी देखील आजच्या पिढीमध्ये हार्मोनियम वाजवण्याबद्दल फारसे स्वारास्य दिसून येत नाही, त्यामुळे केवळ वयस्कर लोकांच्या हातातच या वाद्याला पाहिले जाते. मात्र आजच्या तरुण पिढीने या वाद्याकडे आपला कल वळवून या वाद्याला पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जावे, असे नेहमी वाटत राहते.

FAQ

हार्मोनियम हे वाद्य कोणत्या देशामध्ये उगम पावलेले आहे?

हार्मोनियम हे वाद्य युरोप खंडामधील फ्रान्स या देशामध्ये उगम पावलेले आहे.

हार्मोनियम या वाद्याचा भारतीय लोकांशी संबंध केव्हा आला?

ज्यावेळी पाश्चात्य लोकांनी सुमारे १९ व्या शतकामध्ये हार्मोनियम भारतात आणले त्यावेळी भारतीय लोकांचा या वाद्याशी संबंध आला.

हाताने पंप केला जाऊ शकेल असा भाता असलेला हार्मोनियम कोणी व कोठे तयार केला?

हार्मोनियमचा उगम जरी युरोपमध्ये झाला असला, तरी देखील हाताने पंप केला जाऊ शकेल असा भाता असणारा हार्मोनियम श्री. द्वारकानाथ घोष यांनी भारतामध्ये तयार केला. जेणेकरून जमिनीवर बसवून असा हार्मोनियम वाजवला जाऊ शकेल.

मूळ हार्मोनियम चा शोध कोणी लावला होता?

मूळ हार्मोनियम चा शोध अलेक्झांडर डेबियन या व्यक्तीने १८४२ मध्ये फ्रान्समध्ये लावला होता. यासाठी त्यांनी कॉपीराईट देखील घेतले होते.

हार्मोनियम या वाद्याचा वापर सर्वाधिक कुठे केला जातो?

हार्मोनियम या वाद्याचा वापर सर्वाधिक धार्मिक भजने, कीर्तने आणि शास्त्रीय संगीत इत्यादी ठिकाणी केला जातो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मूळच्या पाश्चात्य मात्र अगदी भारतीयच भासणाऱ्या वाद्याबद्दल अर्थात हार्मोनियम बद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला नक्कीच मनोरंजक वाटली असेल, आणि यातून तुम्हाला बरीचशी माहिती नवीनही मिळाली असेल. मात्र केवळ हे ज्ञान तुमच्या पुरतेच मर्यादित न ठेवता तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा, ही विनंती.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment