ब्रोकोलीची संपूर्ण माहिती Broccoli Information In Marathi

Broccoli Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो ब्रोकोली आपल्यापैकी अनेकांनी खाल्लेली असेल अतिशय चवदार असणारी ही भाजी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत आहे. या गटातील ही भाजी हिरव्या रंगांमध्ये उपलब्ध असते. सॅलड्स, भाजी, करी, सूप किंवा तळलेले स्नॅक्स इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. याशिवाय या भाजीची खासियत म्हणजे संपूर्ण वर्षभर ही भाजी तुम्हाला उपलब्ध असते. या भाजीची फुले सुद्धा खाल्ली जातात मात्र पाने कडू असतात.

Broccoli Information In Marathi

ब्रोकोलीची संपूर्ण माहिती Broccoli Information In Marathi

मित्रांनो चवीला सुंदर असणारी ही भाजी आरोग्यदायी देखील आहे. यामध्ये तुम्हाला अ आणि क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर आढळून येते सोबतच फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी घटक देखील मुबलक प्रमाणावर असतात. याबरोबरच फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट असल्यामुळे आजारपणामध्ये आणि विविध संसर्गाच्या विरुद्ध लढण्याकरिता या भाजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

आजच्या भागामध्ये आपण या ब्रोकोली भाजी विषयी माहिती बघणार आहोत.

नावब्रोकोली
शास्त्रीय नावBrassica oleracea var. Itlaica
हायर क्लासिफिकेशनजंगली कोबी
प्रजातीब्रासिका स्पे
कल्टीव्हरइटलिका

ब्रोकोली म्हणजे काय?

मित्रांनो कोबीवर्गीय वनस्पती गटातील ही भाजी चवीला मात्र कोबी पेक्षा वेगळी असते. या ब्रोकोलीला शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमी भरून काढण्याकरिता ओळखले जाते.

या ब्रोकोली मध्ये गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह म्हणजेच आम्लपित्ताशी लढणाऱ्या प्रतिजैविकांचा तसेच अँटिऑक्सिडेंटचा अँटी कॅन्सर गुणधर्मांचा समावेश असल्यामुळे हिला आरोग्यदायी भाजी म्हणून ओळखले जाते. सोबतच हृदयाचे कार्य योग्य रीतीने चालवणे, लठ्ठपणा घालवणे, मधुमेहामध्ये फायदेशीर ठरणे, तसेच शरीराची सूज कमी करणे यांसाठी या ब्रोकोलीला ओळखले जाते.

ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे:

मित्रांनो ब्रोकोली मध्ये अनेक प्रकारचे खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळून येतात ज्यामुळे शरीरासाठी खूपच फायदा होत असतो. या घटकांमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक, लोह, विटामिन्स ए आणि सी, सेलेनियम यासारख्या अनेक घटकांचा समावेश असतो ज्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर केल्या जाऊ शकतात.

ज्या रुग्णांना हृदयविकाराचा त्रास जाणवत असेल अशांनी ब्रोकोली खावी असा सल्ला दिला जातो. सोबतच लठ्ठपणा असणाऱ्या लोकांसाठी वजन कमी करणे पाचन समस्यांच्या उपायांवर कार्य करणे मधुमेह रुग्णांना साखर वाढू न देणे इत्यादी गोष्टींमध्ये ब्रोकोलीचा हातखंडा आहे.

ब्रोकोली चे विविध प्रकार:

मित्रांनो ब्रोकोली या भाजीचे जगभर अनेक प्रकार आढळून येतात मात्र आजच्या भागामध्ये आपण मुख्य काही प्रकारांविषयी माहिती बघूया.

पहिला प्रकार म्हणजे कॅलाब्रेस ब्रोकोली होय. ही वरील बाजूस गडद हिरव्या रंगाची असणारी ब्रोकोली असून थंड वातावरणामध्ये चांगल्या रीतीने उगवली जाते.

ब्रोकोली राबे हा देखील ब्रोकोलीचा एक प्रकार असून ती पालेभाजी प्रमाणे दिसते. ब्रोको फ्लॉवर हे आपल्या फुलकोबी सारखे दिसणारे ब्रोकोलीचे प्रकार असून फुलकोबी पेक्षा त्याची चव खूपच छान असते.

अंकुरित ब्रोकोली हा देखील एक ब्रोकोलीचा प्रकार असून तो दिसायला ब्रोको फ्लावर सारखाच असतो मात्र याच्या वरील बाजूस छोटे छोटे अंकुर दिसून येतात.

जांभळा फुलकोबी देखील एक ब्रोकोली चा प्रकार असून हा देखील पत्ता कोबी प्रमाणे दिसतो मात्र त्याचा रंग जांभळा असतो. या फुलकोबीचा वापर यु एस ए आणि युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

अधिक प्रमाणावर ब्रोकोली खाण्याचे तोटे किंवा नुकसान:

मित्रांनो कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली असता ती फायदेशीर असते. मात्र अति तेथे माती या उक्तीनुसार ब्रोकोली देखील अति प्रमाणात खाणे शरीरासाठी चांगले नाही त्याचे फायदे होण्याऐवजी तोटे जास्त दिसून येतात. आपण आता ब्रोकोलीच्या तोट्यांबद्दल माहिती घेऊया.

साधारणपणे सामान्य प्रमाणात ब्रोकोली खाल्ल्यास धोकेदायक नसते मात्र या ब्रोकलीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात त्यांच्यामुळे पोटामध्ये गॅस तयार होणे किंवा छातीमध्ये जळजळ होणे अशा प्रकारच्या समस्या जाणवू लागतात.

ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी यांच्या वॅक्सनर मेडिकल सेंटर यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार ब्रोकोलीचे अधिक प्रमाणात सेवन रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या परिणामांमध्ये बाधा आणतात जेणेकरून या औषधांचा कुठलाही फायदा रुग्णास होत नाही आणि रक्त काही पातळ होत नाही. थायरॉईडची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी या ब्रोकोलीचे सेवन धोकेदायक समजले जाते.

गर्भवती महिला व स्तनदा माता यांनी काही प्रमाणात ब्रोकोली खाल्ल्यास फायदेशीर ठरते आणि त्यांच्यासाठी ते आरोग्यदायी देखील आहे. मात्र अधिक प्रमाणात ब्रोकोलीचे सेवन पोट फुगवू शकते ज्यामुळे अधिकचा त्रास सहन करावा लागू शकतो.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण ब्रोकोली बद्दल जी काही माहिती दिली किंवा आरोग्यदायी सल्ले दिले ते केवळ अभ्यासाच्या दृष्टीने घ्यावेत आपल्याला याबद्दल अधिक माहिती घेणे आवश्यक वाटत असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टर सोबत याबद्दल चर्चा करावी किंवा डायट प्लॅन सुचवणाऱ्या टेक्निशियन नुसार या पदार्थाचे कमी अथवा अधिक प्रमाणामध्ये सेवन करावे.

निष्कर्ष:

मित्रांनो ब्रोकोली ही आजकाल खूपच लोकप्रिय होत असणारी भाजी असून ती फुलकोबी या गटातील आहे. रंगाने हिरवी असणारी ही भाजी चवीला सुंदर दिसायला उत्कृष्ट आणि खूपच आरोग्यदायी देखील आहे. आजच्या भागामध्ये आपण या ब्रोकोली भाजी बद्दल माहिती बघितलेली आहे.

ज्यामध्ये तुम्हाला ब्रोकोली म्हणजे काय तिचे आरोग्यदायी फायदे काय आहेत तिचे कोणकोणते प्रकार असतात तसेच रक्तदाबा विषयी तिचे काय फायदे आहेत इत्यादी माहिती बघितलेली आहे. शिवाय ब्रोकोली चे जास्त प्रमाणात सेवन करण्यामुळे काय नुकसान होऊ शकतात याची देखील माहिती घेतलेली आहे. आणि काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

ब्रोकोली म्हणजे काय?

मित्रांनो ब्रोकोली म्हणजे कोबी वर्गीय वनस्पती असून ती फ्लॉवर या वनस्पती सारखी दिसते. मात्र रंगाने हिरवी असते आणि त्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म देखील असतात.

ब्रोकोली खाण्याचे आदर्श प्रमाण किती समजले जाते?

ब्रोकली खाण्याचे आदर्श प्रमाण प्रत्येक आठवड्यामध्ये एक किंवा दोन वेळेस असे आहे. मात्र कुठलीही गोष्ट अति प्रमाणात खाल्ली तर ती चांगली नसते त्यामुळे जास्त प्रमाणात देखील ब्रोकोली खाऊ नये.

केसांच्या आरोग्यामध्ये ब्रोकोलीचा कशा रीतीने फायदा होतो?

मित्रांनो ब्रोकोली मध्ये विटामिन सी आढळते हे तुम्हाला माहितीच आहे जे केसांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर असते. याशिवाय कॅल्शियम असल्यामुळे केसांच्या मुळांना बळकटी प्राप्त होण्यास मदत होते. याशिवाय ब्रोकोलीच्या सेवनामुळे केसांच्या टाळूवर तेलकट स्त्राव येतो ज्यामुळे तेथील त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते.

त्वचेच्या आरोग्यामध्ये ब्रोकोलीचा कशा रीतीने फायदा होतो?

ब्रोकोली या भाजीमध्ये असणारे झिंक विटामिन ए व सी हे घटक त्वचेला निरोगी व नितळ करण्यासाठी फायदेशीर असतात. तसेच ब्रोकोली मध्ये असणारे ल्युटीन हे बीटा कॅरोटीन प्रमाणे असणारे रंगद्रव्य आहे. ज्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा व सुरकुत्या घालवल्या जाऊ शकतात.

अति प्रमाणात ब्रोकोली खाणे कोणत्या समस्यांना निमंत्रण देऊ शकते?

मित्रांनो ब्रोकोली आरोग्यासाठी चांगली असली तरी देखील खूप मोठ्या प्रमाणावर ब्रोकोली खाणे पोटामधील गॅस वाढवू शकते. किंवा यामुळे छातीमध्ये जळजळ देखील जाणवू शकते.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण ब्रोकोली या आधुनिक काळात घेतल्या जाणाऱ्या भाजी विषयी माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य कळवा. तसेच तुम्ही देखील या भाजीचे सेवन केले आहे का व याची चव तुम्हाला आवडली का ते देखील कळवा आणि आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा.

धन्यवाद!!!!

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment