सिव्हिल इंजिनियरिंगची संपूर्ण माहिती Civil Engineering Information In Marathi

Civil Engineering Information In Marathi नमस्कार मित्रांनो, सिविल इंजिनियर हा असा एक व्यक्ती आहे जो अनेक क्षेत्रांमध्ये बांधकाम प्रकल्पात कार्यरत असतो. जे सरकारी किंवा गैरसरकारी देखील असू शकतात. जसे की विविध रस्त्यांवरील पूल, अनेक वसाहती, मोठ्या मोठ्या इमारती, महामार्ग, रेल्वे स्टेशन, विमानतळे किंवा इतरही लहान मोठ्या संरचना.

Civil Engineering Information In Marathi

सिव्हिल इंजिनियरिंगची संपूर्ण माहिती Civil Engineering Information In Marathi

जर तुम्हाला तुमचे घर बांधायचे असेल तर तुम्ही हे काम इंजिनियरला देऊ शकता. जो अगदी जागेची तपासणी करण्यापासून चांगला आराखडा बनवणे, त्याचे नकाशे तयार करणे, त्यानुसार घराला विविध डिझाइन्स मध्ये सजविणे, नवनवीन एलिवेशन तयार करणे, यांपासून बांधकाम, प्लास्टर, रंगकाम, विद्युत फिटिंग, यांसारख्या सर्व कामांचे टेंडर घेऊ शकतो. आणि आवश्यकतेनुसार योग्य प्रकारच्या कामगारांकडून हे काम करून देऊ शकतो.

अनेक लोकांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असते, मात्र ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून, सिव्हिल इंजिनियर कडे अनेक लोक दुर्लक्ष करताना दिसतात.

मात्र सिव्हिल इंजिनियर बनणे देखील एक चांगले करिअर आहे. ज्यामध्ये चांगला पैसा असण्याबरोबरच आयुष्यभरात अनेक चांगले वाईट अनुभव देखील मिळत असतात. आजच्या भागामध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी पदवी बद्दल माहिती बघणार आहोत…

नावसिव्हिल इंजिनियरिंग
प्रकारअभ्यासक्रम
उपप्रकारपदवी अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रतागणित विषय घेऊन किमान बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावे
इतर पात्रताआवश्यक त्या प्रवेश परीक्षा देऊन योग्य गुण मिळवलेले असावे.
कार्य

सिव्हिल इंजीनियरिंग म्हणजे नेमकं काय:

सिव्हिल इंजिनिअरिंग ही एक अभियांत्रिकी शाखेतील पदवी असून, त्या पदवीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या इमारती, रस्ते, घरे, धरणे, निवासस्थान, कालवे, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांसारख्या बांधकाम आणि संरचनांचा विकास करणे आणि त्यावर देखभाल ठेवणे यासारखे कार्य करावे लागतात.

सिव्हिल इंजिनियर ला शून्यातून अर्थात रिकाम्या भूखंडातून नवनवीन संरचना निर्माण कराव्या लागतात. घराचे उदाहरण घेतल्यास त्या जमिनीवरील माती कशी आहे, त्यानुसार घराचं स्ट्रक्चर कसं करावे लागेल, त्यात काय काय सोयी सुविधा असायला हव्यात, त्या सर्व सोयी सुविधा वास्तुशास्त्राप्रमाणे बसतील का? या प्रत्येक खोलीमध्ये हवा खेळती राहील का? प्रकाश येईल का? तसेच जे बांधकाम करणार आहे ते सदर जमिनीमध्ये तग धरू शकेल का? तसेच त्याला किती मोठे स्टील वापरावे लागेल? कशा प्रकारचे सिमेंट वापरावे लागेल? आधारासाठीचे बीम किंवा कॉलम कसे घ्यावे लागतील? इत्यादी सर्व प्रकारचा अभ्यास करून त्यानुसार कार्य करावे लागते. आज काल आपण अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या संरचना बघत आहोत. मात्र या सर्व बनवण्यामागे सिव्हिल इंजिनिअर यांचे खूप मोठे कसब आणि कष्ट आहे.

सिविल इंजिनिअर होण्यासाठी काय करावे लागेल:

मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअर होण्यासाठी तुम्ही दोन मार्ग वापरू शकता. यातील एक मार्ग हा दहावी झाल्यानंतर लगेचच सुरू होतो, तर दुसरा बारावीनंतर खुला होतो.

तुम्ही दहावीनंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दहावीनंतर स्थापत्य अभियांत्रिकी मधील अर्थात सिविल इंजिनिअरिंग मधील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या पदविकेच्या आधारावर पदवीस प्रवेश घ्यावा लागेल. हा पदविका अभ्यासक्रम सुमारे तीन वर्ष इतका असतो. त्यानंतर तुम्ही पदवीसाठी नाव नोंदणी करू शकता.

बारावीनंतर जर तुम्हाला पदवी घ्यायची असेल, तर तुम्ही एकतर बारावीनंतरही पदविकेच्या मार्गाने जाऊ शकता किंवा डायरेक्ट पदवीला ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी तुम्ही बारावी मध्ये पीसीएमबी या ग्रुपसह उत्तीर्ण व्हायला हवे. त्यानंतर मिरीटनुसार तुम्हाला मार्क असायला हवे. सोबतच तुम्ही या क्षेत्रात येण्यासाठी लागणारी प्रवेश परीक्षा देखील दिलेली असली पाहिजे. या प्रवेश परीक्षेच्या आणि बारावीच्या गुणांनुसार मेरिट लिस्ट लावली जाते. त्यामध्ये तुमचा क्रमांक आल्यास तुम्हाला ऍडमिशन दिले जाते.

सिव्हिल इंजिनियर चे कार्य किंवा भूमिका काय असतात:

  • कुठलाही प्रकल्प तडीस नेण्यासाठी नकाशे तयार करणे, सर्वेक्षण करणे आणि या माहितीच्या आधारावर योग्य प्लॅन तयार करणे.
  • या प्रकल्पामुळे होणारी पर्यावरणीय हानी, सरकारची निर्बंध नियम, बांधकामाला होणारा खर्च, आणि यातील जोखमा या गोष्टींचे विश्लेषण करणे;
  • स्थानिक स्वराज्य संस्था जसे की नगरपालिका, महानगरपालिका, यांच्या सुरक्षा विभागाकडून सदर प्रोजेक्ट ला मंजुरी मिळविणे.
  • सरकारच्या नियमानुसार संपूर्ण काम होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे,
  • बांधकामाच्या महत्त्वाच्या टप्प्यास उपस्थित राहून तेथील आढावा घेणे, आणि शक्य त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे, जेणेकरून कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडू नये.

सिविल इंजीनियरिंग चे फायदे:

  • देश प्रगती करत असताना तुमच्याद्वारे निर्माण केले गेलेल्या संरचनांचा एक भाग असल्याबाबत अभिमान वाटतो.
  • या कार्यादरम्यान वेगवेगळ्या लोकांशी भेट होईल, परिणामी तुमचा अनुभव वाढेल. शिवाय तुमच्या ओळखी ही वाढतील.
  • तुमचे कार्य हे उत्तुंग शिखरसारखे सर्वांना दिसत असल्यामुळे तुमची प्रशंसा केली जाईल.
  • तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्ही बांधकामांमध्ये नाविन्यता आणू शकता, तसेच बांधकामाला अतिशय आकर्षक बनवू शकता.
  • बांधकाम साइट्स वर काम करणाऱ्या कामगारांकडून सिव्हिल इंजिनियर ला चांगला मानसन्मान आणि आदर दिला जातो.

निष्कर्ष:

मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग ही एक व्यवसायिक शिक्षण देणारी पदवी असून, याद्वारे विद्यार्थी व्यावसायिक जगात पाऊल ठेवू शकतो. अगदी खाजगी किंवा सरकारी प्रकारचे टेंडर घेणे, टेंडर नुसार विविध बांधकामे करून देणे, त्यासाठीचे सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करणे, यांसारखे कार्य सिव्हिल इंजिनिअर करत असतो. तसेच खाजगी लोकांना घर बांधण्यासाठी सल्ला देणे, किंवा घराबाबतच्या नवीन आराखड्यांच्या प्रति देणे, यासारखे कार्य देखील करत असतो.

आजच्या भागामध्ये आपण याच सिविल इंजिनियर बद्दल माहिती घेतली आहे. त्यामध्ये तुम्हाला सिविल इंजिनिअरिंग म्हणजे काय, सिव्हिल इंजिनिअर बनण्यासाठी काय पद्धती असते, त्यानंतर पुढे काय अभ्यासक्रम केले जाऊ शकतात, तसेच साधारण नोकरीमध्ये पगार किती मिळू शकतो, कार्य किंवा भूमिका काय असतात, या पदवीचे फायदे काय होतात, किंवा तोटे काय होतात, आणि काही महाविद्यालयांची यादी इत्यादी गोष्टी बघितलेले आहेत.

FAQ

सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पदवीचा अभ्यासक्रम कठीण आहे का?

नाही सिविल इंजिनिअरिंग हा फारसाही अवघड अभ्यासक्रम नसून, मध्यम बुद्धीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा अभ्यासक्रम पूर्ण करणे सहज शक्य होते.

सिव्हिल इंजिनियर म्हणून करिअर करणे उत्तम ठरू शकते का?

मित्रांनो, आजकाल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप जोराने होत आहे. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंजिनियर्स ची आवश्यकता असते, त्यामुळे हे करियर नक्कीच उत्तम ठरू शकते.

सिव्हिल इंजिनिअर चे मूळ काम काय असते?

सिव्हिल इंजिनियर चे मूळ काम हे विविध प्रकारचे रस्ते, इमारती, पूल, पाणीपुरवठाच्या यंत्रणा, इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती करून त्यांचे देखभाल करणे हे असते.

सिव्हिल इंजिनिअरच्या तोट्या मध्ये मुख्य तोटा कोणता सांगितला जातो?

मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा एक सेटल करिअर निवडण्यासाठी अभ्यासक्रम निवडत असतो. मात्र सिव्हिल इंजिनियर ला आपला बराचसा वेळ उन्हात बाहेर घालावा लागतो, त्यामुळे हे करियर निवडण्यास अनेक लोक नको म्हणतात.

एक नुकताच सिविल इंजिनियर झालेला विद्यार्थी साधारणपणे किती रुपये कमवू शकतो?

एक नुकताच सिव्हिल इंजिनिअर झालेला विद्यार्थी साधारणपणे एका वर्षाला १.५ ते ३.० लाख रुपयांपर्यंत पैसा कमवू शकतो. कधीकधी हा आकडा २५ ते ३० लाखांपर्यंत ही जाऊ शकतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंग या पदवी विषयी माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली का, ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना की, जे या क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही माहिती जरूर शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment