गरुड पक्षाची संपूर्ण माहिती Eagle Bird Information In Marathi

Eagle Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सर्वात शक्तिशाली पक्षी म्हणून गरुडाचे नाव घेतले जाते. हा एक शिकारी प्रकारातील पक्षी असून, तो आराम कमी आणि कार्यरत जास्त वेळ असतो. उंचीला मोठा आणि अतिशय शक्तिशाली असणारा हा पक्षी बहुतांश वेळा आकाशातच आढळून येतो. त्याची चोच ही अतिशय शक्तिशाली असते.

Eagle Bird Information In Marathi
Eagle Bird Information In Marathi

गरुड पक्षाची संपूर्ण माहिती Eagle Bird Information In Marathi

गरुड हा पक्षी मुख्यत्वे करून युरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांमध्ये आढळून येतो. या पक्षाच्या बाल्ड आणि गोल्डन इगल या दोन प्रजाती मुख्य आहेत. गरुड शरीरयष्टीने आणि उडण्याचा कौशल्यामध्ये गिधाडाप्रमाणे असला तरी देखील त्याचे डोके पूर्णतः वेगळे असते. तसेच त्याच्या पायांना दोन मजबूत असे वक्र टॅलेन्स असतात. जगभरात गरुडाच्या सुमारे ५९ प्रजातींची नोंद झालेली आढळते.

शास्त्रीय वर्गीकरणानुसार गरुडांचे चार प्रकार पडतात. ज्यामध्ये समुद्री मासे गरुड, स्नेक गरुड, हारपी इगल, आणि चौथा बुटेड ईगल्स असे प्रकार पडतात. गरुडाची मादी ही नरापेक्षा कितीतरी पट आकाराने मोठी असते, आणि वजनाने सुद्धा नर गरुडा पेक्षा मादी ३० टक्के जास्त असते. गरुडाचे सरासरी आयुर्मान हे प्रजातीनुसार वेगवेगळे असले तरीदेखील बाल्ड इगल आणि गोल्डन इगल अशा दोन्ही प्रकारातील गरुड अंदाजे ३० वर्षांहूनही अधिक काळ जगतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गरुड या पक्षाविषयी माहिती घेणार आहोत…

नाव गरुड
इंग्रजी नावईगल
राज्यअँनिमालिया
फायलमकोरडेटा
वर्गएविज किंवा पक्षीवर्गीय
ऑर्डरAccipitriformes
कुटुंब किंवा कुळAccipitridae

मित्रांनो, गरुड पक्षाचे शरीर फिजिफॉर्म प्रकारातील असते. म्हणजेच ते मध्ये फुगीर आणि दोन्ही टोकांना बारीक असते. ज्याचा वापर उडण्यासाठी केला जातो. अतिशय तीक्ष्ण टोक असलेली वक्र प्रकारची चोच हे गरुड पक्षाचे एक वैशिष्ट्य समजले जाते. ही चोच गरुड पक्षाद्वारे हुकाप्रमाणे वापरली जाते, आणि शिकारीचे शरीर फाडले जाते.

गरुडाचे डोळे देखील खूप पावरफुल असतात, ज्या मार्फत गरुड पाच मैलांपर्यंत देखील बघू शकतात. त्याचबरोबर हे गरुडाचे पंख देखील खूपच शक्तिशाली, लांब, पसरट आणि रुंद असतात. त्यामुळे ते अगदी दहा हजार मीटर उंचीपर्यंत सुद्धा उडू शकतात. ज्यावेळी गरुड पक्षी आपले पंख हवेत पसरवतो, त्यावेळी तो कुठल्याही प्रयत्नाशिवाय संथ हवेमध्ये तरंगत असतो.

गरुड पक्षाचे रंग:

मित्रांनो, गरुड पक्षांच्या अनेक प्रजाती आढळतात, हे आपल्याला माहितीच आहे. आणि या प्रजातीनुसार त्यांच्या रंगांमध्ये आणि पिसाऱ्यामध्ये फरक असतो. गरुडाच्या रंगांमध्ये तपकिरी, विटकरी, करडा, पांढरा, निळा, काळा व राखाडी रंगांचा समावेश होतो. परिपक्वतेपूर्वी बाल्ड इगल्स हे तपकिरी रंगाचे असतात. प्रौढ गरुडाला चांगला मोठा पिसारा असतो.

गरुड पक्षाचे वजन:

मित्रांनो, रंगाप्रमाणेच गरुड पक्षाचे वजन देखील त्याच्या प्रजातीनुसार ठरत असते. हारपी प्रजातीतील गरुडाचे वजन हे सात किलो पासून नऊ किलो पर्यंत नोंदवले गेलेले आहे. तसेच या प्रजातीचे वजन ७०० ग्रॅम पासून एक किलो पर्यंत असते.

गरुड पक्षाचे आकारमान:

गरुड हे आकाराने प्रचंड मोठे असणारे पक्षी असतात, जे सुमारे दोन ते तीन फूट लांब असू शकतात. त्यांच्या दोन्ही पंखाची मिळून लांबी देखील सुमारे दीड ते दोन मीटर पर्यंत असते. जी फुटांमध्ये सहा फुटापर्यंत भरते. गरुड पक्षांमधील हरपी ईगल ही प्रजाती आकाराने सर्वात मोठी असते. ज्याच्या पंखाचा घेर हा आठ फूट तर लांबी सुमारे साडेतीन ते चार फुटापर्यंत असते.

गरुड पक्षाचे राहण्याचे ठिकाण:

मित्रांनो, गरुड हा असा पक्षी आहे जो वेगवेगळ्या वातावरणात स्वतःला मिसळून घेतो. असे असले तरी देखील दिवसातला बहुतांश वेळ हा पक्षी आकाशातच व्यतीत करत असतो. त्याच्या राहण्याच्या ठिकाणांमध्ये पाणथळ जमिनी, कमी घनदाट जंगले, तलावाचे काठ आणि गवताळ प्रदेशाचे ठिकाण इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो. पृथ्वीवरील अंटार्टिका खंड आणि न्यूझीलंड देश वगळता इतर सर्व ठिकाणी गरुड पक्षाचे कमी अधिक प्रमाणात अस्तित्व दिसून येते.

गरुड पक्षाच्या खानपानाच्या सवयी:

मित्रांनो, गरुड हा पक्षी मांसाहारी आहे हे आपल्याला माहितीच आहे. तो आपल्या भोजनामध्ये सरपटणारे विविध प्राणी, मासे, लहान पक्षी, छोटेसे कीटक, लहान सस्तन प्राणी, अळ्या, गोगलगाय इत्यादी गोष्टी खातात.

गरुड पक्षांमधील पुनरुत्पादन:

मित्रांनो, साधारणपणे पाच वर्षाचे झाले की गरुड पक्षी पुनरुत्पादनासाठी सज्ज होतात. ज्यावेळी भरपूर प्रमाणात अन्न उपलब्ध असते, अशावेळी गरुड पक्षी प्रजननाचा विचार करतात. जे सहसा वसंत ऋतू मध्ये असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे पक्षी अंडे घालतात. अंडे उबवण्याच्या कालावधीमध्ये नर मादीला अन्न आणून देण्याचे कार्य करतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज आपण पक्षी वर्गीय प्राण्यांमध्ये सर्वात शक्तिशाली असणारा पक्षी म्हणजेच गरुड या विषयी माहिती पहिली. मित्रांनो गरुड हा खूप उंच उडणारा पक्षी आहे. तो उडण्यामध्ये फार तरबेज आहे, मित्रांनो गरुड हा अतिशय हुशार असा पक्षी आहे, तो आपला बराचसा वेळ हवेमध्ये उडण्यातच घालवतो.

गरुड हा असा एक पक्षी आहे ज्याने निसर्ग बदलाच्या नियमाचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही कठीण प्रसंगी तो स्वतःला बदलून घेतो. ज्यामुळे अजून पर्यंत गरुड नाश पावलेला नाही. त्याचा हा गुण मानवाने घेतला पाहिजे, जेणेकरून जे लोक स्वतःला चांगल्या कारणासाठी बदलून घेत नाहीत, ते देखील बदलासाठी प्रवृत्त होतील.

मात्र निसर्ग बदलाला धैर्याने तोंड देणारा हा पक्षी प्रदूषणामुळे आणि विषबाधामुळे धोक्यात आलेला आहे. तसेच अनेक लोक या पक्षाची शिकार करतात, त्यामुळे देखील या पक्षाची लोकसंख्या कमी होत आहे. यावर मानवाने लक्ष दिले पाहिजे, आणि शिकार करण्यावर प्रतिबंध घालण्याबरोबरच, प्रदूषणाचे प्रमाण देखील कमी केले पाहिजे. तसेच गरुड पक्षाचे नैसर्गिक अधिवास नष्ट होण्यापासून वाचविले पाहिजे, तेव्हाच कुठेतरी गरुड पक्षी वाचला जाईल.

FAQ

पक्षांचा राजा कोणाला म्हटले जाते?

पक्षांचा राजा म्हणून गरुडाला ओळखले जाते. त्याच्या उंच उडण्याची क्षमता, मजबूत शरीर, भारदस्त पंख, आणि टोकदार चोच इत्यादी वैशिष्ट्यांमुळे त्याला हा किताब देण्यात आलेला आहे.

सर्वात शक्तिशाली पक्षी म्हणून कोणाला ओळखले जाते?

मित्रांनो आकाराने सर्वात मोठा पक्षी शहामृग असला, तरी देखील मजबुती आणि ताकतीच्या बाबतीत गरुड हा पक्षी उजवा ठरतो. तो आपल्या पायांच्या नख्यांनी आणि त्वचेने कुठल्याही प्राण्याचे मांस फाडण्यासाठी सक्षम असतो. त्याचे पाय अतिशय मजबूत असतात, तसेच पंख देखील उंच  भरारी घेण्यासाठी प्रचंड मोठे असतात. तो स्वतःच्या वजनाबरोबरच शिकार घेऊन देखील हवेत उडू शकतो.

गरुडाची दृष्टी कशी असते?

गरुडाची दृष्टी ही मानसापेक्षा आठ पटीने पावरफुल असते, ज्यामुळे गरुड तब्बल पाच मैल दूर असणाऱ्या गोष्टी देखील बघू शकतात.

गरुड कोणत्या प्रकारचे अन्न खातो?

गरुड हा पक्षी मुख्यत्वे साप खातो, त्याचबरोबर मासे, इतर पक्षी, ससे या प्राण्यांचे मांस गरुड खात असतो.

गरुड एका वेळी किती फूट उंचीपर्यंत उडण्याचे सामर्थ्य ठेवतो?

मित्रांनो, गरुडाचे पंख हे अतिशय शक्तिशाली असतात.  त्यामुळे गरुड साधारणपणे दहा हजार फूट उंचीपर्यंत सुद्धा उडू शकतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गरुड या पक्षाबद्दल माहिती पाहिली. या माहीतीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, ते आम्हाला कमेंटमध्ये अवश्य सांगा, आणि काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट मध्ये लिहून पाठवा. आणि सोबतच ही माहिती तुमच्या इतरही पक्षांची आवड असलेल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment