म्हैस प्राण्याची संपूर्ण माहिती Buffalo Animal Information In Marathi

Buffalo Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो जसजशी मानवाची उत्क्रांती होत गेली तसतसे माणूस स्थायिक होऊ लागला, आणि पुढे जाऊन त्यांनी विविध प्राणी पाळायला सुरुवात केली. यामध्ये म्हैस हा देखील एक महत्त्वाचा प्राणी आहे.

म्हैस प्राण्याची संपूर्ण माहिती Buffalo Animal Information In Marathi

मित्रांनो, मानवाने प्राणी पाळले त्यातून काही ना काही फायदा  मिळविला. म्हैस पाळण्याचे मुख्य कारण म्हणजे म्हशी पासून मिळणारे दूध होय. तसेच म्हशीचे नर ताकदीच्या कामासाठी देखील वापरले जात. आजकाल म्हशीच्या अनेक प्रजाती असून या मुख्यत्वे करून दुधासाठीच वापरल्या जातात. म्हैस आणि गाय यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे.

सुमारे सात ते अकरा वर्षे जगणारी ही म्हैस आपल्या उभ्या आयुष्यात अनेक बछड्यांसह दुधाचे भरपूर उत्पन्न देते. गायी पेक्षा म्हैस सांभाळण्याचा खर्च अधिक असतो, असे असले तरी देखील गाईपेक्षा म्हशीच्या दुधाला मिळणाऱ्या उच्च दरामुळे म्हैस पालन परवडते.

म्हशीमध्ये अनेक प्रजाती असल्या तरीदेखील अँनोना म्हैस, जंगली म्हैस, आफ्रिकन म्हैस, आणि पाण म्हैस या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. भारतामध्ये मुख्यत्वे करून पाण म्हैस ही प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळते. या प्रजातीलाच भारतीय म्हैस असे म्हणून देखील ओळखले जाते.

आजच्या भागामध्ये आपण सर्वांच्या परिचयाचा असणारा आणि ताकतवान असून देखील शांत असणारा प्राणी म्हणजेच म्हैस याबद्दल माहिती बघणार आहोत…

नाव:म्हैस
इंग्रजी नाव: बफेलो
शास्त्रीय नाव: ब्युबॅलस ब्युबॅलिस
साधारण आयुष्यमान: सुमारे सात ते अकरा वर्षे
दूध देण्याचा कालावधी: सुमारे २७० ते २८० दिवस प्रति वेत
मुख्य आहार: गवत, पेंड, वैरण इ. (शाकाहारी)
प्रजननास सुरुवात:साधारणपणे वयाच्या दोन ते अडीच वर्षानंतर
उगम: आफ्रिका व आशिया
मांस:बीफ किंवा कॅराबीफ
महाराष्ट्रातील मुख्य म्हैस जात: मूर्राह म्हैस
उत्तम दुधाची गुणवत्ता असणारी म्हैस: भदावरी म्हैस

मित्रांनो, भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये म्हैस हा एक सस्तन पाणी पाळला जातो. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हशी आढळून येतात. असे असले तरीदेखील गाईंच्या वाढत्या दूध क्षमतेमुळे म्हशींची संख्या कुठेतरी कमी होत चालली आहे. हल्ली लोक घरी खाण्यासाठी आणि रतीबाच्या दुधासाठीच खरे तर म्हशी पाळतात.

म्हशीचे दूध खाण्यासाठी, चहासाठी तर वापरले जातेच, मात्र म्हशीच्या दुधामध्ये उत्तम प्रतीचे प्रथिने आणि फॅटचे प्रमाण जास्त असल्याने यापासून खवा किंवा इतर मिठाई पदार्थ अतिशय उत्कृष्ट बनतात. त्यामुळे मिठाई दुकानदारांमध्ये म्हशीच्या दुधाला मोठी मागणी असते.

काही ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार भारतामध्ये सिंधू संस्कृती पासून म्हणजेच जवळपास पाच हजार वर्षांपासून म्हैस पालन केले जाते. एक काळ असा होता जेव्हा म्हशी फक्त आशियामध्येच आढळल्या जायच्या, मात्र आजकाल म्हशींचे क्षेत्र युरोप आणि आफ्रिका या देशातही वाढले आहे. गाई पेक्षा म्हशीचे दूध जास्त घट्ट असते. तसेच त्यामध्ये गोडसरपणा देखील जास्त असतो, त्यामुळे पिण्यासाठी म्हशीच्या दुधाची मागणी ग्राहकांकडून केली जाते.

म्हैस शाकाहारी प्राणी असल्यामुळे म्हशीला शाकाहारी अन्न दिले जाते. यामध्ये गवत, धान्याचा कोंडा किंवा पेंढा, वाळलेली वैरण इत्यादी गोष्टी दिल्या जातात, मात्र शक्य असल्यास म्हशीला हिरव्या गवतावर चरायला सोडल्यास दुधाच्या गुणवत्तेत आणि प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते. म्हैस हा सस्तन प्राणी असल्यामुळे आधी दिलेला चारा पटापट खाऊन नंतर संथपणे तोंडामध्ये रवंथ करताना दिसतो.

साधारणपणे दोन ते अडीच वर्षांचे झाल्यानंतर म्हैस प्रजननासाठी उत्तम होते. मात्र बरेचसे म्हैस पालक म्हशीच्या वयाच्या तिसऱ्या वर्षानंतरच तिला प्रजननासाठी तयार करतात. म्हशींचा गर्भधारणेचा कालावधी सुमारे दहा महिने आणि दहा दिवस इतका असतो. म्हैस वेताच्या वेळी एकच रेडकू जन्माला घालते. सुरुवातीचे काही दिवस चीक दिल्यानंतर पुढील २७० ते २८० दिवस म्हैस दूध देत असते.

म्हैस असा प्राणी आहे ज्यामध्ये तोंडाच्या केवळ खालील बाजूसच दात आढळतात. म्हशीला वरच्या बाजूला दात नसतात. म्हैस हा प्राणी कितीही मोठा असला तरी स्वभावाने अतिशय शांत आहे. मात्र जर म्हशीला कोणी त्रास दिला किंवा खोड काढली तर म्हैस अतिशय क्रोधीत होऊन आपल्या शिंगांनी समोरील व्यक्ती किंवा प्राण्यावर हल्ला करते.

म्हशीच्या दुधाचे फायदे:

मित्रांनो गाई पेक्षा म्हशीचे दूध चांगले असते, हे आपण प्रत्येक ठिकाणीच ऐकले असेल. म्हशीच्या दुधामध्ये अधिक प्रमाणात प्रथिने आणि फॅट्स असतात. त्यामुळे म्हशीचे दूध अतिशय घट्ट आणि मलईदार बनते, म्हणूनच की काय लोणी, दही, तूप इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी गाईपेक्षा म्हशीच्या दुधाला प्राधान्य दिले जाते.

इतके असून देखील म्हशीचे दूध हे कोलेस्ट्रॉल ने अतिशय कमी असते. त्यामुळे म्हशीच्या दुधाने माणूस फार लठ्ठ होतो या अफवेला काहीही अर्थ उरत नाही. त्याचप्रमाणे म्हशीचे दुधात हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाणारे खनिजे आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.

म्हशीच्या प्रजाती:

मित्रांनो, भारतामध्ये अनेक प्रकारच्या म्हशी असल्या तरी देखील मूर्राह, भदावरी, पंढरपुरी, सुरती, जाफराबादी, बन्नी, नागपुरी, मेहसाणा, निली रवी या प्रमुख प्रजाती आहेत. यापैकी मुर्राह या म्हशीला सर्वात जास्त दूध उत्पादन करणारी म्हैस म्हणून ओळख मिळालेली आहे. ही म्हैस मुख्यत्वे हरियाणा, पंजाब, आणि दिल्ली या प्रदेशात आढळते.

महाराष्ट्रात देखील मुंबई मुऱ्हा या नावाने ही म्हैस आढळून येते. तसेच भदावरी ही म्हैस उत्तम प्रतीच्या दुधासाठी म्हणजेच जास्तीत जास्त फॅट असणाऱ्या दुधासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या पाठोपाठ जाफराबादी ही म्हैस भारतातील सर्व म्हशीमध्ये सर्वात जास्त वजनदार प्रजाती आहे. जाफराबादी म्हशीचे वजन सुमारे साडेसातशे किलो पर्यंत असते.

म्हैस प्राण्याबद्दल काही महत्वाची तथ्ये:

  • सुरुवातीच्या काळात केवळ आशियाई  देशांमध्ये त्यातही भारतामध्ये म्हशींचे पालन केले जाई.
  • म्हशीच्या दूध उत्पादनाबाबतीत संपूर्ण जगभरात भारत हा प्रथम क्रमांकावर येतो.
  • भारतात सुमारे ५००० वर्षांपासून म्हशी पाळल्या जातात.
  • म्हशीचे दूध सर्वात गोड असे असते.
  • म्हशीच्या दुधापासून उत्तम दर्जाचे तूप आणि इतरही दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात.

निष्कर्ष:

मित्रांनो म्हैस हा प्राणी आपल्या रोजच्या पाहण्यातील, मात्र असे असूनही आपल्यातील अनेकांना म्हशी बद्दल खूप मोठ्या प्रमाणात जिज्ञासा असते. आणि यासाठी आजचा हा लेख होता. या लेखामध्ये म्हशीबद्दल जवळजवळ सर्वच माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हैस पालन योग्य रीतीने केल्यास त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न घेतले जाऊ शकते.

आज अनेक क्षेत्रांमध्ये बेरोजगारीचे मोठे सावट निर्माण झालेले आहे, अशावेळी नवतरुणांनी म्हैस पालन व्यवसायाचा आधार घेत स्वतःलाच रोजगारीत केले तर अतिशय फायदेशीर ठरू शकते. म्हैस पालन सुरू करताना आपण साध्या अशा गोठ्यात आणि थोड्याशा म्हशींनी सुरुवात करून पुढे या व्यवसायाला वाढवू शकता.

masih vishay mahiti | mhais mahiti | mhashichi mahiti | mashi chi mahiti | mhashi vishay mahiti

नमस्कार मित्रांनो, या channel वर अतिशय सोप्या भाषेत माहिती सांगितली आहे त्यामुळे सर्वांना लवकर कळते, म्हणूनच व्हिडिओ ला पुर्ण बघत जा यार, मित्रांनो मी खूप मे...

FAQ

म्हशीचे शास्त्रीय नाव काय आहे?

म्हशीचे शास्त्रीय नाव ब्युबॅलस ब्युबॅलिस असे आहे.

म्हैस साधारण किती वर्षे जगते?

म्हैस साधारणपणे सात ते अकरा वर्षे इतकी जगते, केव्हाकेव्हा ती सुमारे पंधरा ते सतरा वर्षे इतकीही जगते.

कोणत्या म्हशीला सर्वात जास्त दूध देणारी म्हैस म्हणून ओळखले जाते?

मूर्राह या म्हशीला सर्वात जास्त दूध देणारी म्हैस म्हणून ओळखले जाते.

म्हैस एका वेताला किती दिवस दूध देते?

म्हैस एका वेताला साधारणपणे २७० ते २८० दिवस दूध देत असते.

म्हशीचा रंग कोणता असतो?

म्हशीचा रंग हा नेहमी काळा असतो, मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत पांढऱ्या रंगाच्याही म्हशी जन्म घेऊ शकतात.

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण सर्वांना परिचित असणाऱ्या म्हैस या प्राण्याबद्दल १००० शब्दांमध्ये माहिती पाहिली. या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, त्याचप्रमाणे तुमचे इतरही मित्र-मैत्रिणींना त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.

 धन्यवाद…

Kasturi Khule

कस्तुरी खुळे (Kasturi Khule) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा २ वर्षांचा अनुभव आहे. हि बी.सी.एस.(Bachelor Of Computer Science) च्या तिसऱ्या वर्षाला असून ती content writer चे काम उत्तम प्रकारे करीत असतात.

Leave a Comment