जंगलतोडची संपूर्ण माहिती Deforestation Information In Marathi

Deforestation Information In Marathi नमस्कार मित्रांनो, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती. मात्र आजकाल थोड्याशा फायदा करिता माणसाने पद्धतशीरपणे जंगलाचा नाश चालविला आहे, आणि त्याची किंमत आता मानवाला मोजायला लागत आहे.

Deforestation Information In Marathi

जंगलतोडची संपूर्ण माहिती Deforestation Information In Marathi

जंगलतोड म्हणजे काय तर उभी असणारी झाडे आणि जंगले तोडून त्याचा नाश करणे, आणि ती जमीन इतर कामांसाठी वापरणे होय. वाढत्या लोकसंख्येमुळे माणसाला जागा कमी पडत चालली आहे, आणि त्यामुळे नैसर्गिक समतोलाचा कुठेही विचार न करता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड चालू आहे.

मात्र हे असेच चालू राहिले तर आपल्या भावी पिढी, व आपल्यासाठी देखील धोक्याची घंटा असेल. जर तुम्हाला प्रदूषण मुक्त आणि निरोगी वातावरण हवे असेल, तर जंगलतोड वेळीच थांबवली गेली पाहिजे. आणि वृक्ष लागवडीचे विविध कार्यक्रम हाती घेतले पाहिजे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वृक्षतोड या विषयावर संपूर्ण माहिती बघणार आहोत…

जंगलतोड म्हणजे नेमके काय:

मित्रांनो, जंगल म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र ज्यावेळी मानव स्वतःच्या फायद्या करिता या जंगलातील वृक्षांची कत्तल करतो आणि त्या ठिकाणी शेती किंवा मानवी वसाहत स्थापन करतो, आणि या तोडलेल्या वृक्षांचा वापर इंधन किंवा फर्निचर यांसारख्या कामांमध्ये करतो त्या परिस्थितीला जंगलतोड असे म्हणून ओळखले जाते. या जंगल तोडीचे प्रमुख कारण म्हणजे जंगलावरील आधारित असणाऱ्या उत्पादनांचा कच्चामाल म्हणून वाढलेली मागणी होय.

जंगलापासून कागद बनविणे, फर्निचर बनवणे, कोळसा बनविणे, इंधन म्हणून वापर करणे यांसारखे अनेक फायदे मिळतात. मात्र या थोड्याशा फायद्यासाठी भावी पिढ्यांवर खूप दूरगामी आणि नकारात्मक स्वरूपाचे परिणाम होतात. ज्यामध्ये मातीची धूप होणे, जमिनीचे वाळवंटीकरण होणे, महापुर येणे किंवा कधी कधी दुष्काळ पडणे, नद्यांचे प्रवाह मातीमुळे बुजने, किंवा उथळ होणे यांसारख्या समस्या दिसून येतात. वरवर साधारण वाटणाऱ्या समस्या दूरगामी विचार केल्यास खूपच घातक ठरतात.

जंगल तोडीची कारणे किंवा जबाबदार घटक:

मित्रांनो, कुठल्याही गोष्ट घडण्यासाठी त्याची कारणे महत्त्वपूर्ण असतात. तसेच जंगलतोड होण्याची देखील काही कारणे आहेत.

  • जंगल तोडीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोकसंख्येची बेसुमार वाढ होय. वाढत्या लोकसंख्येची जागेची मागणी पुरविण्यासाठी जंगलतोड झपाट्याने होत आहे.
  • या वाढत्या लोकसंख्येलाच अन्नधान्य पुरविण्यासाठी शेतजमीन तयार करावी लागते, त्यामुळे देखील वृक्षतोड केली जाते.
  • मानवाच्या जीवनामध्ये कागद, लाकूड, कोळसा, इत्यादी गोष्टींची मागणी प्रचंड वाढलेली आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी देखील वृक्षतोड केली जाते.
  • रेल्वे, रस्ते, विमानतळ, धरणे, कालवे, विजनिर्मिती यंत्रणा इत्यादी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी सुद्धा वृक्षतोड केली जाते.
  • उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये झुमला प्रकारची शेती करण्यासाठी सुद्धा जंगले तोडली जातात.
  • इंधन म्हणून वापर करण्यासाठी सुद्धा जंगलतोड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

जंगल तोडीचे निसर्गावर आणि परिणामी माणसावर होणारे परिणाम:

मित्रांनो, कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा अखिल मानव जातीवर आणि निसर्गावर सुद्धा नकारात्मक परिणाम होत असतो. तसेच जंगल तोडीचे देखील काही नकारात्मक परिणाम घडून येतात ते पुढील प्रमाणे. जमिनीवरील आच्छादन हटविले जाते, परिणामी जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते.

जंगल तोडीमुळे वारा वाहण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा होत नाही, आणि त्यामुळे वाळवंटातील वाळू दरवर्षी पुढे पुढे सरकत येते. आणि चांगल्या सुपीक जमिनीचे सुद्धा वाळवंटात रूपांतर होते.

जंगल तोड केल्यामुळे जंगलातून मिळणारे उत्पादने जसे की फुले, फळे, कंदमुळे, औषधी वनस्पती, मध, लाकूड इत्यादी उत्पादने कमी मिळतात.

वृक्षतोडीमुळे प्राण्यांची नैसर्गिक निवासस्थाने नष्ट केली जातात, परिणामी जैविक विविधतेमध्ये घट तर होतेच शिवाय हेच प्राणी मानवी वस्तीमध्ये शिरतात, आणि जीवित नुकसान करतात.

वृक्षतोडीमुळे निसर्गातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत चालले आहे, तसेच हरित वायू शोषून घेण्यास सुद्धा अडथळा आल्यामुळे या वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे, आणि या सर्वांचा परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढ देखील होत आहे.

वृक्षतोडीमुळे मानवाला प्राणवायू कमी पडतो, आणि परिणामी अनेक प्रकारच्या दम्यासारख्या रोगांना किंवा आजारांना बळी पडावे लागते. मित्रांनो, वृक्ष किंवा जंगले हे पृथ्वीच्या सौंदर्यात भर घालणारी आहेत, या वृक्षांमुळेच पृथ्वी अगदी हिरवाईने नटलेली दिसते. मात्र वृक्षतोड केल्यामुळे तेथील परिसर अगदी निस्तेज आणि वाळवंटाप्रमाणे भकास दिसतो.

जंगलतोडीबद्दलचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल:

मित्रांनो, मानवाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, आणि खूप ज्ञान देखील मिळवलेले आहे. त्यामुळे मानवाला वृक्षतोड घातक आहे हे माहिती असून देखील त्याचे प्रमाण कमी होत नाही. संयुक्त राष्ट्रांनी १९८० ते १९९५ या १५ वर्षांच्या कालावधी करिता एक अहवाल सादर केला होता. ज्या अंतर्गत असा निष्कर्ष मिळाला की सुमारे २०० दशलक्ष हेक्टर क्षेत्र वरील जंगले तोडण्यात आलेली आहे. काही अंशी इतर ठिकाणी झाडे लावली असली तरी देखील त्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज आपण जंगल तोड म्हणजे काय याबाबत इत्यंभूत माहिती पाहिली. मात्र केवळ जंगलतोडी बद्दल माहिती असून उपयोग नाही, तर रोजच्या जीवनामध्ये त्या माहितीचा वापर होणे देखील खूप गरजेचे आहे. अनेक लोक केवळ वृक्षतोड या विषयावर भाषण देतात, मात्र त्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाहीत.

यामुळे निसर्गाच्या समतोलाबाबत केवळ जन माणसांमध्ये जनजागृती होत आहे, मात्र कार्य कुठेही होताना दिसत नाही. अनेक लोक शेताच्या बांधावर झाड येऊ देत नाहीत, कारण त्याने शेतीला त्रास होईल असा त्यांचा समज असतो, मात्र वृक्ष नसतील तर शेती करणे अतिशय कठीण होईल.

मित्रांनो, आपण प्रत्येकाने किमान एक तरी झाड दरवर्षी लावले पाहिजे, आणि ते जोपासले देखील पाहिजे. जेणेकरून भारत देशामध्ये दरवर्षी करोडोने झाडे लावली जातील. मात्र असे करताना जुनी झाडे देखील तोडता कामा नये, त्यामुळे निसर्गामध्ये स्वच्छ हवा खेळायला लागेल आणि निसर्गामध्ये समतोल आल्यामुळे पुन्हा एकदा निकोप आरोग्य लाभण्यास मदत मिळेल.

FAQ

जंगलतोड म्हणजे काय?

मानवाच्या फायद्या करिता जंगलातील वृक्षांची तोडणी करून किंवा जाळून ही वृक्ष नष्ट करणे, आणि तेथे शेतजमीन किंवा मानवी वसाहत स्थापन करणे, आणि त्या बदल्यांमध्ये कोठेही वृक्ष लागवड न करणे म्हणजे खऱ्या अर्थाने जंगलतोड होय.

जंगलतोडीमुळे निसर्गावर कोणकोणते परिणाम होतात?

जंगलतोडीमुळे हवामान बदल, तापमानात वाढ, जमिनीचे वाळवंटीकरण किंवा धूप होणे, पिकांचे उत्पादन घटने, महापुरासारख्या नैसर्गिक आपत्ती येणे, आणि हरित वायूचे प्रमाण वाढून जागतिक उष्णता वाढ होणे इत्यादी परिणाम दिसून येतात.

जंगलतोड रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो?

जंगलतोड रोखण्याकरिता जंगलातून मिळणाऱ्या उत्पादनांवर अर्थात लाकूड किंवा तत्सम साहित्यांवर कमी अवलंबून राहिले तर असे उद्योग हळूहळू कमी होतील, आणि वृक्षतोडीला कुठेतरी आळा बसेल.

जंगल तोडीची समस्या पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक आढळून येते?

उष्णकटिबंधीय वर्षभर हिरव्या असणाऱ्या सदाहरित वनांमध्ये जंगल तोडीची समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार १९८० ते १९९५ या पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये किती जंगलांचा नाश करण्यात आला होता?

संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार या १५ वर्षांमध्ये तब्बल दोनशे दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वनांचा नाश करण्यात आला होता.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जंगलतोड प्रकल्प याविषयीची इत्यंभूत माहिती पाहिली. मित्रांनो खात्रीने सांगतो ही माहिती तुम्हाला आधी देखील असेल, मात्र त्याचा दैनंदिन जीवनात तुम्ही नक्कीच वापर करत नसाल. मात्र ही माहिती वाचल्यानंतर प्रत्येकाने एक झाड लावणे व एक झाड जोपासणे ही शपथ घ्यायला हवी. तरच खऱ्या अर्थाने या माहितीचा फायदा झाला असे म्हणता येईल, आणि ही संकल्पना तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचण्यासाठी ही माहिती शेअर अवश्य करा.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment