चंद्रयान ३ ची संपूर्ण माहिती Chandrayaan 3 Information In Marathi

Chandrayaan 3 Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो चंद्र आपल्यासाठी लहानपणापासूनच एक आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. लहान असताना चंदा है तू मेरा सूरज है तू या गाण्यापासून तरुण वयात चांद तारे तोडून आणण्यापर्यंत अनेक गोष्टींची उपमा हा चंद्र असतो. मित्रांनो गमतीचा भाग सोडला तर चंद्र हा पृथ्वीसाठी अतिशय उपयुक्त असा उपग्रह आहे. पृथ्वीचा एकमेव आणि सर्वात महत्त्वाचा उपग्रह म्हणून चंद्राला ओळखले जाते.

Chandrayaan 3 Information In Marathi

चंद्रयान ३ ची संपूर्ण माहिती Chandrayaan 3 Information In Marathi

गमतीने काही लोक म्हणतात आम्ही चंद्रावर जमीन घेतलेली आहे, मात्र आता भारत देखील चंद्रावर पोहोचला आहे. नुकतेच भारताने चंद्रयान तीन हे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या प्रक्षेपित केले, आणि अवघ्या विश्वामध्ये भारताची मान गर्वाने ताठ झाली. या सर्व प्रक्रियेचा प्रत्येक भारतीय नागरिक लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग च्या माध्यमातून साक्ष झाला. आणि प्रत्येकाने या मंगलप्रसंगी भारतासाठी मनोमन प्रार्थना करत, यशस्वी झाल्यानंतर आनंदोत्सव देखील साजरा केला. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण याच चंद्रयान विषयी माहिती बघणार आहोत, तसेच त्याविषयी काही महत्त्वाची तथ्य माहिती देखील जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा…

नाव चांद्रयान ३
प्रयत्नतिसरा
यशस्विता१०० टक्के यशस्वी
प्रक्षेपण दिनांक१४ जुलै २०२३ या दिवशी दुपारी ०२ वाजून ३५ मिनिटांनी
चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग दिनांक२३ ऑगस्ट २०२३ या दिवशी सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी

मित्रांनो, भारताने प्रक्षेपित केलेले चंद्रयान तीन चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले, आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा पहिला देश बनला. यासाठी भारताने तब्बल ६१५ कोटी इतका खर्च केला. भारताच्या या यशामुळे संपूर्ण देशवासीयांची मान अभिमानाने ताठ झाली. सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे, यामुळे भारत हा वैश्विक पातळीवर एक दखलपात्र देश बनलेला आहे.

दिनांक १४ जुलै २०२३ रोजी दुपारी सर्व भारतीयांनी एका अभुतपूर्व प्रसंगाचा साक्षी होत, भारताच्या सर्वात वजनदार रॉकेट एल व्ही एम थ्री याद्वारे चांद्रयान तीन ला निरोप दिला. असे हे बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चंद्रयान तीन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यामधून प्रज्ञान नावाचे एक रोव्हर व विक्रम नावाचे एक लँडर चंद्रावर उतरवले गेले. हे चांद्रयान तीन बरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दिवस उजाडला त्याच दिवशी उतरवण्यात आले, जेणेकरून पुढील चौदा दिवस जोपर्यंत चंद्रावर दिवस आहे तोपर्यंत ते पूर्ण क्षमतेनीशी कार्य करू शकेल.

विक्रम लँडर वरील चार पेलोड्स व त्यांची कार्ये:

मित्रांनो, चंद्रयान तीन मोहिमेमध्ये भारताने चंद्रावर विक्रम लेंडर उतरवले हे आपल्याला माहितीच आहे. तर या लँडरला  रंभा,  चाष्टे,  ईलसा  आणि लेझर रेट्रो रिफ्लेक्टर एरे नावाचे चार पेलोड बसवण्यात आलेले आहेत. त्यांचे वेगवेगळे कार्य आहेत. यामधील रंभा (RAMBHA) नावाचे पेलोड्स चंद्राच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे व त्यामधून येणाऱ्या प्लाजमा कनांचे घनत्व किती आहे, यांची संख्या किती आहे, व त्यामुळे होणारे विविध बदल यांचा अभ्यास करणार आहे.

चास्टे (ChaSTE) हा पेलोड्स चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाच्या अभ्यासासाठी बसविण्यात आलेला असून, ईलसा (ILSA) हा ज्या ठिकाणी लँडिंग करण्यात आले त्याच्या आसपास काही भूकंप धक्के बसतात का? याचे परीक्षण करणार आहे. तर शेवटचा लेझर रेट्रो रिफ्लेक्टर एरे (L R A) हा पॅलेस चंद्राच्या डायनॅमिक्स ला समजून घेणार आहे.

प्रज्ञान रोव्हरवरील दोन पेलोड्स व त्यांची कार्ये:

मित्रांनो, ज्याप्रमाणे विक्रम लँडरवर चार पेलोड्स आहेत त्याचप्रमाणे प्रज्ञान रोव्हरवर सुद्धा दोन पेलोड्स बसविण्यात आलेले आहेत, त्यांची नावे लेजर इंडयुस्ड ब्रेकडाऊन स्पेक्रोस्कोप (L I B S) आणि अल्फा पार्टीकल एक्स रे स्पेक्टरोमिटर (A P X S) असे आहेत  ज्यांची कार्ये अनुक्रमे चंद्राच्या पृष्ठभागावरील विविध रसायनांची संख्या व त्यांच्या गुणवत्तेचा अभ्यास करणे, व तेथे असणारे विविध खनिज यांचा शोध घेणे, तर दुसऱ्याचे काम एलिमेंट कंपोझिशन अभ्यासाने, तसेच लँडिंग केलेल्या क्षेत्रांमध्ये असणाऱ्या विविध एलेमेंट्स आणि तेच एलिमेंट्स पृथ्वीवर असताना असणारे गुणधर्म याचा अभ्यास करणे हे असेल.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारत देश चंद्रावर जाणारा देश ठरलेला आहे. भारताने एकूण तीन वेळेस चंद्र मोहिमा पार पाडल्या, ज्यामध्ये चंद्रयान  एक, चंद्रयान दोन, व चंद्रयान तीन यांचा समावेश होतो. हल्लीच भारताने चंद्रयान तीन नावाचे यान अवकाशामध्ये प्रक्षेपित केले, आणि ते यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. ज्यामध्ये रोव्हर आणि लॅण्डर असे दोन भाग होते, जे देखील व्यवस्थितरित्या काम करत होते. त्यानंतर चंद्रावर रात्र झाल्यामुळे या दोघांच्याही विद्युत प्रवाहात खंड आला, आणि त्यामुळे त्यांचे कार्य बंद पडले. मात्र यामुळे भारताच्या शिरपेचात एक नवीन मानाचा तुरा खोवला गेला.

भारताने अवकाश क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली आहे, आणि याचे श्रेय डॉक्टर अब्दुल कलाम यांना जाते. त्यांनी भारताला चंद्रयान तीन यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यास समर्थ बनवण्यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे. मित्रांनो, एक भारतीय नागरिक असण्याच्या नात्याने आपण देखील सर्वांनी भारताच्या या कामगिरीवर भारताचा गौरव केला पाहिजे, आणि अशा पुढील कामगिरीसाठी भारताला सपोर्ट देखील केला पाहिजे.

India Makes History! | Chandrayaan 3 Lunar Landing | Dhruv Rathee

🎓 Master ChatGPT: Student Special Course: https://academy.dhruvrathee.com/chatgptstudent🤖 Master ChatGPT: Full Course: https://academy.dhruvrathee.com/cha...

FAQ

भारताने चांद्रयान तीन केव्हा प्रक्षेपित केले?

भारताने चांद्रयान तीन हे १४ जुलै २०२३ या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी प्रक्षेपित केले.

भारताने प्रक्षेपित केलेले चंद्रयान तीन हे चंद्राच्या पृष्ठभागावर किती तारखेला, व किती वेळेला उतरले?

भारताचे चांद्रयान तीन हे चंद्राच्या पृष्ठभागावर दिनांक २३ ऑगस्ट २०२३ या दिवशी संध्याकाळच्या ०६ वाजून ०४ मिनिटांनी उतरले.

चंद्रयान तीन हा भारताचा चंद्रावर जाण्याचा कितवा प्रयत्न होता?

चंद्रयान तीन हा भारताचा चंद्रावर जाण्याचा तिसरा प्रयत्न होता.

भारताने चंद्रयान तीन या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलेल्या रोव्हर चे नाव काय होते?

भारताने चंद्रयान तीन या मोहिमांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलेल्या रोव्हर चे नाव प्रज्ञान असे होते.

भारताने चंद्रयान तीन या मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलेल्या लँडर चे नाव काय होते?

भारताने चंद्रयान तीन या मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलेल्या लँडर चे नाव विक्रम असे होते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चंद्रयान तीन या विषयी माहिती पहिली, ती माहिती तुम्हाला आवडली ना हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच तुम्हाला अजून काही माहिती असेल तर ती देखील कमेंट मध्ये सांगायला विसरू नका, योग्य त्या माहितीला नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल. या माहितीचा फायदा व्हावा म्हणून तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील ही माहिती शेअर करा.

धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment