पाळीव प्राण्यांची संपूर्ण माहिती Domestic Animals Information In Marathi

Domestic Animals Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो संपूर्ण निसर्गामध्ये मानवाला सर्वात जास्त बुद्धी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे या बुद्धीच्या जोरावर मानवाने अनेक प्राण्यांना पाळून त्यांपासून आर्थिक फायदा मिळवलेला आहे. प्राण्यांनी देखील विविध उत्पादने आणि कार्य करत मानवासाठी उत्पन्न मिळवून दिलेले आहे, त्यामुळे प्राण्यांची भूमिका ही मानवी जीवनात नेहमीच महत्त्वपूर्ण ठरली आहे. मानवाचे जीवन सुसह्य होण्यासाठी मानवाने अनेक प्रकारचे प्राणी पाळलेले आहेत, त्यामध्ये कुत्रा, गाय, मेंढी, म्हैस इत्यादी प्राण्यांचा मुख्यत्वे समावेश होतो.

Domestic Animals Information In Marathi

पाळीव प्राण्यांची संपूर्ण माहिती Domestic Animals Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण पाळीव प्राण्यांबद्दल माहिती बघणार आहोत…

कुत्रा:

मित्रांनो, अगदी गावाकडील लोकांपासून शहरातील लोकांपर्यंत सर्वांचा आवडीचा पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा होय. प्रत्येक जण आपल्या घरामध्ये एकदा तरी कुत्रा पाळतच असतो. मूळचा मांसाहारी आणि शिकारी प्रकारातील असणारा हा प्राणी पाळीव बनवल्यामुळे मात्र शाकाहारी अन्न खात असतो.

कुत्र्यांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो, ज्यामध्ये अमली पदार्थ शोधणे, शिकार करणे, लढाई मध्ये वापरणे, बचाव करणे, घराचे संरक्षण करणे, विविध थेरपी करणे, प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये वापर करणे, पेट्रोलिंग करणे, कीटकांचे नियंत्रण करणे, पशुपालनाकरिता राखणदार म्हणून निवडणे इत्यादी विविध कामासाठी वापर केला जातो. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या रेसिंग देखील भरविल्या जातात, तर काही ठिकाणी कुत्र्यांच्या झुंजी देखील लावल्या जातात.

शेळी:

मित्रांनो, गरिबांची गाय म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे शेळी होय. शेळी हा कॅपरा वंशातील प्राणी असून तिला कॅपरा हिरकस या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. हे एक सस्तन प्राणी असून आपल्या पिलांना थेट जन्म देते. प्राळीव शेळ्यांचे दूध खाण्यासाठी देखील वापरले जाते. ते अतिशय पौष्टिक स्वरूपाचे असते, आणि गाईच्या दुधापेक्षा अधिक उत्तम घटक त्यामधून मिळले जातात. शेळी हा प्राणी सर्वप्रथम इराण या देशांमध्ये आढळून आला होता.

शेळ्या या अनेक कारणांनी पाळल्या जातात, यातील मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मांसासाठी पाळल्या जातात. त्याचबरोबर त्यांच्यापासून मिळणारे दूध, त्यांच्या अंगावरील केस, त्यांची कातडी, शिंगे, त्यांपासून मिळणारे शेणखत, इत्यादी गोष्टीसाठी वापरले जाते.

मेंढी:

मित्रांनो, बऱ्याच अंशी शेळीशी साम्यता दर्शवणारा प्राणी म्हणजे मेंढी होय. ओवीस मेष हे शास्त्रीय नाव असणाऱ्या मेंढ्या देखील सस्तन प्राण्यांच्या गटातच मोडतात. यांपासूनही शेळी प्रमाणेच दूध, चामडे, फायबर अर्थात लोकर, विविध शोभिवंत वस्तू, मांस, शिंगे यांसारखे उत्पादने मिळवली जातात.

गाय:

मित्रांनो, प्रत्येक शेतकरी माणसाच्या दारामध्ये एक तरी गाय आपल्याला दिसत असते, कारण शेतकरी असो किंवा इतर कोणी प्रत्येक जण भारतामध्ये गाईला देवता मानत असतो. या प्राण्यांपासून अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात. त्यामुळे तिला कामधेनू असे म्हणून देखील ओळखले जाते. बॉस या वंशातील असणारी गाय बॉस टॉरस या शास्त्रीय नावाने ओळखली जाते. गायीपासून सर्वात महत्त्वाचा मिळणारा पदार्थ किंवा उत्पादन म्हणून दुधाकडे बघितले जाते.

आज गाईंच्या दुधावर अनेक लोक मोठे झालेले आहेत. याबरोबरच गाईंच्या शिंगापासून विविध शोभिवंत वस्तू बनवल्या जातात. गाईचे रक्त, चामडी, इत्यादी देखील वापरले जाते. शिवाय गाईच्या शेणखतामध्ये जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढवण्याचे गुपित लपलेले आहे.

काही ठिकाणी गाईंचे मांस देखील खाल्ले जाते. मित्रांनो गाई पासून अनेक फायदे मिळत असले तरी देखील त्यातील नर अर्थात बैल देखील विविध शेती कामाकरिता, शर्यती करिता, किंवा लढाई प्रकारातील मनोरंजनाकरिता वापरले जात असतात.

म्हैस:

मित्रांनो, गाई खालोखाल पाळला जाणारा दुसरा दुग्धयुक्त प्राणी म्हणून म्हशीचा क्रमांक लागतो. गाईपेक्षा आकाराने प्रचंड असणारा हा प्राणी बुबलस या वंशामधील आहे, तर या प्राण्याचे शास्त्रीय नाव बुबलस बुबलीस असे आहे. म्हशी या सस्तन प्राणी असून त्यांना पाण्यामध्ये राहणे फार आवडते.

म्हशींचा वापर प्रामुख्याने दुधासाठी केला जातो, यासोबतच त्यांचे शेण, मल, मूत्र, यांपासून खते बनविले जातात. शिवाय शिंगे, कातडी, हाडे यांपासून अनेक उत्पादने कमावली जातात. भारतासह चीन व फिलिपाईन्स या दोन देशांमध्ये देखील हा प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

घोडा:

मित्रांनो, अगदी प्रत्येकच व्यक्ती घोडा पाळत नसला, तरी देखील घोड्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते. घोडा हा इक्वस फेरस या प्रजातीचा असून इक्वस फेरस कॅबॅलस हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. घोडे हे सस्तन प्रकारातील प्राणी असून, पूर्वीच्या काळी मुख्यत्वे त्यांचा वापर हा दळणवळणाकरिता केला जाई. यासोबतच त्यांच्यापासून मनोरंजन देखील मिळवले जाई. त्यामध्ये घोड्यांच्या शर्यती, किंवा घोड सवारी यांच्यासारखा गोष्टींचा समावेश होतो.

अनेक लोक आजकाल आपले सामाजिक स्टेटस मेंटेन ठेवण्याकरिता देखील घरी घोडे पाळत असतात, तर घोड्यातील कमी दर्जाच्या प्रजाती अर्थात खेचरचा वापर कष्टकरी लोकांकडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सामान वाहतुकीसाठी केला जातो. याचे सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे गावोगावी मेंढ्या चारण्याचे काम करणारे लोक. हे लोक दुसऱ्या गावी जाताना खेचर प्रकारातील घोड्यांवर आपले सामान लादत असतात.

निष्कर्ष:

मानवी आयुष्यात नेहमीच अतिशय महत्वाच्या ठरणाऱ्या आणि माणसाच्या सहवासात राहणाऱ्या प्राण्यांना आपण पाळीव प्राणी म्हणून ओळखतो. या पाळीव प्राण्यांमुळे मानसाने मोठ्या प्रमाणावर प्रगती साध्य केलेली आहे. जर प्राण्यांनी मानवाला साथ दिली नसती तर कदाचित दहा ते शंभर वर्षांपर्यंत देखील मानव प्रगतीच्या बाबतीत मागे राहिला असता. त्यामुळे मानवासाठी प्राणी अतिशय महत्त्वाचे समजले जातात.

आजच्या भागामध्ये आपण जी पाळीव प्राण्यांबद्दल माहिती बघितली त्यामध्ये तुम्हाला विविध गोष्टींची जाणीव झाली असेल, त्यामध्ये तुम्ही कुत्रा, मेंढी, जनावरे, मांजर, कोंबड्या, गाढव, म्हैस, यांसारख्या कार्यक्षम प्राण्यांसोबतच विविध शोभिवंत प्राणी जसे की बदक, याक, हंस, कबूतर यांचा देखील समावेश होतो.

FAQ

जागतिक आकडेवारीनुसार किती प्रकारचे पाळीव प्राणी पाळले जातात?

एका संशोधनानुसार आणि मिळालेल्या उपलब्ध आकडेवारीनुसार घरामध्ये सुमारे ३८ प्रकारच्या प्रजातींचे ८८०० पेक्षाही जास्त जातींचे प्राणी पाळले जातात. ही आकडेवारी संयुक्त राष्ट्राचे अन्न व कृषी संघटना यांनी जाहीर केलेली आहे.

पाळीव प्राण्याचा मानवाच्या आयुष्यामध्ये कशा रीतीने फायदा होतो?

मित्रांनो, वेगवेगळ्या प्राण्यांचा मानवी जीवनावर वेगवेगळ्या प्रमाणात फायदा होत असतो. त्यामध्ये कुत्रा घराचे रक्षण करणे, गाय म्हैस या दूध देण्यासाठी, बैल किंवा तत्सम प्राणी शेती कामाच्या किंवा कष्टाच्या कामासाठी वापरले जातात. तर काही प्रकारचे प्राणी जसे शेळी, मेंढी, कोंबड्या, या मांस उत्पादनासाठी व अंडी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

पाळीव प्राणी कोणाला म्हटले जाते?

जे प्राणी अनेक पिढ्यांपासून मानवासमवेत राहत आहेत, त्यांची प्रजाती निवडक असून मानवाने आपल्या गरजेनुसार त्यांच्यामध्ये अनुवंशिक बदल घडवून आणलेले आहेत. आणि जे जंगली प्रजातींपेक्षा अनुवंशिक रूपाने भिन्न आहेत, अशा प्राण्यांपासून मानवाला आर्थिक फायदा होतो यांना पाळीव प्राणी म्हटले जाते.

गाय हा प्राणी पाळताना त्यांच्यामध्ये काय बदल केले जातात?

गाय हा प्राणी पाळण्याकरिता वापरायचा असेल तर जन्मतःच त्यांची शिंगे जाळून काढली जातात, त्याचबरोबर गर्भधारणे वेळी त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त दूध देण्यासाठी अनुवंशिक बदल केले जातात.

गाय या प्राण्याचा कशाप्रकारे वापर केला जातो?

गाय या प्राण्यातील मादीचा उपयोग हा मुख्य दुधासाठी आणि नवीन वासरे जन्माला घालण्यासाठी केला जातो, तर नराचा उपयोग शेतीची कामे आणि ओढकाम करणे यासाठी केला जातो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण विविध पाळीव प्राण्यांबद्दल माहिती पाहिली, यातील बरीच माहिती तुम्हाला असली तरी देखील लहानपणापासून शहरांमध्ये वाढलेल्या लोकांना पाळीव प्राण्यांबद्दल नेहमीच आकर्षण असते. त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण ठरली असेल, याबाबत काहीही शंका नाही. अशीच माहिती तुमच्या शहरांमध्ये राहणारे मित्र-मैत्रिणींना देखील वाचायला मिळावी याकरता ही माहिती त्यांच्यापर्यंत पाठवण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment