पर्यावरणची संपूर्ण माहिती Environment Information In Marathi

Environment Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पर्यावरण म्हणजे काय, तर जास्त खोलात न शिरता सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास निसर्गातील सर्व गोष्टी म्हणजे पर्यावरण होय. त्यामध्ये आपल्याला अन्न पुरवणारी झाडे, स्वच्छ आणि ताजा प्राणवायू पुरवणारी हवा या सर्व गोष्टी पर्यावरणातच मोडतात.

Environment Information In Marathi

पर्यावरणची संपूर्ण माहिती Environment Information In Marathi

पर्यावरण म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेटवस्तूच म्हणता येईल. या पर्यावरणाला निरोगी ठेवले की आपलं आरोग्य देखील आपोआपच निरोगी होतं, हे आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीच हेरलं होतं. मात्र आजकाल पर्यावरणामध्ये सर्वत्र प्रदूषनाने थैमान घातल्यामुळे हॉस्पिटलमध्ये फार गर्दी वाढत चालली आहे. आजकाल जो तो उठतो आणि स्वतःच्या स्वार्थासाठी नैसर्गिक पर्यावरणाचे शोषण करतो.

झाडे तोडणे, प्रदूषण करणे, कचरा करणे, नद्या दूषित करणे हे जणू आपलं कर्तव्य असंच समजून काही लोक या सगळ्या गोष्टी करत आहेत. मात्र याचे परिणाम आज दिसत आहेत, आणि हे असेच चालू राहिले तर पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवन जगणं अतिशय कठीण होऊन जाईल.

आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण या विषयावरची संपूर्ण माहिती बघणार आहोत…

मित्रांनो, कुठलीही गोष्ट गळ्याची आली की मगच तिचे महत्त्व जाणणारी जात म्हणजे मानव जात होय. आज पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वावर गदा यायची लक्षणे दिसू लागल्यामुळे माणूस पर्यावरणाप्रती जागा झाला आहे. मात्र इतके दिवस पर्यावरणाचे केवळ आणि केवळ शोषण करणे हेच मानवाला ठाऊक होते. आता मानवाने पर्यावरणाप्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरुवात केली आहे.

यामध्ये अनेक कार्यक्रमाचा समावेश होतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम किंवा दिन म्हणून ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो, तो पर्यावरणाचे महत्त्व समजून घेऊन पर्यावरणाचे रक्षण करणे, आणि पर्यावरणाला पूर्वपदावर आणणे यासाठी.

पर्यावरण रक्षणाचे उपाय:

मित्रांनो, पर्यावरण रक्षण करणे ही एखादी मोठी पॉलिसी राबवून शक्य होण्यासारखी गोष्ट नाही, यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून फुल न फुलाची पाकळी म्हणून कार्य करायला हवे. अगदी आपल्या घरात निघणारा रोजचा कचरा त्याचे प्रमाण कमी करून, आणि वर्गीकरण करून योग्य विलट लावली तर काहीच दिवसात कचऱ्याचा ढिगाचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होईल.

तसेच प्लॅस्टिक जे की पुनर्वापर ही करता येणार नाही आणि रिसायकल देखील करता येणार नाही, अशा प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळायला पाहिजे. तसेच टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याकडे भर दिला पाहिजे. गृहिणीनी ओला कचरा साठवून त्यापासून कंपोस्ट बनवले, तर घरच्या बागेला देखील खत उपलब्ध होईल. आणि पर्यावरणात ओल्या कचऱ्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो देखील मार्गी लागण्यास मदत होईल, जेणेकरून हवेतल्या विषारी वायूंचे प्रमाणही घटेल.

कारखानदार लोकांनी सुद्धा आपल्या नैतिक जबाबदाऱ्या जाणून घेतल्या पाहिजेत, आणि सांडपाणी नदीमध्ये सोडण्याआधी त्यावर प्रक्रिया केली जावी. जेणेकरून पाण्यातील जैववसृष्टीला कुठलीही हानी पोहोचणार नाही, आणि पाण्याचे प्रदूषण देखील होणार नाही.

पर्यावरणाची काळजी आपले एक नागरी कर्तव्य:

मित्रांनो, पर्यावरणाची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे एक नागरी कर्तव्य तर आहेच, मात्र त्याआधी देखील ते आपले नैतिक कर्तव्य आहे. वृक्षतोड केल्याने हवेतील विषारी वायू शोषण घेण्याचे प्रमाण कमी झालेले आहे, त्याचबरोबर जागतिक तापमान वाढीची समस्या आपले डोके वर काढत आहे. 

त्याचा परिणाम पावसावर सुद्धा होत आहे, परिणामी शेतीतील उत्पन्न देखील घटत आहे. हे सगळे आपल्या पर्यावरणाप्रती नसलेल्या जागृतीमुळेच होते, पर्यावरणाच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे वाढत झालेले प्रदूषण होय. आजकाल ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण इत्यादी सर्वच प्रकारचे प्रदूषण वाढत चाललेले आहेत. त्यामध्ये प्रमुख स्वरूपात जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण अतिशय घातक बनत चालले आहे.

वायु प्रदूषणामुळे आणि जलप्रदूषणामुळे वनस्पतींना हानी पोहोचत आहे. पिके देखील विषारी होत चाललेली आहेत. हेच कमी की काय म्हणून पर्यावरणाने देखील आपली प्रणाली बदलायला सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून अवेळी पडणारा पाऊस, गरज असताना पडणारा दुष्काळ, बघायला मिळतो. प्रत्येकाला वाटते मी एकट्याने केलेले प्रदूषण असे काय वाईट ठरणार आहे, मात्र तुमच्यासारखाच विचार प्रत्येक जण करू लागला तर सर्वत्र केवळ आणि केवळ प्रदूषणात वाढ होईल.

ज्याची किंमत आपल्याला आज मोजायला लागू किंवा नाही लागू, मात्र आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींना त्याचा खूप त्रास होईल, त्यांचे जीवनमान संपूर्णपणे ढासळू शकेल. विविध संसाधनांचा ऱ्हास झाल्यामुळे आणि अतिवापर केल्यामुळे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींसाठी सुद्धा खूप मोठा संघर्ष करावे लागेल. आणि त्यातून मानव जातीचे पुन्हा अधोगतीकडे वाटचाल सुरू होईल जे खूपच घातक असेल.

निष्कर्ष:

आज आपण जी काही पर्यावरणाविषयी माहिती पाहिली त्यातून एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवली असेल, ती म्हणजे पर्यावरण रक्षण करणे किती गरजेचे आहे. पर्यावरण ही निसर्गाची देणगी असून, निसर्गाने ज्या रूपात आपल्याला गोष्टी दिल्या त्यांची त्याच स्वरूपात जोपासना करणे आज फारच गरजेचे झाले आहे. पूर्वीच्या काळी नद्या सुद्धा अगदी स्वच्छ असायच्या. कोणीही अगदी शीळ घालत नदीकिनारी फिरत असायचे.

तहान लागली की नदीतलेच पाणी पिले जायचे, मात्र आज अशी परिस्थिती झाली आहे की, नदी शेजारून जाताना शीळ घालत चालणं सोडा, नाक दाबून चालावे लागते. नागरी शहरांमध्ये तर पर्यावरणाचा प्रश्न अगदी ऐरणीवरच आलेला आहे. या पर्यावरणाच्या रक्षणासाठी वेळीच उपाय केले नाही तर आपल्या मानव जातीसाठी अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

मित्रांनो, पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वतःपासून छोटीशी सुरुवात केली, तर अवघा भारत पर्यावरणाने समृद्ध व्हायला काही महिनेच पुरेसे असतील. तरी सर्वांनी आजच ध्यास घ्यायला हवा, की आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी आपण आज पर्यावरण वाचवलच पाहिजे, आणि त्यानुसार प्रत्येकाने अंमल देखील करायला हवा .

पर्यावरण मराठी निबंध/ Paryavaran marathi nibandh lekhan /पर्यावरण माहिती✍️

पर्यावरण मराठी निबंध/ Paryavaran marathi nibandh lekhan /पर्यावरण माहिती✍️Your Queriesपर्यावरण निबंधपर्यावरण माहितीपर्यावरणपर्यावरण या विषयावर निबंधलेखनपर्या...

FAQ

पर्यावरणाला का महत्व दिले जाते?

आपल्या निरोगी राहणीमानासाठी, आणि पृथ्वीवरील सर्व स्त्रोतांना पुढील पिढींसाठी जपून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे महत्त्व विशद केले जाते. आपण आणि इतरही प्राणी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी पर्यावरणावर अवलंबून आहोत. त्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व आहे.

पर्यावरण प्रति आपली काय कर्तव्य आहेत?

पर्यावरणाचे रक्षण करणे आणि पर्यावरणास दूषित न होऊ देणे व पुढील पिढीसाठी पर्यावरणातील घटक राखले जावे यासाठी प्रयत्न करणे हे आपले पर्यावरणाप्रती कर्तव्य आहेत.

आजकाल पर्यावरण का धोक्यात येऊ लागले आहे?

प्रदूषणामुळे पर्यावरणातील बऱ्याचशा घटकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे.

पर्यावरणाचा आरोग्यावर परिणाम होतो का?

होय नक्कीच, पर्यावरण आणि सृष्टीतील सर्व चराचरांचे आरोग्य याचा फारच जवळचा संबंध आहे. पर्यावरण दूषित झाल्यास आरोग्यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. मात्र चांगल्या पर्यावरणात काही दिवस राहिल्यास माणूस अगदी फ्रेश आणि ताजातवाना होतो.

पर्यावरणामध्ये सूक्ष्मजीवांचा समावेश होतो का?

नक्कीच, पर्यावरणामध्ये सर्व सृष्टीचा समावेश होतो, ज्यामध्ये सूक्ष्मजीव देखील येतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण याविषयीची माहिती पाहिली. ही माहिती वाचून तुम्हाला या माहितीप्रमाणे अंगीकार करून आपल्या पर्यावरणाला वाचवायचे आहे. ही शपथ प्रत्येकाने घ्यायलाच हवी, आणि पर्यावरणाचे भान नसणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती नक्कीच शेअर करायला हवी.

धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment