भगतसिंग यांची संपूर्ण माहिती Bhagat Singh Information In Marathi

Bhagat Singh Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी चळवळीचे आद्य सैनिक किंवा क्रांतिवीर म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे भगतसिंग होय. त्यांनी अनेक क्रांतिकारी संघटनांमध्ये सामील होऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले होते. त्यांचे वय हे अगदी कमी होते, मात्र देशासाठी काही करून जाण्याची त्यांची वृत्ती अगदी वाखाणण्याजोगी होती. त्यांनी केलेल्या ब्रिटिश विरोधी कारवायांमुळे त्यांना २३ मार्च १९३१ या दिवशी फाशी देण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे २३ वर्षे इतकेच होते. यावरून तुम्ही त्यांच्या देशभक्ती चा अंदाज लावू शकता.

Bhagat Singh Information In Marathi

भगतसिंग यांची संपूर्ण माहिती Bhagat Singh Information In Marathi

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण या ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिवीराबद्दल अर्थात भगतसिंग यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत. आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही पैलू जाणून घेणार आहोत…

नावभगतसिंग
जन्म दिनांक२८ सप्टेंबर १९०७
जन्म स्थळपंजाबच्या लायलपूर जिल्ह्यातील बंगा या जरनवाला तालुक्यातील गावामध्ये
आईविद्यावती कौर
वडीलकिशन सिंग
विद्यालयलाहोर मधील डी ए व्ही हायस्कुल व नॅशनल कॉलेज
सदस्य असणाऱ्या संघटनाहिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन, नौजवान भारत सभा, क्रांती दल, आणि कीर्ती किसान पार्टी.
विचारधाराराष्ट्रवादी व समाजवादी
निधन /शाहिद दिन २३ मार्च १९३१

पंजाब येथील एका शीख कुटुंबात जन्म झालेले भगतसिंग जन्मापासूनच वडिलांच्या प्रेमाला मुकले होते, कारण त्यांच्या जन्मावेळी त्यांचे वडील किशन सिंग यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. लहानपणापासूनच भगतसिंगांना आपल्या कुटुंबाकडून देशभक्तीचा वारसा मिळाला होता, त्यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वच व्यक्ती या स्वातंत्रकार्यामध्ये सामावलेल्या होत्या. त्यामध्ये त्यांचे काका अजित सिंग यांचा देखील समावेश होता.

भगतसिंग यांचे काका अजित सिंग यांनी भारतीय देशभक्त नावाची संघटना स्थापन केली होती, ज्यामध्ये सय्यद हैदर रजा यांसारख्या व्यक्तींचा देखील समावेश होता.

एक क्रांतिकारक म्हणून भगतसिंग:

मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दोन वेगवेगळे गट प्रयत्न करत होते. ज्यामध्ये जहाल व मवाळ अशा दोन गटांचा समावेश होता. मवाळ गट शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यावर भर देई, तर जहाल गट क्रांतिकारी कारवाया करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडत असत. भगतसिंग हे जहाल मतवादी असल्याने त्यांनी क्रांतिकार्याचा मार्ग अवलंबला होता.

भगतसिंग यांना कुठल्याही प्रकारे केवळ देशाला स्वातंत्र्य मिळावे ही अपेक्षा होती, त्यामुळे त्यांनी १९१९ यावर्षी झालेला जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ गांधीजी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला होता.

तसेच गांधीजींनी सांगितलेला मार्ग देखील अनुसरला होता, मात्र पुढे जाऊन ज्यावेळी चोरीचौरा येथील हिंसक घटना घडली, त्यावेळी मात्र गांधीजींनी आपले सहकार आंदोलन मागे घेतले. मात्र या निर्णयामुळे भगतसिंग असमाधानी झाले आणि त्यांनी गांधीजींचा अहिंसेचा मार्ग सोडून जहाल मतवादी मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ठरवले.

नॅशनल कॉलेज लाहोर येथे त्यांना सुखदेव, भगवती चरण यांसारखे सहकारी भेटले. ज्यांच्या मदतीने त्यांनी कॉलेजमध्ये असल्यापासूनच मुक्तिसंग्राम सुरू केला होता. मात्र भगतसिंगांसाठी स्वातंत्र्य कार्य महत्त्वाचे असल्यामुळे त्यांनी कॉलेजच्या शिक्षणाला रामराम ठोकला.

त्यांच्या आई-वडील व त्यांच्या मते लग्नाच्या विषयावरून नेहमीच खटके उडत असत. भगतसिंग यांना वाटे, मी जर लग्न केले आणि उद्या स्वातंत्र्य कार्यामुळे माझे काही बरे वाईट झाले तर पत्नीला नाहक मनस्ताप सहन करावा लागेल. आणि त्यांना हे नको होते.

त्यांना पूर्णवेळ मातृभूमीची सेवा करायची होती, त्यामुळे त्यांनी घरच्यांना ठसकावून सांगितले की जर स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच मी लग्न करेल तर माझी पत्नी मरण पावेल, तरीही घरच्यांनी बऱ्याच काळासाठी त्यांचा लग्नासाठी इच्छा पुरविला. मात्र आपल्या विचारांवर ठाम असणारे भगतसिंग यांनी शेवटपर्यंत लग्न केलेच नाही.

भगतसिंग यांना फाशी:

मित्रांनो, शहीद भगतसिंगांमुळे इंग्रज अधिकारी खूपच त्रस्तावले होते. त्यामुळे त्यांनी थेट फाशीची शिक्षा भगतसिंगांना सुनावली. त्यांच्यासोबत सुखदेव व राजगुरू या त्यांच्या दोन सहकार्याना देखील फाशी झाली. ते तिघे देखील अगदी फाशी देईपर्यंत इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा देत होते.

तुरुंगात सुद्धा भगतसिंग यांच्यावर खूप अत्याचार करण्यात आले, मात्र तरीसुद्धा त्यांनी मातृभूमीच्या सेवेचा ध्यास सोडला नाही, आणि नेहमी मातृभूमीच्या घोषणा देत राहिले. भगतसिंग हे पूर्वीपासूनच स्वतःला शहीद म्हणून घेत असत, कारण मी एक भगतसिंग म्हणून केव्हाच मृत्यू पावलो आहे, आता माझ्यामध्ये केवळ एक देशभक्त उरलेला आहे असे त्यांचे म्हणणे होते. आणि त्यांच्या फाशीनंतर संपूर्ण भारताने त्यांना शहीद म्हणूनच ओळखण्यास सुरुवात केली.

तुरुंगात त्याकाळी भगतसिंग आणि इतरही कैद्यांना बराच वेळ अन्न आणि पाणी देत नसत, शिवाय मारहाण करत ते वेगळेच. मात्र अशात देखील भगतसिंग यांनी आपला स्वाभिमान सोडला नाही, आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी हे सगळे अत्याचार सहन करत हसत हसत स्वतःला फासावर चढविले, यापेक्षा एक परिपक्व क्रांतिकारक काय असू शकतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, स्वातंत्र्य हा असा एक शब्द आहे, जो पारतंत्र्यात असल्यावरच त्याचे महत्त्व कळते. आज संपूर्ण भारत स्वतंत्र आहे त्यामुळे काही कायदेशीर अपवाद वगळता कोणीही कुठेही काहीही करू शकतो. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुठलीही गोष्ट करण्यासाठी इंग्रज अधिकारी आडवे येत असत, एवढेच काय तर वंशपरंपरेने चालत आलेली संस्थांने केवळ दत्तक पुत्र आहे, या छोट्याशा कारणावरून सुद्धा खालसा करत असत.

त्यामुळे पारतंत्र्य असताना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याकाळी आपण स्वातंत्र्य होऊ ही आशा प्रत्येक भारतीयाला होती, आणि या आशेमुळेच प्रत्येक जण स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेत असे, यामध्ये मुले देखील मागे नव्हती. असाच एक मुलगा म्हणजे भगतसिंग यांनी आपल्या अतिशय कमी वयामध्ये खूप सार्‍या इंग्रज विरोधी चळवळी आणि कारवाया केल्या.

मात्र शेवटी ते इंग्रजांच्या हाती लागले, त्यांचे इतके उग्र स्वरूप आणि कारवायामुळे इंग्रज हवालदिल झालेले होते, त्यामुळे त्यांनी भगतसिंग व त्यांच्या सुखदेव व राजगुरू या दोन साथीदारांना फाशी देण्याचे ठरविले. फाशीच्या वेळी सुद्धा भगतसिंग अगदी हसत हसत भारत मातेच्या नावाच्या घोषणा देत होते, यावरून त्यांची भारतमातेविषयी असलेले प्रेम दिसून येते.

FAQ

भगतसिंग यांचा जन्म केव्हा व कोठे झाला होता?

भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ या दिवशी पंजाबच्या बंगा या गावांमध्ये झाला होता. जे जरणवाला तालुक्यात आणि लायलपूर जिल्ह्यामध्ये येत होते.

भगतसिंग यांच्या आई वडिलांचे नाव काय होते?

भगतसिंग यांच्या आईचे नाव विद्यावती कौर, तर वडिलांचे नाव किशनसिंग असे होते.

भगतसिंगांमुळे क्रांतिकारी चळवळीला कशाप्रकारे प्रेरणा मिळाली?

भारतीय स्वतंत्र लढ्यात भगतसिंग यांनी क्रांतिकारी चळवळी करून मोठे योगदान दिले होते, ते भारत मातेसाठी अगदी कमी वयामध्ये फाशीवर चढले त्यामुळे सर्व भारतीयांमध्ये त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा निर्माण झाली.

भगतसिंग कोणाला आपले प्रेरणास्थान मानत असत?

भगतसिंग हे गदर पक्षाचे एक युवा नेते असणारे शहीद करतार सिंग ज्यांचे वय केवळ १९ वर्षे होते यांना आपले प्रेरणास्थान मानत असत.

भगतसिंग यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणता मार्ग अवलंबला?

भगतसिंग यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सशस्त्र उठाव आणि क्रांतिकार्य हा मार्ग अवलंबला, जो जहाल विचार वादी होता.

मित्रानो, आजच्या भागामध्ये आपण भारतीय क्रांतिकारक भगतसिंग यांच्याविषयी माहिती पाहिली, या महितीविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि काही सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. ज्यामार्फत आम्ही तुम्हाला अधिक उत्तम माहिती पोहोचवू शकू, आणि या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही देखील मदत करा.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment