हडप्पा संस्कृतीची संपूर्ण माहिती Harappan Culture Information In Marathi

Harappan Culture Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो एखादी संस्कृती आणि तेथील भूप्रदेश यांचे अतिशय घट्ट असे नाते असते. तो भूप्रदेश त्या संस्कृतीवरून आणि ती संस्कृती त्या भूप्रदेशावरून ओळखली जात असते. तसेच एक संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती होय. जी भारतातील सर्वात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते. तिला सिंधू संस्कृती किंवा सिंधू सभ्यता या दोन्ही नावांनी ओळखले जाते, मात्र बऱ्याच जणांना हडप्पा संस्कृती व सिंधू संस्कृती वेगवेगळी आहे असे वाटते.

Harappan Culture Information In Marathi

हडप्पा संस्कृतीची संपूर्ण माहिती Harappan Culture Information In Marathi

मित्रांनो, या संस्कृतीमध्ये पूर्वजांनी खूप मोठी प्रगती केलेली होती. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप होता, अगदी आजच्या काळातील तंत्रज्ञानाला ही लाजवेल अशी प्रगती त्याकाळी झालेली होती. आज आपण हडप्पा संस्कृती याविषयी माहिती बघणार आहोत, चला तर मग सुरु करूया…

नाव हडप्पा संस्कृती
प्रकारसिव्हीलायजेशन / संस्कृती
इंग्रजी नावHarappa civilization
मुख्य ठिकाणकालखंड, इसविसन पूर्ण ३३०० ते इसविसन पूर्व १३००
युगदक्षिण  आशियाचे कांस्ययुग
त्यापुढील संस्कृतीपेंटेड ग्रे वेअर संस्कृती
इतर नावेप्राचीन सिंधू, हडप्पा संस्कृती, हडप्पा सभ्यता, सिंधू संस्कृती, सिंधू सभ्यता
भौगोलिक विस्तारसिंधू नदीच्या खोऱ्यामधील पाकिस्तान आणि भारताचा काही प्रदेश तसेच घग्गर व हा कराया हंगामी नद्यांचा प्रदेश आणि सोबतच पाकिस्तानचा पूर्वेकडील आणि भारताचा मात्र वायव्यकडील भूप्रदेश

मित्रांनो, हडप्पा संस्कृतीमध्ये अतिशय प्रसन्न वातावरण असे, कारण तेथे शहरीय रचना अतिशय योग्य पद्धतीने करण्यात आलेली होती. मोठ्या शहरांमध्ये ०५ बाय ९७ फूट आकाराच्या घरामध्ये लोक राहत असत, आणि त्यामध्ये दोन खोल्या असत. येथील रस्ते, गटारी देखील खूप नियोजनपूर्वक तयार केले गेलेल्या होत्या. येथे घर बांधण्यासाठी विटांचा वापर केला जात असे, धान्य साठवण्यासाठी देखील एक खोली असे.

हडप्पा संस्कृतीमध्ये अर्थव्यवस्था देखील खूप विचारपूर्वक बनवलेली होती. तिथे व्यापाराला मोठे प्राधान्य होते. याकरिता वाहतुकीच्या सोयींचाही विकास झालेला होता, त्यामध्ये बैलगाडी व होडी यांचा मुख्यत्वे वापर केला जाई.

हडप्पा काळामध्ये लोक कापसापासून व लोकरीच्या धाग्यापासून बनवलेल्या कापडांना प्राधान्य देत असत. त्याकाळी इतर गोष्टींमध्ये प्रगती झालेली असली, तरी देखील कपड्यांमध्ये त्यांना फारशी माहिती नव्हती. त्याकाळचे लोक शरीराच्या वरील व खालील भागाकरिता दोन वेगवेगळे कपड्याचे तुकडे वापरत असत. पुरुष दाढी ठेवत, तर महिला आपल्या डोक्यावरील केसांना कापडाने झाकत असत. त्याकाळी स्त्रियांसह पुरुषही दाग दागिने परिधान करत असत.

हडप्पा संस्कृतीमध्ये अनेक कला जोपासल्या गेल्या होत्या, ज्यामध्ये चित्रकला हा खूपच आवडीचा विषय होता. तसेच त्यांनी भांड्यांना चकाकी आणण्याचे तंत्र देखील अवगत करून घेतले होते. सोबतच त्यांनी अनेक प्रकारच्या मूर्ती बनवण्याचे व विविध धातूपासून वस्तू बनवण्याचे कार्य केले होते. त्याकाळी आरशाचा देखील शोध लागलेला होता.

हडप्पा संस्कृती मधील लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शिक्षित देखील होते. त्याकाळी हडप्पा संस्कृतीतील लोक आपल्या लिखाणा करिता सिरॅमक पॉटरी म्हणजेच भांडी आणि शिलालेख इत्यादी साधनांवर लिहित असत. या संस्कृतीमधील सर्वात लांब अक्षर हे २६ अक्षरांचे सापडलेले आहे. सिंधू संस्कृती अतिशय रहस्यमय किंवा गुढ स्वरूपाची होती, त्यामुळे त्यांची भाषा कोणती होती किंवा लिपी अजूनही कोणालाच अवगत नाही.

हडप्पा संस्कृतीतील लोक दागिने तयार करणे आणि ते परिधान करणे यांच्यासाठी देखील सुप्रसिद्ध होते. हडप्पा काळामध्ये देखील दागिन्यांकरिता सोने या धातूचा वापर करण्यात येत असे. त्यामुळे ते दागिने मऊ बनत असत. त्या काळी देखील स्त्रियांना मॅचिंग संकल्पना अवगत होती, त्या आपल्या कपड्यांच्या रंगानुसार विविध रंगाची दागिने परिधान करत असत.

निष्कर्ष:

मित्रांनो, जगामध्ये अनेक भौगोलिक बदल होत असतात, ज्यामुळे अनेक प्रजाती नाश पावतात, तर बऱ्याचशा प्रजाती उगम देखील पावतात. काळाच्या ओघामध्ये प्रत्येकच गोष्टींमध्ये बदल होत असतो. त्यातील एक बदलाचा भाग म्हणजे लुप्त पावलेल्या संस्कृती होय. त्यामध्ये अविभाजित भारतातील सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती याचा देखील समावेश होतो.

मित्रांनो एखादी वसाहत राहत असताना तिथे काही कारणास्तव ती संस्कृती किंवा ते शहर जमिनीखाली गाढली जातात, आणि त्याबरोबरच तेथील संस्कृती, विचारधारा, चालीरीती, प्रथा, परंपरा, ज्ञान, कौशल्य, आणि विविध तंत्रज्ञान देखील जमिनीदोस्त होते. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर तेथील उत्खननांदरम्यान, अथवा कुठल्याही खणनकार्यादरम्यान हे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यानुसार आपण जुन्या काळातील संस्कृती बघू शकतो.

हे काम भारताचे उत्खनन विभाग करत असते, ज्यामुळे आपल्या जुन्या संस्कृती बद्दल माहिती मिळायला आपल्याला मदत होते. मित्रांनो देव न करो, कदाचित आज आपण जर गाढले गेलो, तर काही वर्षानंतर आपली संस्कृती देखील आपली भावी पिढीतील लोक बघू शकतील.

आजच्या भागामध्ये आपण या हडप्पा संस्कृती बद्दल माहिती बघितली, ज्यामध्ये तुम्हाला या संस्कृतीबद्दल विविध इत्यंभूत माहिती, या संस्कृतीचा विस्तार, तसेच येथील शहर योजना, अर्थव्यवस्था, खानपानाच्या संस्कृती, पोशाखाच्या संस्कृती, येथील विशिष्ट लक्षणे आणि वैशिष्ट्ये, जपल्या जाणाऱ्या कला, वापरली जाणारी लिपी, विविध प्राणी, धर्म, दागदागिने या प्रत्येक विषयांवर इत्यंभूत माहिती मिळालेली असेल.

FAQ

हडप्पा संस्कृतीतील राजधानीचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

हडप्पा संस्कृतीतील राजधानीचे शहर म्हणून हडप्पा व मोहेंजोदारो या दोन्ही शहरांना ओळखले जाते. याचे कारण म्हणजे या दोन शहरांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आलेली होती.

हडप्पा संस्कृती मधील काही वैशिष्ट्ये काय सांगता येतील?

हडप्पा संस्कृती ही तिच्या अचूकतेसाठी फार प्रसिद्ध होती. हडप्पा संस्कृतीतील वजने व मापे अतिशय अचूक, म्हणजेच अंतर हे अगदी एम एम पर्यंत मोजता येत असे. तसेच सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये ही संस्कृती वसलेली होती, ज्यामध्ये धातू, टेराकोटा, दगड, आणि इतरही अनेक साहित्यापासून तत्कालीन लोकांनी विविध शिल्पे, दागदागिने, खेळणी, आणि इतरही वस्तू बनवलेल्या होत्या.

हडप्पा संस्कृती बद्दल ऐतिहासिक दृष्टिकोनातून काय सांगता येईल?

मित्रांनो, भारतीय उपखंड किंवा अविभाजित भारतातील सर्वात पहिली माहीत असणारी नागरी संस्कृती म्हणून सिंधू संस्कृतीला ओळखले जाते. याला सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती अशा दोन्ही नावांनी ओळखले जाते, कारण सर्वप्रथम हडप्पा नावाचे शहर सापडलेले होते. ही संस्कृती सुमारे इसवी सन पूर्व ३३०० ते इसवी सन पूर्व १३०० या दरम्यानच्या कालखंडातील असावी, असा अनेक भूगर्भ शास्त्रज्ञ यांचा अंदाज आहे.

आर्य लोकांनी स्थानिक रहिवाशांची कत्तल केली असावी, असा कयास कोणत्या गोष्टीवरून मानला जातो?

मित्रांनो, ज्यावेळी मोहेंजोदारो या ठिकाणी उत्खनन सुरू होते, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर मानवी सांगाडे सापडले होते. त्यामुळे आर्य लोकांनी येथील स्थानिक लोकांचे मोठ्या प्रमाणावर कत्तल केली असावी असा अंदाज लावला जातो.

हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये कोणकोणते पाळीव प्राणी पाळले जात असत?

हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये डुक्कर, गाय, म्हैस,  कुत्रे, आणि मेंढी यांसारखे प्राणी पाळले जात असत.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हडप्पा संस्कृती बद्दल माहिती पहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते तुम्ही आम्हाला कळवत असताच, मात्र शेअर करण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. तुम्ही ही माहिती वाचा, शिवाय इतरांना देखील शेअर करा. या विषयावरील अजून माहिती तुमच्याकडे असेल, तर तुम्ही ती माहिती कमेंट मध्ये आमच्या सोबत सामायिक करा. शिवाय काही तुमच्या शंका किंवा सूचना असतील तर त्या देखील कमेंट मध्ये अगदी बिनधास्तपणे टाका. तुमच्या शंकांचे निरसन करण्यासोबतच तुमच्या सूचनावर देखील काम करून तुम्हाला योग्य ती सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment