छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण माहिती Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे वारस म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना ओळखले जाते.  औरंगजेब याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून त्यांना ओळखले जात असे. त्यांनी विजापूर व गोवळकोंडा या दोन ठिकाणावरील मुघल साम्राज्याला आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांनी अगदी मृत्यूपर्यंत आपला स्वाभिमान राखला, आणि हेच त्यांच्या निर्भयतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. औरंगजेबाने केलेल्या कठोर छळा नंतर देखील त्यांनी आपला स्वाभिमान कुठेही कमी न होऊ देता धर्म परिवर्तन करण्यास नकार दिला, आणि शेवटी त्यांना वयाच्या ३१ व्या वर्षी वीरमरण प्राप्त झाले.

Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण माहिती Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण अशा या महान राजाच्या बद्दल माहिती बघणार आहोत…

नावछत्रपती संभाजी महाराज
संपूर्ण नावयुवराज संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
जन्म दिनांक१४ मे १६५७
जन्म स्थळपुरंदर किल्ला
आईवडीलराणी सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज
बंधूचे नावराजाराम महाराज
पत्नीचे नावयेसूबाई
पुत्रछत्रपती शाहू महाराज
निधन११ मार्च १६८९, तुळापूर, पुणे

छत्रपती संभाजी महाराज यांचे कौटुंबिक जीवन:

मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे शिवपुत्र होते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या आईचे नाव सईबाई असे होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बंधूंचे नाव राजाराम महाराज, तर बहिणींची नावे शकूबाई, अंबिकाबाई, दीपाबाई, राणूबाई, राजकुवरबाई, आणि कमलाबाई असे होते. छत्रपती संभाजी महाराजांनी येसूबाई यांच्याशी विवाह केलेला होता, आणि या दाम्पत्याला एक मुलगा झाला होता. ज्याचे नाव छत्रपती शाहू असे ठेवण्यात आलेले होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण:

मित्रांनो १४ मे १६५७ या दिवशी पुरंदर किल्ल्यावर जन्म झालेले छत्रपती संभाजी महाराज आपल्या आजी अर्थात जिजाऊ मासाहेब यांच्या छत्र छायेखाली वाढले. याचे कारण म्हणजे अगदी दोनच वर्षाचे असताना त्यांची आई सईबाई या संभाजी राजांना सोडून देवाघरी गेल्या. मासाहेब जिजाऊ संभाजी महाराजांना लाडाने शंभू किंवा छावा या नावांनी हाक मारत असत.

संभाजी महाराज हे शिक्षणामध्ये अतिशय तल्लख होते, त्यांना संस्कृत भाषा खूप छान पद्धतीने अवगत होती. त्या बरोबरीनेच ते इतर १३ भाषा देखील बोलत असत. वयाच्या नवव्या वर्षी ते अंबरचे राजा जयसिंग यांच्याकडे शिक्षणासाठी पोहोचले. तेथे त्यांनी धनुर्विद्या, घोडेसवारी, तलवारबाजी यांचे शिक्षण घेऊन त्यात पारंगत झाले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्याचबरोबर इतर अनेक ग्रंथ देखील त्यांनी रचलेले आहेत. ज्यामध्ये नायिकाभेद, नखशिखान्त, सतशतक यांसारख्या ग्रंथांचा समावेश होता.

छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रथम युद्ध:

मित्रांनो, वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपले पहिले युद्ध केले, आणि ते जिंकले सुद्धा. या युद्धामध्ये त्यांनी तब्बल सात किलो वजनाची तलवार वापरली होती. ज्यावेळी १८८० मध्ये शिवरायांचे निधन झाले, त्यावेळी स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी संभाजी महाराज यांच्यावर येऊन ठेपली.

त्यांनी औरंगजेबाचा बऱ्याचदा पराभव केला. आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये संभाजी महाराजांनी जवळपास सव्वाशे युद्ध केले, आणि हे प्रत्येक युद्ध त्यांनी जिंकले देखील. हा त्यांचा एक असाधारण गुण किंवा वैशिष्ट्य म्हणता येईल.

छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश:

मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे मैत्री साठी खूप प्रसिद्ध होते. त्यांचे कवी कलश नावाचे एक अतिशय प्रिय मित्र होते. ज्यांनी त्यांना अगदी शेवटपर्यंत साथ दिली. अगदी ज्यावेळी संभाजी महाराजांना कैद करण्यात आले, त्यावेळी सुद्धा त्यांच्यासोबत कवी कलश उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा:

मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संपूर्ण स्वराज्य दुःख सागरात लोटले गेले. यावेळी स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी संभाजीराजांवर आली. त्यांनी १६ जानेवारी १९८१ रोजी आपला राज्याभिषेक केला, आणि स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. यामध्ये त्यांना हंबीरराव मोहिते यांनी खूप सहकार्य केले.

मात्र अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांनी संभाजी राजांचा धाकले बंधू राजाराम महाराजांना राजा बनविण्याचे ठरविले. मात्र त्याची शिक्षा म्हणून संभाजीराजांनी या दोघांनाही हत्तीच्या पायी दिले.

संभाजी महाराजांची कैद:

मित्रांनो, संभाजी महाराज यांनी आपल्या कर्तृत्वाने औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. काहीही करून संभाजी महाराज यांचा नाश व्हावा अशी औरंगजेबाची मनोमन इच्छा होती. त्यामुळे त्यांनी योजना आखली, आणि त्यानुसार मुकर्रब खान यास संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवले. या मुकर्रब खानाने संभाजीराजांवर अतिशय अनपेक्षित पणे हल्ला करून छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे प्रिय मित्र कवी कलश या दोघांनाही कैद केले.

ज्यावेळी त्यांना औरंगजेबाच्या दरबारात उभे करण्यात आले, त्यावेळी स्वतः औरंगजेब म्हणाला की शिवपुत्र संभाजी राजा माझ्यासमोर उभा राहणे हे माझे भाग्य आहे. यावेळी कवी कलश यांनी एक काव्य केले की, औरंगजेबाने आपली आसन सोडून संभाजीराजांसमोर गुडघे टेकवलेले आहेत.

यामुळे, औरंगजेब संतापला आणि त्याने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची सूचना केली. मात्र स्वाभिमानी संभाजी महाराजांनी त्यास नकार दिला. ज्यामुळे शेवटी चिडून औरंगजेबाने त्यांचा १४ दिवस अनन्वित अत्याचार आणि छळ केला. ज्यामुळे ११ मार्च १६८९ या दिवशी संभाजी महाराज यांचे निधन झाले. आज देखील संभाजी राजांचा स्वाभिमान आपल्याला प्रेरणा देत असतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे नाव डोळ्यासमोर आले की आपल्यासमोर वाघाचा जबडा फाडणारा एक युवक उभा राहतो. संभाजी महाराजांचे कर्तृत्व इतके मोठे होते की, त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एकही लढाई हरली नाही. त्यांचे प्रतिस्पर्धी शत्रू त्यांना नेहमी घाबरून राहत असत.

ताकत इतकी प्रचंड होती की ते एका वेळी दोन तलवारींनी युद्ध करत असत. त्यांना नेहमी स्वतः रणांगणावर जात युद्ध करण्याची सवय होती. छत्रपती संभाजी महाराज यांना शिवरायांकडून स्वराज्याची गादी मिळालेली असली, तरीदेखील या स्वराज्याला टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आलेली होती. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीच आराम केलेला आठवत नाही.

ते नेहमी कुठल्या ना कुठल्या लढाईमध्येच व्यस्त असत. त्यांनी कोकणापासून पूर्वेपर्यंत संपूर्ण शत्रूंच्या नाकात दम करून ठेवला होता. अशा या कर्तृत्ववान राजा बद्दल अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आज आपण माहिती पाहिली.

FAQ

संभाजी महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी १४ मे या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

संभाजी महाराज यांच्या अतिशय प्रिय मित्राचे नाव काय होते?

संभाजी महाराजांच्या अतिशय प्रिय मित्राचे नाव कलश असे होते जे कवी देखील होते.

छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेले सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते?

संभाजी महाराजांनी स्वराज्याला शाबूत ठेवण्याबरोबरच धर्म परिवर्तन करून गेलेल्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्यास मदत केली, हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी सर्वात जास्त कार्य कोणत्या क्षेत्रामध्ये केले?

छत्रपती संभाजी महाराजांनी कोकणासह दक्षिणेमध्ये सर्वात जास्त कार्य केलेले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये काय सांगता येईल?

छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास ते उभ्या आयुष्यामध्ये कुठलीही लढाई हरले नव्हते हे  सांगता येईल.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण धर्मवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी इत्यंभूत माहिती पाहिली. ही माहिती प्रत्येकाला निश्चितच आवडली असेल, तसेच इतरांना देखील ही माहिती वाचण्याचा आस्वाद घेता यावा म्हणून शेअर करणे ही तुमची एक जबाबदारीच बनते.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment