शेळी प्राण्याची संपूर्ण माहिती Goat Animal Information In Marathi

Goat Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो शेळीला गरिबांची गाय म्हणून ओळखले जाते. ही एक रवंथ करणारी लहान प्रजाती असून त्यांची शिंगे पोकळ असतात. इंग्रजीमध्ये गोट या नावाने ओळखली जाणारी ही शेळी दुधाच्या बाबतीमध्ये अतिशय उत्तम असते. तसेच याचे मौंस देखील मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. दिसायला मेंढ्यांप्रमाणेच असणारी ही शेळी शरीरयष्टीने मात्र काहीशी कमी असते. अतिशय कमानदार शिंगे, मऊ केस, चपळता आणि लहानशी शेपटी ही शेळी प्राण्याची वैशिष्ट्ये आहेत. यातील नर शेळ्यांना तोंडाखाली दाढी येत असते.

Goat Animal Information In Marathi

शेळी प्राण्याची संपूर्ण माहिती Goat Animal Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण शेळी या प्राण्याविषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत. चला तर मग या माहितीच्या प्रवासाला सुरुवात करूयात.

नावशेळी
इंग्रजी नावगोट
किंगडमअँनिमालिया
फायलमकोरडेटा
प्रकारसस्तन प्राणी
कुळ किंवा कुटुंबबोविडे
संघकॅप्रिनी
वंशकाप्रा

मित्रांनो रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या गटातील एक पोकळशिंगे असणारी लहान प्रजाती म्हणून शेळीला ओळखले जाते जी शारीरिक दृष्ट्या मेंढी या प्राण्याशी बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य दाखवणारी असते. तिची शिंगे अतिशय टोकदार आणि अखीव असतात. तसेच तिला मऊ केस आणि एक छोटीशी शेपटी असते. शिवाय तिचे तोंड लांबट असते.

शेळी या प्राण्याचा इतिहास:

मित्रांनो मानवाने सर्वात प्रथम शेळी हा प्राणी पाळल्याचे उल्लेख आढळून येतात. आज जंगलामध्ये किंवा पर्वतीय प्रदेशांमध्ये आढळणारे जंगली बेझोअर हे अनुवंशिकरित्या शेळीचे पूर्वज आहेत. अश्या काही पुरातत्त्व पुराव्यांच्या आधारे अंदाज लावला जात आहे की न्यूलिथिक शेतकऱ्यांनी सर्वप्रथम दूध, मांस आणि लेंड्या खत म्हणून मिळाव्या याकरिता शेळ्यांचे सर्वप्रथम पालन केले.

असा उल्लेख आढळतो त्याकाळी त्यांची हाडे किंवा केस विविध शोभिवंत वस्तू बनवणे कपडे बनविणे किंवा इमारत इत्यादी ठिकाणी वापरले जात असत. याबरोबरच दहा हजार वर्षांपूर्वीचे शेळ्यांचे अवशेष इराण या ठिकाणी सापडले आहेत. यानुसार त्यांच्या इतिहासाचा अभ्यास सुरू आहे तसेच पश्चिम आशिया या ठिकाणी देखील सुमारे आठ ते नऊ हजार वर्षांपूर्वी बकऱ्या पाळल्या जात असल्याचे अवशेष आढळून येतात.

शेळ्यांची खाणपानाची सवय:

मित्रांनो जे शेळी पालन करतात त्यांना शेळ्यांच्या खाणपणाविषयी माहिती असेल की शेळी नेहमी कुठल्याही झाडाचा फक्त शेंडा खात असते आणि लगेच पुढच्या अन्नाकडे वळते. चाखत माखत केवळ चांगले चांगले अन्न खाणे हे शेळीचे लक्षण आहे.

शेळ्या शक्यतो झाड आल्यावर ताव मारण्याचे जास्त पसंत करतात मात्र शेळ्यांनी शेंडा खाल्लेले अन्न इतर प्राण्यांद्वारे खाल्ले जात नाही त्यामुळे शेळ्या चरून गेलेल्या ठिकाणी जनावरे चरत नाहीत. शेळी ही एक रवंथ करणारी प्रजाती असल्यामुळे पटपट खाणे आणि मग निवांत रवंथ करणे हा शेळीचा गुणधर्म आहे.

शेळीच्या शिंगांच्या वाढीबद्दल माहिती:

मित्रांनो शेळीचे शिंग हे असा अवयव आहे जो शेळीच्या संपूर्ण आयुष्य मध्ये वाढतच राहतो. साधारणपणे एका शेळीचे शिंग आठ ते बारा इंचापर्यंत म्हणजे एक फुटापर्यंत वाढत असते. मात्र काही प्रजाती अशा आहेत ज्यांना लांब शिंगासाठी ओळखले जाते यातील मार्क घोर्सेस ही अशी प्रजाती आहे जिचे शिंग सुमारे २९ इंच अर्थात शंभर सेंटीमीटर पर्यंत देखील वाढतात आणि काही वेळा याहीपेक्षा मोठे होऊ शकतात.

शेळीचे शिंगे कशी काढावी:

मित्रांनो आपल्याकडे शेळीचे शिंग फार वाढत नसल्यामुळे त्याला काढले जात नाही मात्र काही ठिकाणी ही समस्या जाणवल्यामुळे डिसबडिंग अथवा डीहॉर्निंग पद्धतीने शेळीची शिंगे काढली जातात. यामध्ये जन्मापासून १४ दिवसानंतर या शिंगांची कोंब काढले जातात मात्र या दरम्यान पेरीओस्टीम ला धक्का किंवा इजा न होण्याची काळजी घेतली जावी.

शेळी बद्दलची काही तथ्य:

मित्रांनो शेळीच्या पिल्लांना जन्म देण्याच्या प्रक्रियेला किडिंग असे म्हटले जाते.

  • शेळी हा प्राणी असा आहे ज्याला एकत्रित राहणे पसंत पडते. जेव्हा शेळ्यांचा कळप वेगळा किंवा एकटा केला जातो त्यावेळी हा प्राणी अतिशय उदास होतो आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो.
  • स्वच्छ प्राण्यांमध्ये शेळीची गणना केली जाते. शेळी शक्यतो कधीही आपले शरीर घाणीमध्ये भरू देत नाही अगदी पाण्याने पाय ओले होतील म्हणून पाण्यात पाय देण्याऐवजी ती उडी मारणे पसंत करते.
  • शेळी हा अतिशय जिज्ञासू व बुद्धिमान प्रकारचा प्राणी असून त्यांच्या वागण्यावरून ही बाब सहजतेने हेरता येऊ शकते.
  • शेळ्या अतिशय निवडक प्रकारचे अन्न खात असतात ज्यामुळे त्यांना खायला कमी लागत असले तरी जास्त चारा टाकावा लागतो.
  • आपल्या पिल्लाला जन्म दिल्यानंतर शेळी त्याचा आवाज लक्षात ठेवत असते आणि पिल्लू देखील आपल्या आईचा आवाज लक्षात ठेवत असतात.
  • शेळ्यांचा एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेला बिटिंग असे म्हटले जाते.
  • शेळ्या संभाव्य धोक्याची कल्पना आपल्या कळपातील इतर सदस्यांना शिंकेद्वारे देत असतात.

निष्कर्ष:

मित्रांनो शेळी हा मानवाने सर्वप्रथम पाळलेला प्राणी आहे असे म्हटले जाते. या शेळी प्राण्यापासून मोठ्या प्रमाणावर मांस उत्पादन केले जाते तसेच या शेळी पासून मिळालेले दूध हे अतिशय गुणवत्ता पूर्ण असल्यामुळे शरीरासाठी पौष्टिक समजले जाते. शेळी कमी किमतीमध्ये कमी वेळेमध्ये आणि कमी चाऱ्यांमध्ये चांगले उत्पन्न देण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे तिला गरीबाची गाय या नावाने देखील ओळखले जाते.

आताच्या भागांमध्ये आपण या शेळी बद्दल माहिती बघितली आहे यामध्ये तुम्हाला शेळी म्हणजे काय तिचा इतिहास काय आहे शेळ्या काय खातात तसेच शेळ्यांच्या डोळ्याबद्दल विविध तथ्य शिंगांच्या वाढीबद्दल माहिती शिंगे काढायची असेल तर त्यासाठीची पद्धती आणि इतर विविध तत्व यांसह विविध नेहमी विचारले जाणारे प्रश्न याबाबत देखील माहिती बघितलेली आहे.

FAQ

शेळी म्हणजे काय?

मित्रांनो शेळी हा चार पायाचा एक प्राणी असून कमी भांडवलामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या घटकांमध्ये या प्राण्याचा समावेश होतो. ज्याला इंग्रजी मध्ये गोट या नावाने देखील ओळखले जाते.

शेळीच्या इंग्रजी नावाबद्दल काय तथ्य सांगितले जाते?

मित्रांनो कमी भांडवलामध्ये सुरू करता येणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे बघितले जाते त्यामुळे या शेळीला इंग्रजीमध्ये गोट म्हटले जाते ज्याचा फुल फॉर्म गुड ऑफ ऑल टाइम ज्याचा अर्थ प्रत्येक काळामध्ये सर्वोत्कृष्ट ठरणारा प्राणी असा होतो असे सांगितले जाते.

शेळ्या मानवाला का चाटतात?

मित्रांनो शेळी जेव्हा आराम करत असते तेव्हा ती पूर्णतः रिलॅक्स होत असते आणि अशावेळी कुठलाही मानव जवळ असेल तर ती त्याला चाटून आराम करत आहे असे दाखवून देत असते.

शेळीच्या खानपाना बद्दल काय वैशिष्ट्य आहेत?

शेळी ही अशी प्रजाती आहे जिला फक्त चांगलाच चारा आवडतो त्यामुळे शेळीच्या खाण्याच्या सवयीला शेंडा खुडणे असे देखील म्हटले जाते. केवळ चांगल्या त्या गोष्टी खाऊन उर्वरित भाग मागे टाकण्याची शेळीची सवय आहे.

शेळी आणि पाणी यांच्या बद्दल काय सांगता येईल?

मित्रांनो शेळी ही अतिशय स्वच्छ राहायला आवडणारी प्रजाती असून ती कधीही पाण्यामध्ये पाय ठेवायला तयार नसते त्याऐवजी ती पाण्यावरून उडी मारून जाणे पसंत करते जेणेकरून चिखलामध्ये पाय भरणार नाहीत.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण गरीबाची गाय म्हणून ओळखले जाणाऱ्या शेळी या प्राण्याबद्दल इत्यंभूत माहिती पाहिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या घरी शेळीपाळली जाते का त्याविषयीची देखील माहिती आम्हाला सांगा आणि सोबतच आपल्या शेळी पालन करणाऱ्या किंवा शेळी पालन करण्यास इच्छुक असणाऱ्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद!!

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment