Cricket Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो बालपणी मैदान म्हटलं की प्रत्येक जण हातातली कामं टाकून एका पायावर निघायला तयार व्हायचा. काय खेळायचं यावर कितीही चर्चा झाली तरी अंतिम निर्णय क्रिकेटवरच येऊन थांबायचा, कारण क्रिकेट म्हणजे प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले रक्तच होते.
क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती Cricket Information In Marathi
क्रिकेट माहिती नाही असा व्यक्ती सापडणं आजतरी मुश्किलच, क्रिकेट खेळायला फार काही महाग साधनं लागतातच असं नाही, साधी फळीची बॅट आणि बॉल बस्स एव्हढच साहित्य घेऊन प्रत्येक सुट्टीच्या दिवशी गल्ली गल्लीतील मैदाने बालगोपालांच्या आवाजाने गजबजून गेलेली असतात. त्यांना स्टंप सुद्धा लागत नाही. कोणाची तरी सायकल आडवी लावली किंवा एखादी बादली उपडी ठेवली की झाले त्यांचे स्टंप तयार. बालगोपाळंच क्रिकेटप्रेम इतकं प्रगल्भ असतं की त्यांना सकाळी मैदानावर गेले की जेवणाचंही भान उरत नाही.
मित्रांनो क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी देखील राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी पेक्षा देखील या क्रिकेटला भरभरून प्रेम दिले जाते, इतके की नोकरपेशा लोक सुद्धा सुट्टी टाकून वर्ल्ड कप चा सामना एन्जॉय करताना दिसतात.
आजच्या या लेखांमध्ये आपण क्रिकेट बद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…
खेळाचे नाव: क्रिकेट
खेळाडूंची संख्या: | प्रत्येक संघामध्ये ११ खेळाडू. |
मैदानाचा आकार | गोलाकार किंवा अंडाकृती. |
मैदानाचा व्यास: | ४५० ते ५०० फूट. |
पिच ची लांबी: | २०.१२ मीटर किंवा २२ यार्ड. |
पिच ची रुंदी: | ३.०५ मीटर किंवा साधारण १० फूट. |
मित्रांनो शेकडो वर्षांपूर्वी क्रिकेट या खेळाचा इंग्लंडमध्ये उदय झाला असे मानले जाते. क्रिकेट हा मैदानावर खेळला जाणारा सांघिक प्रकारचा खेळ असून यामध्ये 11 खेळाडू प्रत्येक संघामध्ये असतात. सध्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सर्वात लोकप्रिय खेळामध्ये क्रिकेट पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच जागतिक पातळीवर विचार करता लोकप्रियतेमध्ये क्रिकेटचा दुसरा क्रमांक लागतो.
क्रिकेटचे स्वरूप:
या खेळामध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघातील एक खेळाडू चामड्या पासून तयार केलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडूकडे अतिशय वेगाने फेकतो, फेकताना तो विकेट्स उडवले जातील ह्या उद्देशाने चेंडू फेकत असतो, जेणेकरून समोरचा खेळाडू बाद होईल. मात्र फलंदाज आपले सर्व कसब पणाला लावून गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूला लाकडी बॅटच्या साहाय्याने हवेमध्ये टोलावतो.
फिल्डिंग करणाऱ्या संघातील खेळाडू संपूर्ण मैदान भर विखुरलेले असतात, जे फलंदाजाने टोलावलेला चेंडू एकतर झेलण्यासाठी किंवा पकडून स्टंपच्या दिशेने फेकण्यासाठी तत्पर असतात. तर चेंडू टोलावल्या टोलावल्या फलंदाज विरुद्ध दिशेच्या स्टंपकडे जोरात धावत धाव काढण्याचा प्रयत्न करतो.
फलंदाजांनी टोलावलेला चेंडू फील्डिंग करणाऱ्या संघातील कोणत्याही खेळाडूने झेलल्यास फलंदाज बाद होतो, मात्र हा झेल चेंडूचा जमिनीला स्पर्श होण्यापूर्वी घेतला जावा. काही कारणास्तव चेंडू झेल न घेताच जमिनीला आदळल्यास फिल्डिंग करणाऱ्या संघातील खेळाडू त्यास पकडतात आणि विकेटच्या दिशेने फेकतात. जर फलंदाज धाव काढत असताना पीच च्या
मध्यावरच असेल आणि विरुद्ध खेळाडूंनी फेकलेला चेंडू विकेटला जाऊन धडकला तरी देखील फलंदाजाला बाद केले जाते. तसेच फलंदाजाने चेंडू टोलावल्यानंतर तो विना जमिनीस स्पर्श करता किती दूर जातो यावरून चार किंवा सहा धावा दिल्या जातात. अशा प्रकारे प्रत्येक फलंदाजाला बाद होईपर्यंत, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला संघातील सर्व खेळाडू बाद होईपर्यंत खेळण्याची संधी दिली जाते. आणि तोपर्यंत विरोधी संघाला गोलंदाजी करावी लागते. गोलंदाजी करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला गोलंदाजी करण्याची संधी मिळावी म्हणून सहा बॉलची एक ओव्हर प्रत्येक खेळाडूला दिली जाते.
सगळे खेळाडू झाल्यानंतर पुन्हा सर्वांना संधी दिली जाते. असे समोरील संघातील सर्व खेळाडू बाद होईपर्यंत केले जाते. ज्यावेळी फलंदाजी करणारा संघ बाद होईल तेव्हा गोलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाजी करण्याची संधी दिली जाते. आणि तोही संघ संपूर्णतः बाद होईपर्यंत खेळ चालवला जातो. यानंतर दोन्हीपैकी ज्या संघाला जास्तीत जास्त धावा करता आल्या त्या संघाला विजय घोषित केले जाते.
मित्रांनो आता इथे आपल्याला प्रश्न पडला असेल की कोणता संघ आधी फलंदाजी करणार किंवा गोलंदाजी करणार हे कसे ठरवले जाते? तर यासाठी सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक केली जाते. यावेळी नाणेफेक जिंकलेल्या संघाचा कर्णधार फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची याचा निर्णय घेतो, आणि संपूर्ण संघ तो निर्णय एकमताने मान्य करतो. यानंतर विरोधी संघ त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी उभा राहतो.
क्रिकेटचा इतिहास:
मित्रांनो अनेक संदर्भांचा अभ्यास करता क्रिकेट खेळाचे मूळ तेराव्या शतकाच्या आसपास सापडते. मात्र तज्ञांच्या मते हा खेळ त्यापूर्वीपासूनही अस्तित्वात असला पाहिजे. इंग्लंडला क्रिकेटचे उगमस्थान समजले जाते, केंट आणि ससेक्स येथील शेती आणि धातूंच्या वस्तू बनविण्याचे काम करणाऱ्या समाजातील मुलांनी या खेळाचा शोध लावला असे सांगितले जाते. काही लिखित पुराव्यानुसार एडवर्ड याचा मुलगा प्रिन्स एडवर्ड हा सुमारे १३०० च्या आसपास हा खेळ खेळत असल्याचे समजते.
दुसऱ्या एका पुराव्यानुसार इसवी सन १५९८ मध्ये एक न्यायालयीन खटला झाला ज्यामध्ये इसवी सन १५५० मध्ये गिल्डफोर्ड येथील रॉयल ग्रामर स्कूल मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्याचा उल्लेख केलेला आढळतो. हा पुरावा ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. असे म्हटले जाते की क्रिकेट हा शब्द फ्रेंच भाषेतील क्रिकस्टोएल या शब्दापासून तयार झालेला आहे.
क्रिकेटचे प्रकार:
मित्रांनो क्रिकेट हा खेळ सर्व दूर पसरलेला असल्यामुळे याचे वेगवेगळे प्रकार पडत गेले. यापैकी कसोटी, एकदिवसीय, आणि टी ट्वेंटी हे प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळले जातात.
मित्रांनो कसोटी क्रिकेट प्रकार साधारणपणे १८७७ मध्ये ब्रिटिश खेळाडूंच्या ऑस्ट्रेलिया मधील दौऱ्याच्या वेळी शोधला गेला किंवा सुरू झाला असे म्हटले जाते. याच्या पहिल्या सामन्यामध्ये एका शतकामध्ये चार चेंडू होते, हा पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या संघानी तब्बल ४५ धावांनी जिंकला होता. या पहिल्या सामन्याच्या मालिकेलाच अँशेश म्हणून ओळखले जाते.
एक दिवसीय क्रिकेट सामने ही मर्यादित षटकांचे असतात, यांनाच वनडे म्हणून देखील ओळखले जाते. याची सुरुवात १९६३ च्या सुमारास झाली होती.
टी ट्वेन्टी सामने हे अगदी अलीकडे म्हणजेच २००३ मध्ये सर्वप्रथम इंग्लंडमध्ये खेळले गेले होते, त्यानंतर मात्र ते झपाट्याने जगभर पसरले. यामध्ये दोन्ही संघाला २० षटक दिल्या जातात. यामध्ये जो संघ जास्तीत जास्त धावा करेल त्यास विजयी घोषित केले जाते.
निष्कर्ष:
मित्रांनो क्रिकेट या खेळाबद्दल कितीही बोलले तरीही कमीच ठरते. क्रिकेट म्हणजे कित्येक लोकांसाठी जीव की प्राण आहे. गल्लोगल्ली खेळणारे क्रिकेटवीर क्रिकेट खेळता खेळता इतके निपुण होतात की क्रिकेटमध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व देखील करतात. क्रिकेटने कित्येक लोकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
क्रिकेट हा असा खेळ आहे जो भारतच काय जगभरातून देखील कधीच नामशेष होऊ शकत नाही, कारण त्याचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे.
क्रिकेट खेळाविषयी संपूर्ण माहिती/सर्व वर्गासाठी उपयुक्त/निबंध लेखनासाठी उपयोगी Cricket Information
Ashwini R.Salunke Z.P.P.M.School,Shirwal muli Ta.Akkalkot Dist.Solapur
FAQ
क्रिकेट हा खेळ इनडोअर आहे की आउटडोअर?
क्रिकेट हा आउटडोअर खेळ आहे.
क्रिकेटच्या एका संघामध्ये किती खेळाडू असतात?
क्रिकेटच्या एका संघामध्ये 11 खेळाडू असतात.
क्रिकेट हा कोणत्या देशाचा खेळ आहे?
मुख्यत्वे क्रिकेट हा इंग्लंडचा खेळ असून सध्या तो जगभर खेळला जातो.
टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये किती ओव्हर असतात?
टी ट्वेन्टी क्रिकेट प्रकारात प्रत्येक संघासाठी २० ओव्हर असतात.
क्रिकेटची पीच किती लांब असते?
क्रिकेटची स्पीच साधारणपणे 22 यार्ड लांब असते.
मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या खेळाबद्दल अर्थातच क्रिकेट बद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल जाणून घेणे आम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आपली प्रतिक्रिया कळविण्यात विसरू नका, तसेच माहिती आवडली असल्यास आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.
धन्यवाद…