संगणक विषयी संपूर्ण माहिती Computer Information In Marathi

Computer Information In Marathi नमस्कार मित्रांनो, काही वर्षांपूर्वी संगणक किंवा कॉम्प्युटर म्हटलं की प्रत्येकाचीच उत्सुकता ताणली जायची. त्यावेळी फार कमी लोकांकडे संगणक असे, घरगुती संगणक तर बोटावर मोजता येईल इतक्या टक्के लोकांकडेच असत.  ऑफिसमध्ये देखील सर्वांसाठी मिळून एखादा दुसरा संगणक असे. मात्र तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत गेली तसतसं संगणक सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये येऊ लागला, आणि संगणकाच्या युगामध्ये नवी क्रांती झाली. आजकाल प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी संगणक आहे. पूर्वीच्या सीआरटी मॉनिटर असणाऱ्या संगणकाची जागा एलसीडी मॉनिटर ने तर आजकाल अतिशय हलका आणि आकाराने ही लहान असणारा लॅपटॉप सगळीकडे रूढ झाला आहे. आजकाल येणारे स्मार्टफोन हे संगणकाचेच प्रकार म्हणता येतील.

संगणक विषयी संपूर्ण माहिती Computer Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण संगणक म्हणजे काय, संगणकाचे विविध प्रकार, संगणकाचा शोध इत्यादी मुद्द्यांवर सखोल माहिती बघणार आहोत…

नाव: संगणक.
संगणकाचा शोध:  चार्ल्स बॅबेज.
संगणकाला समजणारी भाषा: बायनरी लँग्वेज.
भारतातील पहिला संगणक: TIFRAC.

मित्रांनो, सर्वप्रथम संगणक हा गणितीय आकडेमोड करण्यासाठी बनविण्यात आला होता. मात्र काळानुसार त्यामध्ये अनेक बदल होत गेले. आणि आजचा मॉडर्न संगणक आपल्यापुढे आहे. आज संगणक गणितीय आकडेमोडी सोबतच तार्किक माहितीची प्रक्रिया करून अनेक कार्य करू शकतो. तसेच स्वतःच विविध निर्णय घेऊन आपल्याला सुचवू शकतो. हल्लीच्या AI च्या जमान्यात संगणक माणसाद्वारे चालवला जाण्याऐवजी सर्वकाही स्वतःच करून वापरकर्त्यांना इच्छित रिझल्ट दाखवतो.

संगणक म्हणजे काय:

मित्रांनो संगणक म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे एक मशीन असून ते वापरकर्त्याने पुरविलेल्या माहितीवर अर्थात डेटावर प्रक्रिया करून त्याची योग्य ती माहिती आउटपुट स्वरूपात देते, जी आपण संगणकाच्या मॉनिटर स्क्रीनवर बघू शकता.

सुरुवातीला मानवाच्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा संगणक आजकाल अनेक गोष्टींमध्ये वापरला जातो, ज्यामध्ये डेटाचे व्यवस्थापन करणे, डेटावर प्रक्रिया करणे, आणि तो साठवून ठेवणे तसेच आंतरजालावर विविध माहिती शोधणे, त्या माहितीचा वापर करणे, गेम खेळणे, इमेल्स पाठविणे तसेच विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स म्हणजेच दस्तऐवज तयार करणे यामध्ये मोठ्या प्रमाणावर संगणकाचा वापर होतो.

सोबतच स्प्रेडशीट द्वारे तुम्ही अतिशय जटिल माहितीचे योग्यरित्या व्यवस्थापन करून ती जतनही करू शकता, आणि पाहिजे तेव्हा वापरू शकता. अगदी तसेच पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा ऑफिस मधील सहकाऱ्यांना एखादी गोष्ट अतिशय सोपी करून समजावू शकता.

मित्रांनो कम्प्युटर हा शब्द टू कंप्युट म्हणजेच मोजणे किंवा गणना करणे या शब्दापासून तयार झालेला आहे, यावरून हे सिद्ध होते की संगणक तयार करताना त्याचा मूळ उद्देश अनेक अंकगणितीय गोष्टींची गणना करणे हा होता.

संगणकामुळे कामाची विश्वासार्हता तर वाढलेलीच आहे, मात्र कामाचा वेग देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढून गेलेला आहे. संगणक कितीही मोठ्या प्रमाणावरील माहिती साठवून ठेवू शकतो, आणि गरजेनुसार ती माहिती बाहेर काढून देऊ शकतो किंवा त्या माहितीची प्रक्रिया करून योग्य रिझल्ट वापरकर्त्यांना देऊ शकतो.

संगणकाच्या अचूक आकडेमोड, जलद काम करण्याची क्षमता, आणि विश्वासार्हता यामुळे आजकाल अंतराळ क्षेत्रात सुद्धा संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याबरोबरच चित्रपट निर्मिती क्षेत्र, रेल्वे व्यवस्थापन, वाहतूक व्यवसाय, विमानतळांचे व्यवस्थापन, शैक्षणिक कामकाज, हॉटेलिंग व्यवसाय, बँका, आयटी सेक्टर्स, शासकीय कार्यालय, आणि कंपन्या या सर्वांनी संगणकाला आपला साथी मानले आहे.

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधील फरक:

मित्रांनो जेव्हाही संगणकाचा उल्लेख येतो, तेव्हा प्रत्येक वेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन शब्द आपल्या नेहमीच कानावर पडतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हार्डवेअर म्हणजे आपण हात लावू शकणारे संगणकाचे प्रत्येक अवयव होय, तर सॉफ्टवेअर म्हणजे या सर्व हार्डवेअर्सला काम करण्याची आज्ञा देणारी, माहितीवर प्रक्रिया करणारी प्रणाली होय. त्यामुळे या दोन्हीही प्रकारांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.

संगणकाचे प्रकार:

मित्रांनो संगणक विश्वामध्ये जसजशी प्रगती होत गेली तसतसे संगणकाचे विविध प्रकार बाजारात येत गेले. यामध्ये वैयक्तिक संगणक, पोर्टेबल संगणक, टॅबलेट संगणक, आणि सर्वर संगणक इत्यादी महत्त्वाचे प्रकार पडतात. वैयक्तिक संगणक ज्याला पीसी म्हणून देखील ओळखले जाते, तो म्हणजे संगणकाचा असा प्रकार जो वैयक्तिक वापरासाठी वापरला जातो.

वैयक्तिक संगणक म्हणजे केवळ सीपीयू, माऊस, कीबोर्ड, आणि मॉनिटरचा संच नव्हे, तर दिवसभरात आपण वापरत असलेली कॅल्क्युलेटर, एटीएम मशीन, मोबाईल फोन हे देखील वैयक्तिक संगणकाचेच प्रकार आहेत. पोर्टेबल संगणक म्हणजे जो कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि कुठल्याही ठिकाणी वापरू शकतो असा संगणक. यामध्ये लॅपटॉपचा समावेश होतो. याही पेक्षा अधिक पोर्टेबल असणारा संगणक म्हणजे टॅबलेट संगणक.

जो अगदी खिशातही घेऊन जाऊ शकतो. याला कीबोर्ड नसतो तर स्क्रीन वरच इनपुट देऊन याचा वापर केला जातो. आणि सर्वर संगणक म्हणजे त्यासोबत जोडलेल्या इतरही संगणकासोबत मिळून काम करणारा संगणक होय. जो प्रामुख्याने तुम्हाला संगणक क्लासेस किंवा आयटी लॅब मध्ये बघायला मिळतो.

निष्कर्ष:

मित्रांनो संगणकाच्या येण्याने मानवी जीवनात अमुलाग्र असे बदल घडून आलेले आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आजकाल असे कुठलेच क्षेत्र नाही की त्यामध्ये संगणकाचा वापर होत नाही. काही क्षेत्र तर केवळ आणि केवळ संगणकाच्या वापरावरच निर्भर झालेले आहेत.

बऱ्याचशा क्षेत्रामध्ये अनेक माणसांचे काम एकटा संगणक करू लागल्याने कामाची गुणवत्ता आणि वेग दोन्ही देखील वाढलेले आहे. काही क्षेत्रांमध्ये तर संगणकांनी मानवाला पूर्णतः रिप्लेस केलेले आहे. संगणकावरच आधारित असलेली रोबोट प्रणाली देखील माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत आहे.

संगणकाने मानवी जीवन सुखकर झाले असले तरी देखील बेरोजगारीचे प्रमाण देखील त्या पटीत वाढलेले आढळून येते. मात्र ‘कालाय तस्मै नमः’  म्हणत हे सर्व बदल आपण अंगीकारलेच पाहिजेत. आणि संगणकाचा योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणीच वापर करून विधेयक कामांमध्ये त्याची शक्ती खर्चली पाहिजे.

Computer - संगणक || संगणकाविषयी माहिती मराठीत || Computer information || Computer chi mahiti

Computer Information In Marathi नमस्कार मित्रांनो, काही वर्षांपूर्वी संगणक किंवा कॉम्प्युटर म्हटलं की प्रत्येकाचीच उत्सुकता ताणली जायची. त्यावेळी फार कमी लोकांकडे संगणक असे, घरगुती संगणक तर बोटावर मोजता येईल इतक्या टक्के लोकांकडेच असत.  ऑफिसमध्ये देखील सर्वांसाठी मिळून एखादा दुसरा संगणक असे. मात्र तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत गेली तसतसं संगणक सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये येऊ लागला, आणि संगणकाच्या युगामध्ये नवी क्रांती झाली. आजकाल प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी संगणक आहे. पूर्वीच्या सीआरटी मॉनिटर असणाऱ्या संगणकाची जागा एलसीडी मॉनिटर ने तर आजकाल अतिशय हलका आणि आकाराने ही लहान असणारा लॅपटॉप सगळीकडे रूढ झाला आहे. आजकाल येणारे स्मार्टफोन हे संगणकाचेच प्रकार म्हणता येतील.

FAQ

संगणकाचा शोध कोणी लावला?

संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला.

लॅपटॉप हा संगणकाचाच प्रकार आहे का?

होय नक्कीच लॅपटॉप हा संगणकाचा एक प्रकार आहे.

संगणक खरेदीसाठी साधारणपणे किती खर्च येतो?

बाजार मध्ये आपल्या गरजेनुसार अनेक विविध प्रकारची वेगवेगळे संगणक उपलब्ध आहेत. आपण कोणत्या प्रकारचा संगणक खरेदी करत आहात त्यानुसार किमतीमध्ये बदल होतो. तरीही साधारणपणे 15,000/-  रुपयांच्या पुढे संगणकाच्या किमती सुरू होतात, ज्या लाखो रुपयांपर्यंत देखील आहेत.

संगणक खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?

सर्वप्रथम आपण कुठल्या कामासाठी संगणकाचा वापर करणार आहोत ही गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते. त्यानुसार संगणकाची रॅम, रोम, प्रोसेसर इत्यादी गोष्टी ध्यानात घेऊन खरेदी करावी.

संगणकातील मॉनिटर हा इनपुट डिवाइस आहे की आउटपुट?

मॉनिटर मध्ये आपल्याला प्रक्रिया केलेली माहिती दिसत असल्याने मॉनिटर हा आउटपुट डिव्हाईस आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आपल्या सर्वांचा मित्र असलेल्या संगणकाबद्दल जाणून घेतले. संगणकाबद्दल सर्वांनाच आकर्षण असले तरी देखील लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांना संगणकाच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यात अधिक रस असतो. त्यामुळे आपल्या परिचयातील अशा लोकांना ही माहिती शेअर करण्यास विसरू नका, आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवत रहा. धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment