फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती Football Game Information In Marathi

Football Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये खेळला जाणारा अतिशय लोकप्रिय असा खेळ म्हणजे फुटबॉल होय. जगातील स्पेन, ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स, आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये हा फुटबॉल मोठ्या उत्साहाने खेळला जातो. त्यामध्ये दोन संघ समोरासमोर एकमेकांशी स्पर्धा करत जास्तीत जास्त गोल करण्याचा प्रयत्न करतात. आणि दोन्हीपैकी जो संघ जास्तीत जास्त गोल करेल, तो संघ विजयी होतो. या खेळाडूंमध्ये गोलरक्षक, खेळाडू, आणि पाठीराखे इत्यादी प्रकार पडतात. या खेळाचा मुख्य उद्देश हा समोरील संघाला चुकवून जास्तीत जास्त गोल करणे, हा असतो. फुटबॉल सारखेच किंवा फुटबॉल चे प्रकार म्हणता येतील असे खेळ म्हणजे ग्रीडीरोन फुटबॉल, आणि रग्बी फुटबॉल होय.

Football Game Information In Marathi

फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती Football Game Information In Marathi

आजच्या, भागामध्ये आपण फुटबॉल या खेळाविषयीची माहिती बघणार आहोत, चला तर मग सुरु करूया सर्वांच्या आवडीच्या अशा फुटबॉल खेळाच्या प्रवासाला…

नावफुटबॉल
सुरुवातएकोणिसाव्या शतकात
प्रकारसांघिक खेळ
उपप्रकारमैदानी खेळ
खेळाडूंची संख्या ११ खेळाडू
मैदानाचे आकारमान१०० मी × ७० मी
खेळाच्या सामन्याचा कालावधी४५ मिनिटे

मित्रांनो, आज फुटबॉल नावाने जगभर प्रसिद्ध असणारा हा खेळ कुठे पहिल्यांदा खेळला गेला, किंवा त्याला फुटबॉल हे नाव कसे पडले, याबाबत अनेक मतभेद बघायला मिळतात. अनेक लोकांच्या मान्यतेनुसार पायाने मारला जातो म्हणून त्याला फुटबॉल असे नाव पडले असावे. तसेच हा खेळ कुठे आणि कसा उत्पन्न झाला याबाबतही अजून एकमत नाही. काही लोकांच्या मते हा अमेरिकेमध्ये उगम पावला, तर फिफा नुसार हा खेळ चीन देशातील सुजू या खेळापासून विकसित झालेला आहे.

जपान या देशानुसार जपानमध्ये असूका राजवट असताना हा खेळाचा उगम झाला. त्यावेळी त्याला केमारी या नावाने ओळखले जात असे. त्यावेळी जॉन डिस या जहाजाच्या कॅप्टनने ग्रीनलँड मध्ये हा खेळ सर्वप्रथम सादर केला असे म्हटले जाते. अधिकृतरित्या  १८७८ यावर्षी प्रकाशित केलेल्या पुस्तकात फुटबॉलच्या उत्क्रांतीचा इतिहास लिहिलेला आहे.

काही संदर्भानुसार स्कॉटलाईट या देशांमध्ये चौदाव्या शतकातच फुटबॉल खेळला जात होता, मात्र तेथे १४२४ यावर्षी फुटबॉलला बेकायदेशीर ठरवण्यात आले. पुढे पुन्हा या फुटबॉल वरील बंदी उठवण्यात आली, मात्र पूर्वीची लोकप्रियता या खेळाला लाभली नाही. पुढे थेट १९ व्या शतकातच पुन्हा फुटबॉलची लोकप्रियता निर्माण व्हायला लागली.

सध्या खेळला जाणारा फुटबॉल:

मित्रांनो, विसाव्या शतकानंतर फुटबॉलला पुन्हा चांगले दिवस यायला लागले. या खेळासाठी इंग्लिश फुटबॉल असोसिएशन या संस्थेने अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. यावेळीच २१ मे १९०४ या दिवशी युरोपमधील सात मुख्य राष्ट्र एकत्र आली. यामध्ये बेल्जियम, फ्रान्स, नेदरलँड, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, आणि स्पेन इत्यादी देशांचा समावेश होता. या देशांनी एकत्र येऊन फिफा या संघटनेची स्थापना केली. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष होते रॉबर्ट ग्वेरीन.

पुढे २१ व्या शतकात तर फुटबॉल खूप मोठ्या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणावर खेळला जायला लागला. त्याच्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील आयोजित व्हायला लागल्या. फिफाची स्थापना देखील केली गेली. आज मितिला फुटबॉल मधील सर्वात मोठी स्पर्धा ही फुटबॉल विश्वचषक समजली जाते. या खेळाने रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेमार यांसारख्या खेळाडूंना नाव मिळवून दिले.

फुटबॉल खेळण्याचे स्वरूप:

मित्रांनो, आपण आधी पाहिल्याप्रमाणेच फुटबॉलचे आयताकृती मैदान असते. त्याच्या दोन्ही लहान बाजूस गोल करण्यासाठी ठिकाण दिलेले असते. याला गोलपोस्ट म्हणतात. या दोनही ठिकाणावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी गोल करू नये म्हणून गोलकीपर दिलेला असतो. संपूर्ण सामना ९० मिनिटांचा असला तरी देखील ४५ मिनिटांनी हाफ टाइम दिला जातो.

जो एक ब्रेक असतो. या ४५ मिनिटांचे देखील पंधरा मिनिटांमध्ये विभाजन केलेले असते. खेळ खेळताना कोण्या खेळाडूला इजा झाल्यास त्यावेळी इंजुरी टाईम दिला जातो, आणि त्यावेळपुरता सामना तहकूब केला जातो. आणि सामना पुन्हा सुरू देखील केला जातो.

फुटबॉल खेळाविषयी काही मनोरंजक तथ्ये:

मित्रांनो, सुरुवातीच्या काळात फुटबॉल हा शब्द खेळापेक्षा चेंडूसाठी वापरला जात असे.

  • फुटबॉल उत्तमरीत्या खेळता यावा म्हणून १५२६ मध्ये पहिला बुटांचा जोड तयार करण्यात आला. हा बूट खास इंग्लंडचा राजा आठवा हेनरी यांनी तयार करून घेतला होता.
  • फुटबॉल वर कविता ही सर्वप्रथम १५०० यावर्षी लिहिण्यात आली होती, जी फिलिप सिडनी यांनी लिहिली होती.
  • सुरुवातीला फुटबॉल हा खेळ खेळला जात असला तरी देखील त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध गोल करण्याची कल्पना नव्हती. या खेळाला स्पर्धेचा दर्जा देण्यासाठी सोळाव्या शतकाच्या शेवटी सर्वप्रथम गोल ही संकल्पना आणण्यात आली.
  • मध्ययुगीन कालावधीमध्ये फुटबॉल वर अनेकदा बंदी लादण्यात आलेली आहे.सुरूवातीच्या काळात अनेक देशांमध्ये महिलांना फुटबॉल खेळण्याची परवानगी देण्यात येत नव्हती, मात्र १९७० नंतर बऱ्याचशा देशांमध्ये ही परिस्थिती बदलली.

निष्कर्ष:

पूर्वीच्या, काळी अनेक मैदानी खेळाला प्राधान्य दिले जाई, मात्र आजकाल मैदानांची संख्या कमी झाल्यामुळे तसेच आई वडील दोघेही नोकरी निमित्ताने बिझी असल्यामुळे मुलांना मैदानावर खेळायला सोडले जात नाही. आणि मग मुले मोबाईल गेम वा कम्प्युटर गेम यांच्या आहारी जातात. यातून मैदानी खेळांमुळे मिळणारे फायदे तर मिळतच नाहीत, मात्र बसून बसून शरीराचे नुकसान जास्त होते.

तसेच मोबाईल, कम्प्युटरच्या अतिवापरामुळे डोळ्यांना देखील इजा होते. त्यामुळे आपल्या कितीही बिझी शेड्युलमधून अगदी काहीसा वेळ काढला आणि मुलांना मैदानावर खेळायला सोडले, तरी पुष्कळ आहे. यामुळे मुलांमध्ये सांघिक गुणांची देखील वाढ होते.

यासाठी फुटबॉल हा खेळ खूप चांगला समजला जातो. त्यामुळे शारीरिक व्यायाम देखील होतो, शिवाय मुलांमध्ये बंधूभाव, सांघिक कौशल्य, एकमेकांना सामावून घेण्याची वृत्ती, आणि या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी लागणारे कौशल्य व धाडस इत्यादी गुणांची वाढ होते. त्यामुळे फुटबॉल हा खेळ व्यक्तिमत्व विकासाचे साधन म्हणून लक्षात घेतले तरी वावगे ठरणार नाही.

मित्रांनो फुटबॉल हा अनेक देशांमध्ये प्रसिद्ध असलेला खेळ आहे. अगदी ऑलम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये देखील आहे याचा बोलबाला आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना किंवा स्वतःलाही फुटबॉल बद्दल आवड असेल तर नक्कीच ती जोपासायला हवी. ज्यामुळे कदाचित तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील करू शकाल.

FAQ

फुटबॉल या खेळाचा जनक कोणाला म्हटले जाते?

अमेरिकन फुटबॉल चे जनक म्हणून ७ एप्रिल १८५९ रोजी जन्मलेल्या वाल्टर चान्सी कॅम्प यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म न्यू ब्रिटन, कनेक्टिकट येथे झाला होता.

फुटबॉल हा कोणत्या प्रकारातील खेळ आहे?

फुटबॉल हा एक सांघिक प्रकारचा व मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे.

फुटबॉल या खेळाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?

फुटबॉल या खेळाला सॉकर आणि रग्बी इत्यादी नावांनी ओळखले जाते.

फुटबॉल चे मैदान कसे असते?

फुटबॉलचे मैदान हे आयताकृती म्हणजेच १०० बाय ७० मीटर अंतराचे व गवतानी किंवा कृत्रिम टर्फ ने अच्छादलेले असते.

फुटबॉल च्या एका सामन्याचा वेळ किंवा कालावधी किती असतो?

फुटबॉल च्या एका सामन्याचा वेळ हा ४५ मिनिटे इतका असतो, तर संपूर्ण सामना हा ९० मिनिटांचा असतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण फुटबॉल या खेळाविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आणि आपल्या इतर मित्र मैत्रिणींना आणि फुटबॉल खेळाची आवड असणाऱ्या व्यक्तींना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment