दिशांची संपूर्ण माहिती Direction Information In Marathi

Direction Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो असं म्हणतात की दिशा चुकली की माणसाची दशा व्हायला वेळ लागत नाही. जसं आयुष्यात वेळ ही महत्त्वाची असते तशी योग्य दिशा देखील फार महत्त्वाचे असते. आपल्याकडे मुख्य चार दिशा मानल्या जातात, आणि चार उपदिशा मानल्या जातात. तसेच वर आणि खाली यांना देखील काही वेळेस दिशा मानले जाते, अशा एकूण दहा दिशा आहेत. परंतु बऱ्याच लोकांना दिशांची नावे किंवा त्यांचा योग्य क्रम लक्षात राहत नाही.

Direction Information In Marathi

दिशांची संपूर्ण माहिती Direction Information In Marathi

काहींना तर आपण चाललो आहे ती दिशा कोणती हे देखील सांगता येत नाही. काही लोकांना मराठी दिशा लक्षात राहतात, मात्र इंग्लिश दिशा लक्षात राहत नाही. तर काहींच्या बाबतीत हे उलटे असते. काहींना कुठलीही दिशा विचारली की चटकन सांगतात, तर काही नेहमी डोकं खाजवताना दिसतात.

आजच्या भागामध्ये आपण विविध दिशा, उपदिशा, त्यांचे  वास्तुशास्त्रानुसार महत्त्व, त्यांची संपूर्ण माहिती याविषयी या लेखांमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग कुठल्याही विलंबाविना आपल्या माहितीला सुरुवात करूयात…

नावदिशा
प्रकारमुख्य दिशा, उप दिशा आणि इतर दिशा
मुख्य दिशांची नावेपूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा
उप दिशांची नावेआग्नेय दिशा, नैऋत्य दिशा, वायव्य दिशा, ईशान्य दिशा
इतर दिशांची नावेवर (ऊर्ध्व) आणि खाली

दिशा आणि त्यांची माहिती:

पूर्व:

मित्रांनो पूर्व उगवतीची दिशा म्हणून ओळखली जाते, या दिशेला वास्तुशास्त्रामध्ये सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या देवांची दिशा म्हणून ओळखले जाते. सकाळी सूर्याला ऊर्ध्व देण्यापासून कुठलेही धार्मिक, शैक्षणिक कार्य करताना पूर्वेकडेच तोंड केले जाते.

पश्चिम:

सूर्य मावळतीची पश्चिम दिशा वास्तुशास्त्रानुसार कुठलेही दुकान वसविण्यासाठी किंवा रासायनिक उत्पादने तयार करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.

उत्तर:

 मित्रांनो नकाशातील सर्वात वर दाखवली जाणारी दिशा म्हणजे उत्तर दिशा. वास्तुशास्त्रानुसार उत्तर ही दिशा कुबेर या धन देवताची आहे, त्यामुळे उत्तर दिशेला कुठलाही खरेदी विक्री व्यवहार किंवा व्यवसाय पार पाडणे हितावह ठरते. तसेच तिजोरीचे दार उत्तरेकडे असेल तर अतिशय भाग्यवान समजले जाते.

दक्षिण:

 मित्रांनो, दक्षिण म्हणजे खालची दिशा असे म्हटले जाते, या दक्षिण दिशेला कुठलीही जड वस्तू, अग्नी, वीज, इत्यादी गोष्टी ठेवणे किंवा विविध यंत्रसामग्री ठेवणे खूप फायद्याचे मानले जाते.

आग्नेय:

 आग्नेय ही दिशा दक्षिण व पूर्व या दिशांमध्ये असते. ही दिशा अग्नी देवतेसाठी खूप अनमोल समजली जाते. ही दिशा अनुकूल असेल तर सर्वकाही इष्टतम असते, मात्र या दिशेच्या कोपामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवायला लागतात.

नैऋत्य:

 मित्रांनो, पश्चिम व दक्षिण या दोन दिशांमध्ये असणारी ही दिशा पृथ्वीला समर्पित आहे. ही दिशा अनुकूल नसेल तर दुर्घटना, चारित्र्यहनन, भीती यांसारख्या समस्या उद्भवतात.

वायव्य:

 मित्रांनो, उत्तर आणि पश्चिम या दिशांमध्ये असणारी वायव्य दिशा वायु अर्थात पवन देवतेची आवडती दिशा आहे.

ईशान्य:

उत्तर व पूर्व या दिशेमध्ये असणारी ईशान्य दिशा भगवान शिव यांची दिशा मानली जाते. या दिशेला पूजा अर्चा करण्याचे ठिकाण असल्यामुळे वैवाहिक जीवनातील भांडण तंटे आणि कलह मिटवले जातात.

इतर दिशा:

मित्रांनो, आपल्या इकडे चार मुख्य दिशा आणि त्यांच्यामध्ये पुन्हा चार उपदिशा अशा आठ दिशा असून, त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला समांतर अशा पसरलेल्या दिसतात. मात्र अनेक ठिकाणी लोक वर व खाली या दिशांना देखील मानतात. वर असणाऱ्या दिशेला ऊर्ध्व दिशा किंवा अनूलंब दिशा असे म्हणतात. या दिशेचा देवता हा ब्रह्म आहे. तसेच खालील बाजूच्या दिशेला अधर दिशा किंवा अधुमुखी दिशा असे म्हणतात. या दिशेला शेषनाग हा इष्टदेवता म्हणून ओळखला जातो.

निष्कर्ष:

मित्रांनो, दिशा या आपल्याला कुठलाही प्रवास करताना खूप मोलाचे मार्गदर्शन करत असतात. दिशांना वास्तुशास्त्रामध्ये देखील खूप महत्त्व दिलेले आहे, काही लोक त्याचे पालन करतात तर काही करत नाहीत. हल्ली फ्लॅट सिस्टीम मध्ये बऱ्याचशा गोष्टी वास्तुशास्त्रातल्या दिशेनुसार बसत नाहीत. त्यामुळे कुठेतरी तडजोडीला प्राधान्य दिले जाते.

मात्र ज्यांना वास्तुशास्त्रानुसार दिशांमध्ये जास्त अभ्यास असतो, ते लोक मात्र अशा दिशेनेच घर घेतात जेथे योग्य वास्तुशास्त्राप्रमाणे रचना केलेली असेल. खरे तर घर बनवताना वास्तुशास्त्र म्हणजे पावसाचे पाणी घराच्या मुख्य दरवाजातून आत येणार नाही, किंवा खिडक्यातून आत येणार नाही, स्वयंपाक घरामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश २४ तास उपलब्ध असेल, स्वच्छतागृहातील दुर्गंधी घरात इतरत्र न पसरता योग्य रीतीने बाहेरील दिशेस जाईल, तसेच झोपण्याच्या खोलीमध्ये फार आवाज होणार नाही, आणि रस्त्यावरील गाड्यांचा किंवा इतर बऱ्याच गोष्टींचा आवाज येणार नाही, तसेच बैठकीच्या खोलीमधून किचनमध्ये आणि किचन मधून बैठकीच्या खोलीमध्ये लक्ष राहील, तसेच येणारे जाणारे लोक सहजरीत्या समजतील, सूर्यप्रकाश देखील राहील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवा खेळती राहील अशा प्रकारे रचना करणे होय. बरेचसे लोक या वास्तुशास्त्राला थोतांड किंवा अंधश्रद्धा समजतात, तर काही लोक या गोष्टीला शास्त्रीय पद्धतीने घेतात.

वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करणारे लोक दरवाजे आणि खिडक्या काढताना अतिशय विचारपूर्वक काढतात, तसेच धनधान्यच्या गोष्टी दक्षिणेकडे ठेवल्या जातील, आणि देव्हारा हा ईशान्य दिशेला राहील असे बघतात. तसेच स्वयंपाकघर देखील अग्नीस ठेवण्यासाठी प्राधान्य दिले जाते. शक्यतो पूर्व दिशेस घराचे प्रवेशद्वार असेल तर हा एक शुभ संकेत असल्याचे मानले जाते, त्यामुळे काही अपवाद वगळता बऱ्याचशा लोकांची घरे आपल्याला पूर्वेकडे तोंड करून असल्याचे दिसते.

मित्रांनो आपण वास्तुशास्त्र माना किंवा नका मानू मात्र दिशा या आपल्या आयुष्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात, हे मात्र खरे. तसे नसते तर रोज सूर्य कुठूनही उगवला असता आणि कुठेही मावळला असता, सुट्टी मध्ये फिरायला निघालेलो आपण घरी परतण्याची शक्यता देखील फारच कमी झाली असती, त्यामुळे दिशा पाठ असणे देखील फार गरजेचे ठरते.

दिशांची नावे | Directions Names in marathi | #skillinmarathi

दिशांची नावे | Directions Names in marathi in this video we learn about direction.Direction name and its position.या video मध्ये आपण दिशांची नावे आणि त्याचं ...

FAQ

सूर्य कोणत्या दिशेला उगवतो आणि कोणत्या दिशेला मावळतो?

सूर्य पूर्व दिशेला उगवतो व पश्चिम या दिशेस मावळतो.

मुख्य दिशा कशा लक्षात ठेवायच्या?

सकाळी उठल्याबरोबर सूर्याकडे तोंड करून उभा राहायचे, त्यावेळी तुमच्या समोरील दिशा ही पूर्व असेल, आणि तुमच्या पाठीकडील दिशा ही पश्चिम असेल. तसेच तुमच्या डाव्या हाताकडील दिशा ही उत्तर तर उजव्या हाताकडील दिशा ही दक्षिण दिशा असेल.

झोपण्यासाठी चांगली दिशा कोणती व वाईट दिशा कोणती?

मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये चुंबकीय शक्ती असते असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. तसेच पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवांमध्ये देखील चुंबकीय शक्ती संचारात असते. त्यासाठी मानवाने नेहमी दक्षिणेकडे डोके करावे आणि उत्तरेकडे पाय करावे. मात्र या उलट  केल्यास शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकते.

नकाशामध्ये सर्वात वरील बाजूला कोणती दिशा दाखविली जाते?

नकाशा मध्ये सर्वात वर उत्तर दिशा असते.

पूर्वी लोक दिशा ठरवण्यासाठी कशाची मदत घेत असत?

पूर्वीच्या काळी लोक दिशा ठरविण्यासाठी सूर्याचे सूर्योदय व सूर्यास्त यांची दिशा, तसेच आकाशातील विविध तारे व तारकासमूह इत्यादी खगोलीय गोष्टींची मदत घेत असत.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण विविध मुख्य दिशा आणि उपदिशा याविषयीची माहिती पाहिली. या माहितीतून तुम्हाला माहिती असणाऱ्या गोष्टी सोबतच इतरही नवीन गोष्टी वाचायला नक्कीच मिळाल्या असतील. तसेच काही प्रमाणात का होईना वास्तुशास्त्राविषयी महत्त्व देखील पटले असेल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवतानाच नेहमी दिशा विसरणाऱ्या आपल्या मित्राला देखील ही माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद.

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment