दिवाळी सणाची संपूर्ण माहिती Diwali Festival Information In Marathi

Diwali Festival Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारतातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा सण नुकताच होऊन गेला. दरवर्षी अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण ज्याची आतुरतेने वाट बघत असतो तो सण म्हणजे दिवाळी. दिवाळीला इतर सणांपेक्षा अधिक महत्त्व देण्यात येते.

Diwali Festival Information In Marathi

दिवाळी सणाची संपूर्ण माहिती Diwali Festival Information In Marathi

हिंदू धर्मीय लोकांचा हा सर्वात मोठा उत्सव असून, दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. चांगल्याचा वाईट प्रवृत्तीवर विजय यांचे प्रतीक म्हणूनच दिवे लावून अंधारावर प्रकाशाच्या साह्याने विजय मिळविला जातो, आणि या दिव्यांची रांग म्हणजेच दीपावली म्हणून या सणाला ओळखले जाते. हा सण तब्बल चार ते पाच दिवस चालत असतो.

दिवाळी सण भारतात इतक्या उत्साहाने साजरा केला जातो की सुमारे एक महिन्या आधीपासूनच लोक घर आवरणे, फराळाचे साहित्य बनविणे, नवीन कपडेलत्ते खरेदी करणे, इत्यादी तयारी करत असतात. आणि दिवाळी संपल्यानंतर देखील लोक दिवाळीच्या नशे मध्ये गुंग असतात. यावेळी आपल्या हातातील सर्व कामे बाजूला ठेवून लोक या उत्साहात सहभागी होत आनंद साजरा करत असतात.

चला तर मग आजच्या भागामध्ये आपण सर्वांच्या प्रिय सणाबद्दल अर्थात दिवाळी बद्दल माहिती बघूया…

नावदीपावली
इंग्रजी नावदिवाळी / दिवाली
प्रकारसण उत्सव
साजरे करणारे लोकहिंदू धर्मीय
प्रतीकचांगल्याचा वाईटावर विजय
प्रमुख आकर्षणदिव्यांच्या ओळीने केलेली सजावट आणि फटाक्यांची आतिषबाजी

दिवाळी हा उत्सव साजरा करण्यामागील आख्यायिका:

मित्रांनो, रामायणामध्ये दशरथ पुत्र प्रभू श्री रामचंद्र यांना१४ वर्षाचा वनवास मिळाला होता, हे आपल्याला ठाऊकच आहे. ज्यावेळी वनवासाच्या शेवटच्या वर्षी म्हणजेच अज्ञातवासात असताना सीता मातेचे अपहरण झाल्यामुळे भगवान श्रीरामांना लंकाधिपती रावणाशी दोन हात करावे लागले होते.

हा विजय उत्सव साजरा करतानाच प्रभु श्रीरामांची वनवासाची वर्षे देखील संपली होती. त्यामुळे मोठ्या थाटामाटात प्रभू श्री रामचंद्रांचे पुन्हा अयोध्या मध्ये आगमन झाले होते. त्यावेळी प्रजेला प्रचंड आनंद झाला होता, त्यांनी हा आनंद विविध फटाक्यांच्या अतिषबाजीने, नवनवीन पोशाख घालून, दिव्यांच्या रांगा लावून, आरास करत, आणि गोडधोड पदार्थ बनवत साजरा केला होता. त्यामुळे या दिवसाची आठवण म्हणून पुढे प्रत्येक वर्षी हा सण साजरा केला जाऊ लागला.

तसेच दीपावलीच्या दिवशी माता श्री लक्ष्मीपूजन करण्यामागे देखील एक आख्यायिका आहे. ती म्हणजे समुद्रमंथन झाल्यानंतर धन देवता असणाऱ्या महालक्ष्मी यांचा जन्म झाला किंवा उदय झाला होता. आणि तो दिवस देखील हाच असल्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन देखील साजरे केले जाते.

दिवाळी आणि धार्मिक एकता:

मित्रांनो, दिवाळी हा कोण्या एकट्याचा सण नसून संपूर्ण भारताचा सण असल्यामुळे, हिंदू धर्मिय लोकांबरोबरच मुस्लिम, शिख, आणि जैन धर्मीय लोक सुद्धा हा सण मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने साजरा करतात. या दिवशी प्रत्येक धर्मीय लोक एकमेकांच्या घरी फराळाला जाऊन एकमेकांप्रतीचे प्रेम व्यक्त करत असतात. असे असले तरी देखील दिवाळीशी प्रत्येक धर्मीयांचे आपले असे खास नाते देखील जोडले गेलेले आहे.

प्रभू श्रीरामांच्या आगमनाचा दिवस आणि समुद्रमंथनादरम्यान माता श्री महालक्ष्मी यांचा प्रकट दिन म्हणून हिंदू धर्मीय लोक दिवाळी साजरी करत असले, तरी देखील जैन धर्मियांच्या मते दीपावलीच्या दिवशी भगवान महावीर यांनी आपले शरीर त्यागले होते. त्यामुळे जैन बंधू देखील हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात.

भारतीय दिवाळी साजरी करण्याची पद्धत:

मित्रांनो, भारतात दिवाळी अतिशय आनंद देणारा सण आहे. त्यावेळी संपूर्ण भारतभर सुट्टी साजरी केली जाते. तसेच नवनवीन कपडे घालून एकमेकांना आशीर्वाद देत आणि विविध दिवे आणि रांगोळ्यांनी आरास करत हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी लोक आपली घरे अतिशय आकर्षक रित्या सजवितात.

घरापुढे महिलावर्ग सडा टाकतो, आणि त्यावर छान छान रांगोळ्या देखील काढल्या जातात. पुरुष लोक संध्याकाळी आपल्या धनाची मांडणी करून संपूर्ण कुटुंब हे धन माता श्री महालक्ष्मी यांच्या बरोबरच पूजत असते.

दीपावली ची पूजा मांडण्याबद्दल:

मित्रांनो, दिवाळीची पूजा मांडणी हे देखील एक महत्त्वाची बाब मानली जाते. याकरिता पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे तोंड राहील अशा पद्धतीने पूजा मांडावी. पूजे भोवती रांगोळी घालून एक पाठ ठेवावा, आणि त्यावर कापड पसरावे. नंतर त्यावर माता लक्ष्मी यांची मूर्ती आणि सोबतच भगवान श्रीराम व गणेश यांची देखील मूर्ती ठेवावी. त्यानंतर आंब्याची पाने, नारळ आणि पाण्याच्या कलशाच्या सहाय्याने एक कलश तयार करून त्यावर स्वस्तिक काढावे.

आपले संपूर्ण धन या पूजेमध्ये मांडून त्या ठिकाणी विविध फळे, लक्ष्मीपूजन, मिठाई, फराळ इत्यादी देखील ठेवावे. त्यानंतर पूजा भोवती दिवे लावून आणि सर्व मुर्त्यांना अभिषेक करून आरती करावी. आरती नंतर सर्व मिठाई प्रसाद स्वरूपाने वाटप करून खावी.

निष्कर्ष:

मित्रांनो, शालेय मुले ज्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहतात, ती सुट्टी म्हणजे दिवाळीची सुट्टी. दिवाळी हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. तसेच, एक महत्त्वाचा हिंदू सण आहे.

या दिवशी लंकाधिपती रावणाचा पराभव करून आपल्या मायदेशी परतणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचा आगमन दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी सर्वत्र दिवे लावून आरास केली जाते, तसेच विद्युत रोषणाई देखील केली जाते. घरोघरी गोडधोड फराळ बनते. तसेच लहान मुले फटाके वाजवून जल्लोष साजरा करतात.

मात्र या सर्वांमध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून आपण निसर्गाचा देखील विचार केला पाहिजे, आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना देखील दिवाळीच्या निमित्ताने मदत करून त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी झाले पाहिजे. हा लेख वाचत असणाऱ्या प्रत्येकाने जरी अशा प्रकारे आपले आचरण केले, तरीदेखील हा लेख लिहिण्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

FAQ

दिवाळी कशा पद्धतीने साजरी केली जाते?

दिवाळीमध्ये सर्व घराची साफसफाई करून, हवं तर रंगरंगोटी केली जाते. छान छान गोड फराळ बनविले जातात. लहान मुलांना फटाके दिले जातात. नवीन नवीन आणि उत्तम प्रकारचे पोशाख खरेदी करून घातले जातात. दिव्यांच्या साहाय्याने आरास केली जाते, रांगोळ्या घातल्या जातात, तसेच एकमेकांना मिठाई वाटली जाते. आणि एकमेकांना फराळासाठी बोलाविले जाते.

दिवाळीच्या फराळामध्ये कोणकोणते पदार्थ बनविले जातात?

दिवाळीच्या फराळ मध्ये चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी, करंज्या, शेव इत्यादी पदार्थ बनवले जातात.

दिवाळी कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरी केली जाते?

लंकाधीपती रावणाचा पराभव करून आणि आपला चौदा वर्षांचा वनवास संपून ज्यावेळी प्रभू श्रीराम आपल्या मायभूमीवर परतले, त्या दिवसाच्या स्मरणार्थ दिवाळी हा सण साजरा केला जातो.

लहान मुलांना दिवाळी हा सण आवडण्यामागील काय कारण आहे?

रोजच्या चाकोरीतील जीवनाबाहेर जाऊन, लहान मुलांना नवनवीन पोशाख, गोड धोड फराळ, आणि वाजविण्यासाठी फटाके मिळाल्यामुळे मुलांना दिवाळी हा सण फार आवडतो.

दिवाळी या सणाच्या दिवशी कोणकोणत्या देवतांची पूजा केली जाते?

दिवाळी या सणाच्या दिवशी मुख्यत्वे श्री महालक्ष्मी या देवतेची पूजा केली जाते, त्याचबरोबर प्रभू श्रीराम आणि श्री गणेश यांची देखील पूजा केली जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण दीपावली या सणाबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. प्रत्येक भारतीयाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. त्यामुळे इतरांनाही या माहितीचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment