कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती Dog Animal Information In Marathi

Dog Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजकाल विश्वास ही गोष्ट फारच महाग झालेली आहे. आज कोणीही कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही, मात्र या अविश्वासाच्या जगात देखील एक विश्वासू प्राणी म्हणून कुत्रा नेहमी मालकावर निष्ठा ठेवून असतो. फार पूर्वीपासून पाळण्यात आलेला हा कुत्रा प्राणी मनुष्यावर जीवापाड प्रेम करतो, आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मालकासाठी एकनिष्ठ राहतो.

Dog Animal Information In Marathi

कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती Dog Animal Information In Marathi

तो घरावर लक्ष ठेवणे, लहान मुलांना बाहेर जाऊ न देणे, अनोळखी व्यक्तींना घरी येऊ न देणे यांसारखी कामे अतिशय निष्ठेने करत असतो. कुत्रा हा मानवाची भाषा देखील समजू शकतो. तो मानवाबरोबर आणि लहान मुलांबरोबर खेळतो सुद्धा, तसेच त्याला मानवाचे बोलणे देखील समजते. कुत्रा मानवाच्या कुटुंबातील एका सदस्य प्रमाणेच राहतो. त्यामुळे प्रत्येकाचं कुत्र्यावर जीवापाड प्रेम करत असते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कुत्रा अर्थात श्वान या पाळीव प्राण्याबद्दल माहिती घेणार आहोत…

नावकुत्रा
इतर नावेश्वान, कुत्ता
इंग्रजी नावडॉग
शास्त्रीय नावकॅनिस ल्युपस फॅमिलियारीस
दररोजची झोप८ ते १० तास
सरासरी आयुष्यमान१० ते १४ वर्षे
साधारण वेग४० ते ४८ किलोमीटर प्रति तास
गर्भधारणेचा कालावधीसाधारण दोन महिने (५८ ते ६८ दिवस)
गटलांडगा कुळातील प्राणी

मित्रांनो, मानवाशी असलेल्या नात्यानुसार सर्व प्राणी एका बाजूला तर कुत्रा एका बाजूला असतो. अतिशय समाजिक असणारा हा कुत्रा प्राणी माणसाच्या प्रत्येक वळणाचा साक्षीदार असतो. कुत्रा हा असा प्राणी आहे, ज्याला न सांगता देखील तो आपल्या धन्याची अगदी रात्रंदिवस सेवा करत असतो. आणि आपल्या धन्याची किंवा मालकाची संपत्ती रक्षण करत असतो.

कुत्रा प्राण्याचे साधारण आयुष्यमान:

मित्रांनो, सामान्यपणे कुत्रा हा प्राणी १० ते १४ वर्षांपर्यंत जगतो. मात्र चांगली तब्येत असेल तर यामध्ये अजूनही दोन ते तीन वर्षांची वाढ होऊ शकते. शक्यतो पाळीव कुत्री जंगली कुत्र्यांपेक्षा अधिक काळ जगतात. कारण जंगली कुत्र्यांना आपले अन्न मिळवण्याकरिता मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागतो. आणि दुसऱ्या बाजूला पाळीव कुत्र्यांना मालकाची सेवा करण्याखेरीज दुसरे कार्य नसते. त्यामुळे ते अधिक काळ जगतात.

पाळीव कुत्र्यांना नेहमी मांस किंवा इतर प्रथिनयुक्त अन्न दिले जावे, जेणेकरून त्यांची वाढ अगदी निकोप आणि निरोगी होण्यास मदत होईल. आणि ही कुत्री आपल्यासोबत आणखी दोन ते तीन वर्ष जगू शकतील.

कुत्रा या प्राण्याची शिकार करण्याची पद्धत:

मित्रांनो, कुत्रा हा प्राणी लांडगा या गटात मोडतो. त्यामुळे नैसर्गिक रित्या त्याला शिकार करण्याचे दान मिळालेले आहे. तो आपल्या चार पायांच्या नख्या, आणि जबड्यातील टोकदार दात यामुळे शिकार करण्यास तरबेज होतो. कुत्रा हा मूळचा मांसाहारी प्राणी आहे, जो इतर लहान प्राण्यांना मारून खाण्यात धन्यता मानतो.

मात्र जेव्हापासून मानवाने कुत्र्यांना पाळण्याची सुरुवात केलेली आहे, तेव्हापासून त्यांना शाकाहारी प्रकारचे अन्न दिले जाते. ज्यामध्ये भाकरी, चपाती, तसेच आधुनिक काळामध्ये बाजारात मिळणारे कुत्र्याचे अन्न खाऊ घातले जाते.

संधी मिळाल्यास पाळीव कुत्रे देखील शिकार करण्यास प्राधान्य देतात. शेतामध्ये ज्यावेळी त्यांना एखादा ससा, मुंगूस, उंदीर, किंवा तत्सम प्राणी दिसतो किंवा घराच्या आसपास ज्यावेळेस पाळीव कोंबड्या मोकळ्या दिसतात, तेव्हा काही वेळेस हा कुत्रा प्राणी त्यांची शिकार करून खातो.

कुत्रा या प्राण्याची वास घेण्याची क्षमता:

मित्रांनो, कुत्रा या प्राण्याचे नाक अतिशय तीक्ष्ण असते, त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किमान एक कुत्रा तरी आढळून येतो. ज्यावेळी काही ठिकाणी गुन्हा घडला जातो तेथे या कुत्र्यांना वास घ्यायला लावले जाते, त्यानुसार गुन्हेगार कोणत्या दिशेला गेले आहेत ते वासावरून कुत्रे चांगलेच ओळखतात. मात्र या कामासाठी या कुत्र्यांना प्रशिक्षण द्यावे लागते.

मित्रांनो, गावाकडे असताना आपण अनेक वेळा रात्रभर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकला असेल. आपल्याला वाटते की हे कुत्री का भुंकत असतील, मात्र त्यामागे देखील एक कारण आहे. मानवाच्या कानापेक्षा कुत्र्याचे कान दहा हजार पट जास्त तीक्ष्ण असतात. त्यामुळे कुठेही थोडासा जरी आवाज झाला तरी देखील कुत्र्यांचे तिकडे लक्ष वेधले जाते, आणि मालकाला समजावे म्हणून कुत्रा त्या दिशेला बघत असतो. जेणेकरून संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकेल.

कुत्रा या प्राण्याविषयी काही तथ्य:

  • कुत्रा हा प्राणी त्याचा वास घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. मानवापेक्षा ४० पट अधिक तीव्रतेने हा कुत्रा वास घेऊ शकतो. त्यामुळे चोर, गुन्हेगार किंवा स्फोटक पदार्थ शोधण्याच्या कामी या कुत्र्यांचा वापर केला जातो.
  • कुत्र्याच्या नाकावर सतत ओलसरपणा असतो.
  • मानवाप्रमाणे कुत्रे देखील स्वप्न बघू शकतात.
  • वर्षभरात कुत्रे केवळ दोनदाच प्रजनन करतात.
  • जन्मतः कुत्र्याची पिल्ले ही आंधळी असतात.
  • कुत्रा हा प्राणी चॉकलेट पचवू शकत नाही, त्यामुळे कुत्र्यांना चॉकलेट देणे टाळायला हवे.
  • कुत्र्यांना मानवाची भाषा लवकर अवगत होत असते, आणि त्यानुसार ते सूचनांचे पालन देखील करत असतात.
  • ग्रे हाउंड ही कुत्र्यांची प्रजाती सर्वात वेगवान म्हणून ओळखली जाते.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कुत्रा या सर्वात एकनिष्ठ आणि विश्वासू प्राण्याबद्दल माहिती पाहिली. ज्यामध्ये तुम्ही कुत्रा पाळण्याची पद्धत, साधारण जीवनमान,  शिकारीची पद्धत, कुत्र्याच्या राखणदारीची सवय, त्याची वास घेण्याची व लक्षात ठेवण्याची क्षमता, आणि काही तथ्य इत्यादी बाबींवर माहिती घेतली.

मित्रांनो, कुत्रा या प्राण्याला सर्वात एकनिष्ठ किंवा विश्वासू प्राणी म्हणून ओळखले जाते. कारण एकदा कुत्रा पाळला की तो मरेपर्यंत मालकाची साथ कधीच सोडत नाही. आणि फारशी कुठलीही अपेक्षा न धरता मानवाच्या सर्व घरादाराचे आणि संपत्तीचे अगदी चोख रक्षण करत असतो.

कुत्रा हा इतका हुशार प्राणी आहे, तो माणसे अगदी सहजतेने ओळखू शकतो. त्यामुळे घरातील माणसे आल्यानंतर लोंडा घोळत खेळणारा हा कुत्रा बाहेरील परकी माणसे दिसले की जोरजोराने भुंकायला लागतो, आणि वेळप्रसंगी त्यांना चावतो देखील. अशा या कुत्र्याला मानव फार पूर्वीपासून पाळत आलेला आहे.

FAQ

कुत्रा हा प्राणी किती प्रमाणात हुशार असतो?

मित्रांनो, कुत्रा हा प्राणी फार हुशार आहे असे म्हटले जाते. मात्र कोरिया यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार दोन ते अडीच वयोगटातील लहान मुलाला ज्या प्रमाणात बुद्धी किंवा मानसिक क्षमता असते तेवढीच क्षमता कुत्र्यांच्या मेंदूची देखील असते. असे असले तरी देखील प्रजातीनुसार कुत्र्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये चढ-उतार बघायला मिळतात.

कुत्र्यांच्या डोळ्याबद्दल काय वैशिष्ट्ये सांगितली जाऊ शकतात?

मित्रांनो, विविध प्रकारचे रंग ओळखण्याकरिता डोळ्यांमध्ये विविध शंकू असतात. त्याप्रमाणे कुत्र्यांमध्ये केवळ दोनच प्रकारचे शंकू आढळून येतात, जे निळे आणि पिवळे रंग बघू शकतात. त्यामुळे कुत्र्यांच्या दृष्टीला डायक्रोमॅटीक असे देखील म्हटले जाते.

आज घडीला कुत्र्यांच्या प्रजाती पैकी कोणती प्रजाती सर्वात उत्कृष्ट समजली जाते?

मित्रांनो १९९१ सालापासून आजतागायत लेब्राडोर या कुत्र्याच्या प्रजातीने प्रथम क्रमांकावर स्थान धारन केलेले आहे. ही प्रजाती लोकांच्या मोठ्या प्रमाणावर पसंतीस उतरत असून या प्रजातीला ए के सी यांनी देखील मान्यता दिलेली आहे.

अंतराळासंदर्भातील कोणती गोष्ट कुत्र्यासंदर्भात आहे?

मित्रांनो, अंतराळामध्ये प्रवास करणाऱ्या प्राण्यांमध्ये कुत्रा हा प्राणी सर्वात प्रथम होता. इसवी सन १९५७ या वर्षी लाईका नावाच्या कुत्र्याला अंतराळामध्ये पाठवण्यात आले होते.

कोणत्या देशांमध्ये कुत्र्यांची संख्या सर्वाधिक प्रमाणावर आढळते?

अमेरिका या देशांमध्ये कुत्र्यांची संख्या सर्वाधिक प्रमाणावर आढळून येते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण श्वान अर्थात कुत्रा या प्राण्याविषयीची इत्यंभूत माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवतानाच, लागोलाग आपल्या इतरही मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment