गुरू ठाकूर यांची संपूर्ण माहिती Guru Thakur Information In Marathi

Guru Thakur Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो ज्या लोकांना संगीत क्षेत्रामधील आवड आहे अशा लोकांना गुरु ठाकूर यांचे नाव नक्कीच माहिती असेल. गुरु ठाकूर हे एक मराठी मधील प्रसिद्ध कवी, संगीतकार तसेच पटकथांचे लेखक देखील आहेत. ०३ जून १९६७ या दिवशी मुंबई येथे जन्मलेल्या गुरु ठाकूर यांनी मराठी चित्रपट संगीतासाठी खूप योगदान दिले आहे. यामध्ये त्यांनी अनेका गीते रचून आणि संगीतबद्ध करून महाराष्ट्राच्या संगीतसृष्टीला चांगले दिवस आणलेले आहेत. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार सह अनेक राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट पुरस्कार देखील मिळालेले आहेत.

Guru Thakur Information In Marathi

गुरू ठाकूर यांची संपूर्ण माहिती Guru Thakur Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण या प्रतीतयश संगीतकार बद्दल आणि गीतकार बद्दल अर्थात गुरु ठाकूर यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत…

नावगुरू ठाकूर
जन्म दिनांक०३ जून १९६७
जन्म स्थळमुंबई, महाराष्ट्र
व्यवसायगीतकार, संगीतकार, कवी, पटकथाकार, अभिनेता
नागरिकत्वभारतीय
कार्यभाषामराठी

मित्रांनो, मुंबईच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात गिरगाव या ठिकाणी गुरु ठाकूर यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सुमित्रा ठाकूर, तर वडिलांचे नाव नारायण ठाकूर होते. त्यांच्या आई गृहिणी आणि वडील मेकॅनिकल इंजिनिअर होते. मुंबई येथील शारदाश्रम विद्यामंदिर येथे त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी मिळवण्याकरिता मुंबई विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविला.

गुरु ठाकूर यांच्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात:

मित्रांनो, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे आपल्याकडे म्हटले जाते आणि ते काही खोटे नाही. अगदी लहान वयामध्येच गुरु ठाकूर यांना कविता करण्याचा छंद होता. त्यांनी लहानपणीच अनेक कविता आणि गीते लिहिली होती. सर्वप्रथम १९९२ साली आलेल्या सोंगाड्या या चित्रपटातून त्यांनी लेखन क्षेत्रामध्ये आपले पाऊल ठेवले.

त्यानंतर जोगवा या चित्रपटामध्ये देखील त्यांनी पटकथेसाठी आपले योगदान दिले. आणि तिथून ते अतिशय प्रसिद्ध झाले. याकरिता त्यांना २००८ मध्ये गीतासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांनी बालक पालक, टाइमपास, लय भारी आणि सैराट यांसारख्या अनेक प्रसिद्ध झालेल्या मराठी चित्रपटांसाठी देखील गीतांचे लेखन केलेले आहे.

त्यांची गीते आज देखील अनेकांच्या ओठावर असतात. त्यांनी अनेक मराठी चित्रपट लिहिलेले आहेत, यामध्ये पाक पक पकाक, अजिंठा, अगबाई अरेच्चा, आणि जोगवा यांसारख्या मराठी चित्रपटांचा समावेश होतो. त्यांनी सैराट मधील काही संवाद देखील लिहिलेले आहेत.

गुरु ठाकूर यांची साहित्यिक शैली कशी आहे:

मित्रांनो, माणसाच्या विचारावर त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव पडत असतो, हे आपल्याला माहितीच आहे. गुरु ठाकूर हे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात फिरलेले असल्यामुळे त्यांनी आपल्या डोळ्यांमध्ये ग्रामीण भागाचे वैभव, आणि  त्यामागचे अनेक कष्ट डोळ्यांमध्ये साठवलेले होते. ज्याचा वापर करून त्यांनी आपल्या साहित्यिक क्षेत्राला वेगळी शैली दिली. त्यांच्या साहित्यिक शैली मधून ग्रामीण भागातील लोकांचे जीवन, त्यांच्या भावना, यांचे हुबेहूब वर्णन केले जाते.

मित्रांनो, अगदी कविता असो, गीते असो, तुमची पटकथा असो, किंवा इतर काही. प्रत्येक क्षेत्राला हात घालणाऱ्या मोजक्याच कलाकारांमध्ये गुरु ठाकूर यांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या लेखन शैलीने अनेक प्रकारचे विक्रम केलेले आहेत. त्यांच्या गीताने खूप मोठा टप्पा गाठलेला आहे, आणि या सर्वांमुळे गुरु ठाकूर हे नाव आज सर्वांच्या ओठावर आहे.

गुरु ठाकूर यांचे वैयक्तिक जीवन:

मित्रांनो, गुरु ठाकूर हे मुंबईमध्ये जन्माला आलेले होते. त्यांनी आपले शिक्षण आणि अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर संगीत क्षेत्राला आपलेसे केले. यादरम्यान त्यांनी स्मिता ठाकूर यांच्याशी विवाह केला, या दांपत्याला दोन मुले झाली. ते आपल्या खाजगी आयुष्यातच व्यतीत असतात. सार्वजनिक विषयावर ते शक्यतो चर्चा करत नाहीत.

गुरु ठाकूर यांना मिळालेले विविध पुरस्कार व सन्मान:

मित्रांनो, गुरू ठाकूर हे नाव आज प्रत्येकाला माहित आहे, कारण मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक चित्रपटांमध्ये यांनी गीते लिहिलेली आहेत. आणि त्यांच्या या कार्याकरिया त्यांना विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांनी मराठी चित्रपट जोगवा यासाठी २००८ मध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता.

तसेच सलग सहा वेळा महाराष्ट्र शासनाद्वारे दिल्या जाणारा उत्कृष्ट गीतकार पुरस्कार देखील मिळवलेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने देखील त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील व संस्कृतीच्या जतन करण्यामधील योगदानामुळे अगदी अलीकडील काळात म्हणजेच २०२० मध्ये प्रसिद्ध पुरस्कार असणारा विष्णुदास भावी पुरस्कार देखील दिलेला आहे.

मित्रांनो, गुरु ठाकूर हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध व यशस्वी झालेले नाव आहे. त्यांनी मराठी चित्रपट संस्कृतीला अनेक प्रकारे योगदान दिलेले आहे. आज लाखो लोक त्यांचे चाहते असून, एक महान साहित्यिक आणि गीतकार म्हणून त्यांचा उल्लेख आहे. आणि आगामी पिढीला देखील त्यांच्या कार्याचा वारसा मिळून प्रेरणा मिळत राहील.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एका प्रतीतयश संगीतकार, गीतकार, पटकथाकार, आणि अभिनेता इत्यादी कारकीर्द गाजविलेल्या व्यक्तीबद्दल अर्थात गुरु ठाकूर यांच्या बद्दल माहिती पाहिली. यामध्ये तुम्हाला त्यांच्या प्रारंभिक जीवनाबद्दल माहिती तर मिळालीच, शिवाय त्यांची कारकीर्द कशी सुरु झाली, त्यांनी या क्षेत्रामध्ये कसे करिअर केले, साहित्यिक म्हणून त्यांची वेगळी शैली काय आहे, यांचे वैयक्तिक जीवन कसे होते, तसेच त्यांना कोणकोणते पुरस्कार व सन्मान मिळालेले आहेत, त्यांच्याविषयी इत्यंभूत माहिती पाहिली.

FAQ

गुरु ठाकूर यांच्या अतिशय उल्लेखनीय व गाजलेल्या कलाकृती कोणकोणत्या आहेत?

मराठी चित्रपट संगीतामध्ये काम करताना जोगवा, बालक पालक, टाइमपास, लय भारी, आणि सैराट यांच्यासारख्या अनेक मराठी चित्रपटांकरिता गीत लेखनाचे कार्य केलेले आहे.

गुरू ठाकूर यांना संगीत क्षेत्रामध्ये मिळालेले काही पुरस्कार कोणाकोणते आहेत?

मित्रांनो, काही उल्लेखनीय कामगिरी केली की पुरस्कार हे मिळतच असतात. तसेच गुरु ठाकूर यांना मराठी साहित्य व चित्रपट व्यवसायामधील अनेक सन्मान व पारितोषिके मिळालेली आहेत. त्यांना जोगवा या चित्रपटातील गीतांकरिता २००८ सालचा सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला होता. जो राष्ट्रीय स्तरावरील होता, तसेच त्यांनी सलग सहा वेळा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात येणारा पुरस्कार देखील पटकावलेला आहे. तसेच २०२० मध्ये त्यांना विष्णुदास भावे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.

गुरू ठाकूर यांच्या लेखन शैलीमध्ये कशाची झलक असते?

मित्रांनो, गुरू ठाकूर एका ग्रामीण कुटुंबातून आल्यामुळे मराठी संस्कृतीचा वारसा प्रकर्षाने जाणवतो. तसेच त्यांच्या कविता किंवा गीत या ग्रामीण भागातील कष्टाचे, वैभवाचे चित्रण करणारे असतात. ज्यातून त्यांनी पात्रांच्या चेहऱ्यावर खरेखुरे भाव रेखाटलेले आहेत.

गुरु ठाकूर यांच्या पत्नीचे नाव काय आहे?

मित्रांनो, गुरु ठाकूर यांच्या पत्नीचे नाव स्मिता ठाकूर असे असून, या दांपत्याला दोन मुले आहेत.

गुरु ठाकूर यांनी आपल्या पटकथा लेखनाला कोणत्या चित्रपटापासून सुरुवात केली?

गुरु ठाकूर यांनी सर्वप्रथम २००५ साली आलेल्या पाक पक पकाक या चित्रपटाच्या पटकथेपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली

मित्रांनो, आज आपण एक गीतकार, संगीतकार, अभिनेता, कवी इत्यादी सर्वच क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या गुरु ठाकूर यांच्या बद्दल माहिती पहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की पाठवा, तसेच संगीत क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या अनेक मित्र-मैत्रिणींना या माहितीचा आस्वाद घेता यावा, याकरिता त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment