हलासनची संपूर्ण माहिती Halasan Information In Marathi

Halasan Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि शरीराची निकोप वाढ करायची असेल तर योग ही अतिशय योग्य व सोपी पद्धत ठरू शकते. योगामुळे तुम्ही केवळ निरोगीच राहत नाहीत, तर दिवसभर आनंदी देखील राहता. शिवाय तुमची प्रतिकारशक्ती एका वेगळ्याच उंचीवर वाढते हे वेगळेच. परिणामी मानवाचे जीवन अतिशय शिस्तबद्ध बनण्यास देखील मदत होते.

Halasan Information In Marathi

हलासनची संपूर्ण माहिती Halasan Information In Marathi

रोज योगासने करणे खूप महत्त्वाचे ठरते. काही योगासने तर विविध रोगांसाठी इलाज म्हणून देखील केली जातात, तुम्ही रोग होऊ नये म्हणून अशा प्रकारची योगासने करून स्वतःला निरोगी ठेवू शकता. शिवाय यामुळे तुम्हाला रोज दिवसभर ताजतवाने देखील वाटत राहील.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अनेक योगासनाच्या प्रकारातील एक असणाऱ्या हलासन या योग प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत. शिवाय ते कशाप्रकारे करावे व त्याचे काय काय फायदे होतात या गोष्टीवर देखील प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता माहितीस सुरुवात करूया.

नावहलासन
इंग्रजी नावप्लॉ पोज
प्रकारव्यायामप्रकार
उपप्रकारयोगासन
मुख्य फायदाताणतणाव व निद्रानाशवर प्रभावी
साधारण कोन९०°
नावाचा अर्थहे आसन हल अर्थात नांगरासारखे दिसते म्हणून हे नामकरण

हलासन म्हणजे काय:

मित्रांनो, नांगराला हल असे देखील म्हटले जाते. हे आसन करताना शरीर अगदी नांगराप्रमाणे दिसते. त्याला हलासन असे नाव दिले जाते. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असणारे हे योगासन मधुमेही रुग्णांना तसेच थायरॉईड चा आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये वजन कमी करण्याकरिता खूपच फायदेशीर समजले जाते.

मित्रांनो यालाच इंग्रजीमध्ये फ्लो पोज असे देखील म्हणतात. कारण इंग्रजीमध्ये नांगराला प्लॉ असे म्हणतात. हलासन हे खूपच सोपे दिसत असले, तरी देखील रोज रोज पार पाडण्याकरिता कठीण जाते.

हलासन कसे करावे:

मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला एखाद्या आसनाबद्दल फायदे माहित असतात, मात्र योग्य रीतीने हे आसन कसे करावे याबाबत माहिती नसते. त्यामुळे आपण हलासन करण्याची योग्य पद्धती समजून घेऊया.

सर्वप्रथम हलासन करण्याकरिता जमिनीवर काहीतरी अंथरून पाठीवर ओणवे झोपावे, त्यानंतर दोन्हीही हात मांड्यांच्या शेजारी ठेवून रिलॅक्स करावे. नंतर पायाला ३०,६०  व ९० अंशाच्या कोणामध्ये हळूहळू वर उचलावे, मात्र असे करत असताना पाय कुठेही गुडघ्यामध्ये वाकवला जाऊ नये, त्यानंतर ज्यावेळी तुम्ही श्वास सोडणार असाल तेव्हा पाय हे डोक्यांच्या मागून जमिनीला स्पर्श करावे, जेणेकरून पायाची बोटे डोक्याच्या मागील बाजूस जमीनला स्पर्श करते.

या आसनाला करताना श्वासावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे ठरते. श्वास घेताना आणि सोडताना दोन्हीही वेळेस अगदी हळूच घ्यावा व सोडावा. मित्रांनो तुमच्या क्षमतेनुसार जास्तीत जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करावा. मूळ स्थितीकडे येताना देखील अतिशय हळुवारपणे पाय खाली घ्यावेत, असे एक चक्र पूर्ण होते. आणि या चक्राला तुम्ही कमीत कमी पाच वेळेस तरी करायला हवे.

हलासन हे आसन करण्याचे फायदे:

मित्रांनो, प्रत्येक आसनाचे त्याच्या स्थितीनुसार वेगवेगळे फायदे असतात. हलासन सुद्धा अनेक आरोग्यदायी फायदे पुरविते, ज्यामध्ये महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे पचनासाठी अतिशय उत्तम ठरते. पोटातील स्नायूंचा वापर केला जात असल्यामुळे पचनसंस्थेला मोठा हातभार लागतो. तसेच ज्या रुग्णांना बद्धकोष्ठता, अपचन किंवा जठाराशी संबंधित अन्य आजार असतील त्यांना हलासन अतिशय फायदेशीर ठरत असते.

या आसनाचा वापर करून तुम्ही वाढलेले वजन देखील नियंत्रणात आणू शकता. मित्रांनो, आजकाल बीजी स्केड्युल आणि वाढता कामाचा ताण या गोष्टीमुळे ताणतणाव वाढत आहे, आणि त्यासोबतच लोकांचे वजन देखील वाढत आहे. या दोन्हीही गोष्टींवर एकत्रित मात करण्याकरिता कुठले आसन असेल तर ते म्हणजे हलासन होय. या हलासनामुळे पोटाची चरबी झपाट्याने वितळण्यास मदत होते, आणि ढेरीचा घेर कमी झाल्यामुळे माणसाला बऱ्याच प्रमाणावर प्रसन्न वाटण्यास मदत मिळते. शिवाय ताणतणाव देखील दूर होण्यास मदत होते.

हालासन केल्यामुळे माणसाला चांगली गाढ झोप लागते, शिवाय मध्ये जाग देखील येत नाही. त्यामुळे ज्या लोकांना निद्रानाशाचे विकार जाणवत असतील त्यांच्या साठी हलासन करण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देत असतात. मित्रांनो पुरेशी झोप झाली नाही की आपोआपच दुपारी डोळे झाकायला लागतात, आणि अश्या वेळी झोप घेणे शक्य नसेल तर मानवाची चिडचिड होते. मात्र योगासने केली तर या समस्येला देखील चिरडून टाकले जाऊ शकते.

हलासन करताना काय खबरदारी घेतली जावी:

मित्रांनो, काही गोष्टी कितीही फायदेशीर असल्या तरी देखील त्यामध्ये काही प्रमाणात का होईना जोखमा या असतातच. हलासन करताना ज्या लोकांना स्पोंडीलाइटिस सारखे त्रास असतील त्यांना हे आसन न करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच पाठीचा कना जर काही कारणास्तव जड झाला असेल तेव्हा देखील हे आसन करू नये.

उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी या आसनाच्या वाटेलाही जाऊ नये, असे म्हटले जाते. शिवाय चक्कर येत आहे असे जाणवत असेल तर हे आसन करू नये. हृदयरोगी रुग्ण देखील या हलासन करणाऱ्यांच्या यादीमध्ये येत नाहीत.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हलासनाविषयी माहिती घेतली. ज्यामध्ये तुम्हाला हालासन म्हणजे काय, त्याचे शरीरासाठी काय काय फायदे होतात, शिवाय हे हलासन कसे करावे, तसेच हे करताना घ्यावयाच्या खबरदाऱ्या, याच्याशीच संदर्भात असलेले अर्धहलासन म्हणजे काय असते, व ते करण्याची पद्धती काय आहे, आणि रिलॅक्सेशन करण्याकरिता यानंतर कोणते आसन केले जावे इत्यादी गोष्टींवर माहिती घेतली. शिवाय काही प्रश्न देखील पाहिलेले आहेत. ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरली असेल याबाबत कुठलेही दुमत नसेल.

FAQ

हलासन हे लठ्ठ लोकांसाठी फायदेशीर ठरते का?

मित्रांनो, हलासन करण्याकरिता तुमच्या पोटातील स्नायूंचा वापर केला जातो. जेणेकरून पोटाची चरबी वितळण्यास मदत मिळते आणि लठ्ठपणा दूर होतो.

मधुमेहही रुग्ण व हलासन यांचे काय नाते आहे?

मित्रांनो, हलासनाकरिता पोटातील स्नायू वापरल्यामुळे पोटाची चरबी कमी होते हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यामुळेच शरीराला मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन तयार करण्याची सूचना मिळते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित तर होतेच शिवाय टाईप दोन प्रकारातील मधुमेहाचा धोका देखील टळला जातो.

हलासन करताना पायामध्ये किती अंशाचा कोन करणे योग्य असते असे सांगितले जाते?

हलासन करताना पायामध्ये ९० अंशाचा कोन करणे अतिशय योग्य असते असे सांगितले जात असते.

हलासन केल्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतात?

मित्रांनो, हलासन करताना पोट आणि पाठीचे स्नायू ताणले जात असल्यामुळे त्यांना मजबूत होण्यास मदत मिळते. शिवाय पाठीचा मनकादेखील दुखण्यापासून दूर जातो. त्यासोबतच ज्या लोकांना पाठ, खांदे, मान, किंवा कंबर दुखीचा त्रास असेल त्यांच्यासाठी देखील फायदा होतो. शरीराला लवचिकता प्राप्त होते, आणि स्नायू व सांधे अतिशय जलदरीत्या कार्य करू शकतात.

अर्ध हलासन म्हणजे काय?

अर्धहलासन हे हलासनाचाच प्रकार असून यामध्ये मात्र पायाचा कोण ९० अंश करणे ऐवजी हळूहळू ३० अंश मग ६० अंश आणि नंतर ९० अंशावर अगदी हळुवारपणे केला जातो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हलासन या योग प्रकारातील एका आसनाबद्दल माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली व फायदेशीर ठरली का याबाबत आम्ही कमेंट मध्ये वाचण्यासाठी इच्छुक आहोत. तसेच ही माहिती वाचल्यानंतर त्याचा फायदा नुसार ज्या तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला हे आसन करण्याची गरज आहे अशा मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून त्यांना याविषयी माहिती नक्की द्या.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment