गाय प्राण्याची संपूर्ण माहिती Cow Animal Information In Marathi

Cow Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो गोमाता ही भारतामध्ये अतिशय पूजनीय असलेला प्राणी असून, मुख्यत्वे दूध उत्पादनासाठी या प्राण्याचे पालन करण्यात येते. भारतीय संस्कृतीने गायीला मातेचा दर्जा दिलेला असून अगदी वैदिक काळापासूनच गाईला महत्त्व देण्यात आलेले आहे.

Cow Animal Information In Marathi

गाय प्राण्याची संपूर्ण माहिती Cow Animal Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण गाई विषयी माहिती बघणार आहोत…

नावगाय
प्रकारप्राणी
इंग्रजी नावकाऊ
शास्त्रीय नावबॉस तौरस
साधारण झोपप्रतिदिन ४ तास
साधारण वजन अथवा वस्तुमाननर ११०० किलोपर्यंत; मादी ७२० किलोपर्यंत
गर्भधारणेचा कालावधी २८३ दिवसापर्यंत

मित्रांनो, अगदी हजार वर्षांपासून वैदिक कालावधीपासूनच गाईला मोठा मानसन्मान दिला जातो. आणि तिची पूजा केली जाते. गाईला माता म्हणजेच आपल्या आईसमान दर्जा दिला जातो, हे सर्वांना ठाऊकच आहे. जगातील सर्वात उत्तम पाळीव प्राणी म्हणून देखील गाईचे नाव घेतले जाते. अनेक देश गाईंची सर्रास कत्तल करण्याला कायदेशीर मान्यता देत असले, तरी देखील भारतामध्ये गाईला फार मोठा मानसन्मान मिळतो. आणि तिला गोमाता म्हणून ओळखले जाते.

गाईचा उगम:

मित्रांनो, गाईच्या उगमाबद्दल भारतीय पुराणांमध्ये अनेक संदर्भ आढळून येतात. ज्यामधील एका संदर्भानुसार ब्रह्मदेव अमृत प्रशांत करत असताना त्यांच्या मुखामधून फेसाळ द्रव बाहेर आले, त्यातून सर्वप्रथम निर्माण झालेली गाय उदयास आली, जिथे नाव सुरभी असे ठेवण्यात आले होते.

दुसऱ्या एका संदर्भानुसार ज्यावेळी समुद्रमंथन चालू होते, त्यावेळी १४ रत्ने बाहेर आली होती. त्यामध्ये सुरभी नावाची गाय देखील समाविष्ट होती. या सुरभी नावाच्या गाईपासून कपिला नावाची सोनेरी रंगाची गाय निर्माण झाली असे देखील सांगितले जाते. आणि या गाईच्या दुधापासून समुद्राची निर्मिती झाल्याचे देखील पुराणांमध्ये संदर्भ आढळतात. तर काही लोक म्हणतात समुद्रमंथांना वेळी सुरभी गाई सोबतच सुभद्रा, सुशीला, नंदा, आणि बाहुला या पाच गाई उदयास आल्या होत्या.

गाई बद्दल प्राथमिक माहिती:

मित्रांनो, आपल्याकडे गाईला पूजनीय मानतात हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे गाई जन्माला आल्यानंतर घरातील स्त्रिया कांदा व भाकरी ओवाळून त्यांची दृष्ट काढतात. मित्रांनो गाईचे दूध हे अमृता इतकेच मौल्यवान समजले जाते. अगदी आपल्या जुन्या धर्मग्रंथांमध्ये देखील गाईचे वर्णन कामधेनु, कपिला इत्यादी नावांनी केलेले आढळून येते.

मित्रांनो, गाय हा प्राणी जवळपास ३० प्रजातींमध्ये आढळून येतो, ज्यापैकी सर्वात जास्त नावाजलेल्या प्रजाती म्हणजे लाल सिंधी, गिर, सहिवाल, थापरकर, देवणी, आणि खिलार इत्यादी आहेत.

शास्त्रीय प्रकारानुसार गायीचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. यामध्ये एक प्रकार हा केवळ दुग्ध उत्पादनासाठी वापरला जातो, ज्यामध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या क्षमता विकसित केलेल्या असतात. मात्र कष्टाची कामे या प्रजातींना शक्य होत नाहीत. दुसऱ्या प्रकारानुसार कमी दूध देणाऱ्या मात्र नर हे अतिशय ताकतवर असणाऱ्या प्रजातींचा समावेश होतो. यातील मादी पासून जे काही दूध मिळेल ते वापरले जाते, मात्र नर हे मुख्यत्वे शेतीच्या आणि इतर कामांसाठी वापरले जातात.

या प्रकारामध्ये खिलार या प्रजातीचा देखील समावेश होतो. तिसरा प्रकारांमध्ये येणाऱ्या प्रजाती या अष्टपैलू स्वरूपाच्या असतात. ज्यामध्ये मादी ही उत्तम दुध देणारी, तर नर हे कष्टाची कामे करू शकणारे असतात, ज्यांना दुहेरी प्रकारचे प्रजाती म्हणून देखील ओळखले जाते.

मित्रांनो, गाय हा प्राणी मुख्यत्वे करून काळा किंवा तपकिरी रंगांमध्ये आढळून येतो. मात्र असे असले तरी देखील अनेक गाई या पांढऱ्या, लाल, बदामी यांसारख्या रंगांमध्ये सुद्धा आढळून येतात.

गाय या प्राण्याची शारीरिक रचना:

मित्रांनो, इतर प्राण्यांप्रमाणेच गाईला चार पाय असतात, तर एक शेपूट आणि एक डोके असते. रुंदीला गाई फारशा नसतात. गाईंना माने जवळ पुढील बाजूस दोन कान असतात, ज्याद्वारे त्या विविध प्रकारचा आवाज ऐकू शकतात. गाईला असणारे डोळे हे ३६०° पर्यंत देखील बघू शकतात. त्यांच्या पायांना खुरे असल्यामुळे दोन विभागलेल्या प्रकारात त्यांच्या पायांच्या खुणा दिसून येतात. गाईला शिंगे देखील असतात, ज्याद्वारे ती आपले संरक्षण करू शकते, आणि थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या शरीरावर मऊ बारीक केसांचे आवरण असते.

गाईंच्या खानापानाच्या सवयी:

मित्रांनो, गाई या जवळपास पूर्णपणे पाळीव प्राणी प्रकारातच येतात. त्यामुळे गाईंना आयता चारा दिला जातो. यामध्ये त्यांना वैरण, घास, गिन्नी गवत किंवा साधे गवत या प्रकारचा चारा दिला जातो. मित्रांनो, गाईंना चारा देण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचा अवलंब करावा. एकच प्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे गाईंना आवश्यक ते सर्व घटक मिळत नाहीत.

परिणामी दूध उत्पादनामध्ये घट येते. तसेच गाईंच्या शारीरिक वाढीमध्ये देखील बाधा निर्माण होते. गाईंना संतुलित प्रमाणामध्ये हिरवा व वाळलेला चारा देण्यात यावा, त्याशिवाय दुग्धोत्पादन करणाऱ्या गाईंना योग्य प्रकारचा खुराक व सर्व गायांना खनिज मिश्रणे वेळेवर देण्यात यावीत.

मित्रांनो, गाय हा पाळीव प्राणी किमान पाच लिटर ते कमाल वीस लिटर पर्यंत दूध देत असतो. या दुधापासून विविध पदार्थ बनवले जातात. तसेच अतिरिक्त दूध हे विक्री करण्याकरिता डेअरीला पाठविले जाते, ज्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न प्राप्त होत असते. शिवाय गाईच्या शेणापासून खताची देखील निर्मिती केली जाऊ शकते.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गाई विषयी माहिती घेतली. यामध्ये तुम्हाला गाईच्या प्रजातीचा उगम, तिची थोडीशी माहिती, विविध जाती, शरीररचना, त्यांच्या खानपानाच्या सवयी, व घ्यावयाची काळजी, गाईंचे धार्मिक महत्त्व, तसेच त्यांच्यापासून मिळणारे फायदे आणि आज स्थितीला गायांची असलेली स्थिती याबद्दल माहिती मिळाली असेलच.

मित्रांनो, गाय हा अतिशय पवित्र मानला जाणारा प्राणी असून, तो भारतामध्ये देवाच्या स्वरूप पूजला जातो. मुख्यत्वे दुग्धउत्पादनासाठी असणारा हा प्राणी त्यांच्या नरांकडून काम करून घेण्यासाठी सुद्धा वापरला जातो. ज्यामध्ये गाडी ओढणे, शेतकाम करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

FAQ

गाय या प्राण्याचे वजन साधारणपणे किती किलो पर्यंत असू शकते?

मित्रांनो, गाय हा मादी प्रकारातील प्राणी असून, तिचे साधारण वजन ३०० किलो ते ४०० किलो असते. मात्र काही वेळेला हे वजन ७०० किलो पर्यंत सुद्धा असते.

गाईला शास्त्रीय भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

गाईला शास्त्रीय भाषांमध्ये बॉस तौरस या नावाने ओळखले जाते.

गाय हा प्राणी कोणकोणत्या रंगांमध्ये आढळून येतो?

मुख्यत्वे गाय लालसर तपकिरी व काळ्या रंगांमध्ये काय आढळून येत असली, तरी देखील आज-काल पांढरा व काळा मिश्रण अर्थात बांडा रंगांमध्ये गाई आढळून येतात. ज्या शक्यतो हायब्रीड प्रजातीच्या असतात.

गाईच्या गोमूत्र व शेणाचे काय फायदे आहेत?

गाईचे गोमूत्र हे पवित्र मानले जाते, आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे शेणापासून घरे सारवणे, गोवऱ्या थापने, किंवा शेताला खत म्हणून वापरणे इत्यादी वापर केले जातात.

गाईचे धार्मिक महत्त्व काय आहे?

मित्रांनो, गाय या प्राण्याचा शरीरामध्ये ३३ कोटी अर्थात ३३ प्रकारच्या देवांचा वास असतो असे म्हणतात. त्यामुळे अनेक धार्मिक उत्सवांच्या वेळी गाईचे पूजन केले जाते. त्यासह भगवान कृष्णदेखील गायांचे राखण करत असत, त्यामुळे देखील गाईला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. सोबतच गाईपासून मिळालेल्या दूध, दही, तूप, आणि गोमूत्राशिवाय कुठल्याही घरामध्ये दिवस पूर्ण होत नाही.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गाय या प्राण्याविषयी ची माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट मध्ये वाचायला नक्की आवडेल. त्याच प्रकारे तुमच्या आवडीची ही माहिती तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना वाचायला मिळावी, याकरिता ही माहिती त्यांच्यापर्यंत शेअर करून नक्की पोहोचवा.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment