ब्रह्मकमळची संपूर्ण माहिती Bramha kamal Information In Marathi

Bramha kamal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो ब्रह्मकमळ माहित नाही असे लोक फारच थोडे असतील. हिंदू आणि बौद्ध धर्मात अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र मानले जाणारे ब्रह्मकमळ सगळ्या विश्वातील फुलांचे प्रतिनिधित्व करत असते असे म्हटले जाते. विष्णूला सर्वात आवडते असणाऱ्या पाच फुलांमध्ये ब्रह्मकमळाचा समावेश होतो. याला पंचकमळ असे म्हणून देखील संबोधले जाते. विष्णूच्या पाच आवडत्या फुलांमध्ये ब्रह्मकमळ, साधे कमळ, कुंकुम, चामरा, आणि नागकेशर यांचा समावेश होतो.

Bramha kamal Information In Marathi

ब्रह्मकमळची संपूर्ण माहिती Bramha kamal Information In Marathi

मित्रांनो, धार्मिकदृष्ट्या पवित्र असणारे ब्रह्मकमळ सुवास आणि दिसण्याच्या बाबतीत देखील अतिशय तेजस्वी असते. आजच्या भागामध्ये आपण ब्रह्मकमळाविषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत.

नावब्रह्मकमळ
इंग्रजी नावQueen of the night
शास्त्रीय नावSaussurea obvallata
इतर नावेदशावतारा, सर्व फुलांचे फुल
उमलण्याची वेळरात्री
अधिकृत फुल असणारे राज्यउत्तराखंड
हे फुल आवडणारे देवविष्णू
पाकळीतील अणूंची संख्या एक अब्जांहून अधिक

मित्रांनो, एका आख्यायिकेनुसार असे म्हटले जाते की स्वतः ब्रह्मदेव ज्यावेळी स्वतःच्या स्वरूपाचे चिंतन करत होते, त्यावेळी त्यांनी ब्रह्मकमळ या फुलाची निर्मिती केली. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये ब्रह्मकमळाला अतिशय पवित्र फुल मानले जाते, आणि त्याला देवाचा दर्जा दिला जातो. अजून एक म्हणजे असे मानतात की या फुलाच्या एकाच पाकळी मध्ये एका अब्जाहून अधिक अणू असतात, त्यामुळे या फुलांमधून पवित्र आणि चांगले तेजो किरण बाहेर पडतात.

हिंदू धर्मा बरोबरच बौद्ध धर्मामध्ये देखील ब्रह्मकमळाला खूप महत्त्व दिले जाते, बौद्ध धर्मानुसार सर्व फुलांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलाला बौद्ध धर्मीय दशावतारा म्हणून संबोधतात. अशा या सुंदर फुलाला उत्तराखंड सरकारने आपल्या अधिकृत फुलाचा दर्जा सुद्धा दिलेला आहे.

ब्रह्मकमळाचे हिंदू धर्मानुसार अध्यात्मिक महत्व:

मित्रांनो, वर पाहिल्याप्रमाणे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणाऱ्या पाच फुलांपैकी ब्रह्मकमळ एक आहे. ब्रह्म कमळाच्या सौंदर्य आणि परिपूर्णतेचा उल्लेख श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथामध्ये देखील आढळतो. तसेच ध्यान करण्यासाठी या फुलाचा उपयोग केला जातो, कारण हे फुल शांतता व संयम याचे प्रतीक तर आहेच तसेच या फुलामुळे घरामध्ये सुख वैभव आणि धनधान्य यांची कमतरता पडत नाही असे मानले जाते.

धार्मिक वापरा बरोबरच ब्रह्मकमळामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. ब्रह्मकमळ दमा, कुष्ठरोग, क्षयरोग, श्वसन आजार इत्यादी आजारांवर अतिशय गुणकारी आहे.

ब्रह्माकुमारी आणि ब्रह्म कमळाचे अतूट असे नाते आहे. ब्रह्माकुमारीस माता दुर्गेचे रूप समजले जाते, आणि ब्रह्माकुमारीच्या आराधने वेळी ब्रह्मकमळ घातल्यास प्रार्थना फळास येईल असे समजले जाते.

ब्रह्म कमळाचा हार देखील बनवला जातो. ब्रह्मकमळाचा हार परिधान करणाऱ्या कडे आनंद, सुख वैभव याची कधीही कमतरता पडत नाही. तसेच सर्व भौतिक सुखे अशा माणसाकडे आकर्षित होतात असे समजले जाते.

ब्रह्मकामळ आणि औषधी उपयोग:

मित्रांनो, प्रत्येक भारतीय वनस्पतीमध्ये कुठल्या ना कुठल्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद ही आहेच, प्रत्येक वनस्पतीमध्ये काही न काहीतरी औषधीय गुणधर्म हे आहेतच. मग त्यातही इतके दुर्मिळ असणारे ब्रह्मकमळ कसे मागे असेल? मित्रांनो विविध आजारांवर ब्रह्म कमळाचा वापर अनेक पिढ्यांपासून लोक करत आलेले आहेत. या फुलांमध्ये विविध आजार बरे करण्याची क्षमता आहे.

सर्वप्रथम रोग होऊच नये म्हणून काम करणारी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे कार्य हे ब्रह्मकमळ करत असते. याच बरोबर पचन संस्था मजबूत करणे, बद्धकोष्ठता नष्ट करणे, चयापचय क्रिया गतिमान करणे इत्यादी गोष्टींवर ब्रह्मकमळ अतिशय गुणकारी आहे.

शरीरशुद्धीकरणांमध्ये देखील ब्रह्मकमळाचा वापर केला जातो. ब्रह्मकमळाने दूषित रक्त शुद्ध केले जाते, तसेच त्वचेवर काही विकार असतील, डाग किंवा बुरशीचे इन्फेक्शन असेल तर त्यावर देखील ब्रह्मकमळ प्रभावीपणे कार्य करते. ब्रह्मकमळामुळे सर्दी आणि खोकला हे आजार आसपास भटकत देखील नाहीत. तसेच सर्दीमुळे होणारे सायनस देखील या ब्रह्म कमळाच्या वापराने साफ केले जाते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रह्मकमळ स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले आणि स्मृतिभ्रंश झालेले वृद्ध लोक यांच्यासाठी ब्रह्मकमळाचा वापर खूपच फायदेशीर ठरतो. तसेच निद्रानाशाचा समस्येवर ब्रह्मकमळ वापरले जाते.

ब्रह्मकमळ हे फुल अतिशय सुगंधी असते, त्यामुळे त्यातून सुगंधी द्रव्ये काढली जाऊ शकतात, ह्या सुगंधी द्रव्याने ताणतणाव दूर करण्यास मदत करू शकतात.

ब्रह्मकमळाची लागवड कशी करायची?

मित्रांनो, ब्रह्मकमळ हे फुल पर्वतीय विभागांमध्ये वाढत असले, तरी देखील आजकालच्या युगात ते मैदानी प्रदेशातही अगदी घरात देखील वाढवली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्वतीय प्रदेशाप्रमाणे या वनस्पतीवर थेट सूर्यप्रकाश पडू नये ही महत्त्वाची बाब येथे लक्षात घेतली पाहिजे.

ब्रह्मकमळाला वाढीसाठी थोडेसे थंड हवामान म्हणजेच १८ ते २५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. या वनस्पतीला मुळाजवळील माती नेहमी ओलसर ठेवणे गरजेचे असते. या वनस्पतीला अगदी काही महिन्यातून एक वेळेस खते दिली तरी देखील चालू शकेल, मात्र पाण्याची कमतरता पडू देऊ नये.

हे फुल रात्री उमलले जाते त्यामुळे मरून गेलेली खराब फुले काढून टाकणे देखील आवश्यक ठरते. फुले येणे सुरू व्हायच्या आधी दोन महिन्यांपूर्वीच या झाडाची चांगली देखभाल घेणे सुरू करावे लागते.

ब्रह्मकमळाची लागवड ही पाने किंवा कळ्या यांच्याद्वारे केली जाऊ शकते, त्याच प्रकारे कंद आणि फांद्यांच्या तुकड्यांद्वारे देखील ब्रह्मकमळ लावता येते. यासाठी चांगल्या भुसभुशीत केलेल्या मातीमध्ये थोडेसे खत टाकून प्रजननासाठी आवश्यक असलेला कुठलाही भाग त्या मातीमध्ये ठेवावा लागतो, अगदी तुम्ही पान देखील ठेवू शकता. त्यानंतर मातीने व्यवस्थित रित्या झाकून त्यावर पाणी टाकावे, अगदी काहीच आठवड्यानंतर तुम्हाला त्यापासून कोंब बाहेर येताना दिसेल, आणि अगदी झपाट्याने यापासून ब्रह्मकमळाच्या वनस्पतीची वाढ होईल.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाचा कुठल्या ना कुठल्या गोष्टीची संबंध लावून त्याचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. यामुळे प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित होऊन त्याचे फायदे देखील लोकांपर्यंत पोहोचवलले जातात. ब्रह्मकमळ हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असले तरी देखील सौंदर्यिय दृष्ट्या तसेच इतर सर्वच अंगांनी ब्रह्मकमळाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आजच्या भागामध्ये आपण ब्रह्म कमळाविषयी माहिती पाहिलेली आहे.

ब्रह्मकमळ फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Important information about Bramhakamal | Bramhakamal Mahiti

ब्रह्मकमळ ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती हिमालयावर १३,००० ते १७,००० फुटांवर पहावयास मिळते. ब्रह्मकमळाचे शास्त्रीय नाव साॅसूरिया ऑबव्हॅलाटा हे आहे. सूर्यफुलाच्...

FAQ

ब्रम्हकमळ कुठे आढळून येते?

शक्यतो ब्रह्मकमळ हे उंच पर्वतामध्ये आढळून येते. भारतातील काश्मीर, सिक्कीम, हिमकुंड, गडवाल, चमोली, केदारनाथ इत्यादी हिमालय पर्वताच्या उपपर्वतांमध्ये ब्रह्मकमळ आढळून येते. हे ब्रह्मकमळ दख्खन मैदानावर देखील उगवले जाऊ शकते.

ब्रह्मकमळ कोणत्या राज्याचे अधिकृत फुल आहे?

ब्रम्हकमळ उत्तराखंड राज्याचे अधिकृत फुल म्हणून घोषित झालेले आहे.

ब्रह्मकमळाच्या फुलाला इतके महत्त्व का प्राप्त झालेले आहे?

ब्रह्मकमळ हे हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानले जाते. तसेच ब्रह्मकमळाला फुललेले बघणे म्हणजे एक दुर्मिळ योगच असतो, कारण हे फुल फक्त रात्रीच्या वेळेस आणि तेही वर्षातून केवळ एकदाच फुलते. त्यामुळे या फुलाला महत्त्व प्राप्त झालेले आहे.

ब्रह्मकमळ सहसा का दिसत नाही?

एकतर हे फुल वर्षातून एकदाच आणि तेही रात्रीच्या वेळी उमलते, तसेच हे फुल केवळ हिमालय पर्वतातच येते. त्यामुळे मैदानी प्रदेशातील लोकांसाठी हे फुल बघणे अतिशय दुर्मिळ होऊन जाते.

ब्रह्मकमळ कोणत्या देवाचे आवडते फूल आहे?

ब्रह्मकमळ हे विष्णू या देवाचे आवडते फूल आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ब्रह्मकमळ या विष्णूच्या आवडत्या फुलाबद्दल माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबाबतीत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये जरूर लिहून कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असतील तरी देखील कळवा.

 धन्यवाद…

Kasturi Khule

कस्तुरी खुळे (Kasturi Khule) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा २ वर्षांचा अनुभव आहे. हि बी.सी.एस.(Bachelor Of Computer Science) च्या तिसऱ्या वर्षाला असून ती content writer चे काम उत्तम प्रकारे करीत असतात.

Leave a Comment