कुटु धान्याची संपूर्ण माहिती Buckwheat Information In Marathi

Buckwheat Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात सामान्यपणे गहू, ज्वारी आणि बाजरी इत्यादी धान्यांच्या भाकरी किंवा चपात्या केल्या जातात. फार फार तर मका आणि तांदळासारखे धान्य खाल्ले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का, की आपल्या नेहमीच्या धान्याव्यतिरिक्त सुद्धा कुटु नावाचे एक धान्य आहे. ज्याला इंग्लिश मध्ये बकव्हीट म्हणून ओळखले जाते. इतर अन्नधान्य प्रमाणे हे सुद्धा पिठाच्या स्वरूपात वापरले जाते. इतकेच नाही तर हे कुटुधान्य असंख्य आरोग्यदायी फायदे असणारे सुद्धा आहे, म्हणून आजकाल या कुटु धान्याची मागणी देखील वाढत चालली आहे.

Buckwheat Information In Marathi

कुटु धान्याची संपूर्ण माहिती Buckwheat Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण या कुटुधान्याबद्दल अर्थात बकव्हीट बद्दल माहिती बघणार आहोत…

नावकुटु
इंग्रजी नावबक व्हीट
शास्त्रीय नावFagopyrum esculentum
इतर नावेजुने धान्य, सुपर ग्रेन
प्रकारधान्य
उगमतिबेटचे पठार
कुळPolygonaceae
वापरनूडल्स, पीठ, भाजलेले दाणे इ.

कुटु म्हणजे नेमके काय?

मित्रांनो, कुटु म्हणजे झाडावरील बियांपासून बनवलेले एक तृणधान्य असून, त्याला ओगल किंवा फेफर म्हणून सुद्धा ओळखले जाते. सुमारे आठ हजार वर्षांपासून या कुटु धान्याची शेती केली जात असल्यामुळे याला जुने धान्य असे देखील नाव आहे. या धान्यापासून पीठ तयार करून त्याच्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवले जातात. उपवासाला चालणारे हे पीठ गव्हापासून वेगळे म्हणजेच ग्लुटेन फ्री असून ज्यांना ग्लुटेन फ्री अन्न खायचे आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. त्यामध्ये असणाऱ्या विविध पोषक घटकांमुळे त्याला सुपर ग्रेन असेही नाव देण्यात आलेले आहे.

कुटुची वनस्पती ही वार्षिक वनस्पती असून सुमारे दोन ते चार फूट वाढते, आणि याची पाने त्रिकोणी आकाराची तर फुले ही पांढऱ्या रंगाची आणि दिसायला आकर्षक असतात. कुटुचे धान्य अर्थात बिया या पांढरट तपकिरी रंगाच्या आणि आकाराने त्रिकोणी असतात.

कुटु धान्याचे उत्पादन भारतामध्ये विविध राज्यात घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आणि अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांचा मोठा वाटा आहे. तसेच दक्षिण भारताच्या निलगिरी पर्वतांमध्ये सुद्धा या पिकाची शेती केली जाते. देशांबद्दल बोलायचे झाल्यास भारत देशासोबतच युक्रेन, कझाकिस्तान, रशिया, चीन, जपान, आणि अमेरिका इत्यादी देशांमध्ये सुद्धा कुटुचे उत्पादन घेतले जाते.

कुट्टू पिकामधील पोषक घटक:

मित्रांनो, आपण सुरुवातीलाच पाहिले की कुटु हे अतिशय पोषक घटकांनी समृद्ध असलेले धान्य आहे. यामध्ये गहू, बाजरी इत्यादी धान्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात. सोबतच लायसीन आणि अर्जीनिन हे घटक देखील असतात. सोबतच खनिजांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, विटामिन्स, प्रथिने, लोह, जस्त, तांबे, फॉलेट, फॉस्फरस, थायामिन, कार्बोहायड्रेट्स इत्यादी घटकांनी देखील कुटु चे धान्य समृद्ध असते.

कुट्टू सेवनाचे फायदे:

मित्रांनो, कुटु हे धान्य अतिशय फायदेशीर आणि आरोग्यदायी समजले जाते. यामुळे शरीराला आलेली दुर्बलता किंवा अशक्तपणा दूर होण्यास मदत मिळते. कुटूच्या पिठामध्ये आढळणारी पोषक तत्व शरीराला ऊर्जा देऊन थकवा दूर करण्यास मदत करतात. तसेच आपल्या त्वचेची अत्यंत काळजी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा कुटु अतिशय फायदेशीर ठरते.

कुटु पिकाच्या सेवनामुळे त्वचा ही तेजस्वी आणि निरोगी होण्यास मदत होते. तसेच त्वचेला हवे असणारे पोषण देखील या पिठातून मिळते. वयानुसार पडणाऱ्या सुरकुत्या, काळी वर्तुळे, वांग आणि त्वचेचा रंग इत्यादी गोष्टींवर फायदेशीर ठरणारे हे कुटुचे पीठ त्वचेला एक वेगळीच चमक देते. या पिठामधील विटामिन ई, विटामिन ए, पोटॅशियम, प्रोटीन्स,  मॅग्नेशियम, आणि विविध अँटिऑक्सिडंट त्वचेसाठी अतिशय उत्तम समजले जातात.

मित्रांनो, आजकाल जेवणाच्या वेगळ्या सवयींमुळे कितीतरी लोकांना पित्ताचा त्रास होतो. हा त्रास कायमचा झाल्यास पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे तयार होतात. ज्यांना औषध उपचाराने बरे करणे शक्य नसते. त्यावर केवळ शस्त्रक्रिया हाच उपाय असतो. मात्र कुटूच्या पिठामध्ये असे तत्व आहेत, ज्यामुळे पित्ताचे खडे तयार होण्यापासून थांबविले जातात. परिणामी शरीराचे होणारे नुकसान आणि शस्त्रक्रिया करण्याचे त्रास देखील वाचतात.

मित्रांनो, आपल्या शरीरातील सर्वाधिक कार्यक्षम असणारा भाग म्हणजे यकृत होय. तो शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हटलं तरी देखील वावगं ठरणार नाही. या यकृताला संपूर्ण शरीराच्या नियंत्रणासाठी रसायने तयार करावयाची असल्यामुळे यामध्ये होणारा बिघाड संपूर्ण शरीराला घातक ठरतो. कुटूच्या पिठामध्ये आढळणारे विटामिन बी कॉम्प्लेक्स हे यकृतासाठी खूपच जास्त फायदेशीर ठरतात, ज्यामुळे यकृताचे आजार टाळणे शक्य होते.

मित्रांनो, उच्च रक्तदाबाचा आजच्या युगामध्ये कितीतरी लोकांना सामना करावा लागतो, त्यामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. रक्तदाब वाढल्यास शरीरासाठी खूप धोक्याचा ठरतो. वेळप्रसंगी जीवघेणा देखील ठरू शकतो. त्यामुळे रक्तदाब दुर्लक्षित करून चालत नाही. कुटुचे पीठ हे मॅग्नेशियम आणि इतरही पोषक घटक यांनी समृद्ध असल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करणे कुटुच्या पिठाच्या सेवनामुळे सहज शक्य होते. तसेच कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कुटू अर्थात बकव्हीट या धान्याबद्दल माहिती पाहिली. नैसर्गिकरित्या उष्ण गुणधर्माचे असणारे हे पीठ थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. असे असले तरी देखील एका पातळीतच त्याचा वापर फायदेशीर ठरतो, अन्यथा कुटु धान्याचा अतिवापर हानिकारक देखील ठरतो.

इतर लोकांना आरोग्यदायी ठरणारे हे पीठ उष्ण गुणधर्मामुळे गरोदर महिलांना खाण्यास योग्य नसते. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात तर अशा महिलांनी चुकूनही या पिठाचे सेवन करू नये. तसेच कुटुच्या पिठाच्या अतिवापरामुळे त्वचेच्या एलर्जी सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, किंवा शिळे कुटुचे पीठ खाल्ल्यामुळे शरीराच्या पेशी मृत होणे, पोटदुखी होणे किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना योग्य प्रमाणातच केली गेली पाहिजे.

तसेच या कुटु धान्याचे देखील आहे. शक्यतो डॉक्टरांशी सल्लामसलत करून कुटूच्या पिठाच्या सेवनाचे वेळापत्रक ठरविल्यास फायदेशीर ठरते.

FAQ

पोटाच्या चरबी संदर्भात कुटु या धान्यांचे काय फायदे आहेत?

कुटु हे धान्य पाचनतंत्र सुधारत असल्यामुळे, आणि त्याची कार्यक्षमता वाढवत असल्यामुळे पोटाच्या कोलन या भागामध्ये उपयुक्त बॅक्टेरीयाची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी पोट नेहमी भरल्यासारखे वाटते. आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

तांदूळ आणि कुटु या दोन धान्यांपैकी कोण सरस आहे?

तांदळापेक्षा कुटु या धान्यामध्ये खनिजे आणि अँटिऑक्सिडंट यांचे प्रमाण अधिक असते. तसेच प्रथिने व लहान मुलांसाठी आवश्यक असणारे लायसिन आणि अर्जीनीन इत्यादी अमिनो ऍसिडस् मुबलक प्रमाणात असल्याने कुटु तांदळापेक्षा सरस ठरते.

साधारणपणे एका दिवसामध्ये किती कुटु धान्याचे पीठ सेवन करणे सामान्य समजले जाते?

साधारणपणे एका दिवसामध्ये अर्धा कप अर्थात शंभर ग्रॅम कुटू धान्याचे पीठ सेवन करणे सामान्य समजले जाते.

कुटु या धान्यापासून काय बनवले जाऊ शकते?

कुटु या धान्यापासून अगदी इडली पासून खीर, पकोडे, पराठे, पुरी, चपाती, केक, नूडल्स, बिस्किट, किंवा लापशी इत्यादी पदार्थ बनविले जाऊ शकतात.

कुटु या धान्यांचे सेवन कोणत्या ऋतूमध्ये फायदेशीर समजले जाते?

कुटु हे धान्य उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे थंडीच्या ऋतूमध्ये अर्थात हिवाळ्यामध्ये याचे सेवन फायदेशीर समजले जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कुटु अर्थात बकव्हीट या धान्य बद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली की नाही ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, तसेच ज्यांना अजून या धान्याबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती जरूर शेअर करा.

धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment