बॅडमिंटन खेळाची संपूर्ण माहिती Badminton Game Information In Marathi

Badminton Game Information In Marathi बॅडमिंटन हा खेळ आज जगातील बहुतांश लोकांचा लोकप्रिय असा खेळ आहे. साधारणता ग्रामीण भागापासून ते शहरी भागांपर्यंत हा खेळ खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक याशिवाय हा गेम खेळता येत नाही. या खेळामध्ये एकाग्रता ठेवावी लागते तसेच हा खेळ ज्या मैदानामध्ये खेळला जातो, ते मैदान बंदिस्त स्वरूपाचे असते आणि या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. बॅडमिंटन हा खेळ महिला व पुरुष यांच्या दोन्ही गटांमध्ये खेळला जातो.

Badminton Game Information In Marathi

बॅडमिंटन खेळाची संपूर्ण माहिती Badminton Game Information In Marathi

हा खेळ ऑलिंपिकमध्ये सुद्धा समाविष्ट आहे. हा खेळ एकेरी खेळ असतो, तेव्हा या खेळामध्ये केवळ दोन खेळाडूंचा समावेश असतो आणि दुहेरी खेळ असतो तेव्हा या खेळामध्ये चार खेळांडूचा समावेश असतो. हा खेळ तीन भागांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये प्रत्येक 21अंक असतात. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय असा खेळ आहे तसेच हा खेळ टेनिस या खेळापेक्षा तीव्र गतीने खेळावा लागतो. या खेळाला 1992 मध्ये ऑलम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळाली.

बॅडमिंटन या खेळाचा इतिहास :

बॅडमिंटन हा खेळ कधीपासून खेळला जातो, हे नक्की आपल्याला सांगता येणार नाही परंतु हा खेळ अठराव्या शतकापासून खेळला जातो असे म्हटले जाते. बॅडमिंटन हा खेळ पूर्वीच्या काळी पुना या नावाने ओळखला जात होता. या खेळाचा उगम हा पुणे शहरामध्ये झाला व त्यानंतर हा खेळ भारतातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताबाहेर नेला. आता हा खेळ जागतिक स्तरावर सुद्धा केला जातो व भारतातील खेड्यांमध्ये सुद्धा हा खेळ सर्वप्रथम ड्यूक ऑफ ब्युफर्डला या खेळाडूने पहिल्यांदा आपल्या मित्रासोबत खेळला होता. म्हणून ड्यूक ऑफ ब्युफर्डला बॅडमिंटन या खेळाचा जनक मानले जाते.

बॅडमिंटन या खेळाचे मैदान :

बॅडमिंटन या खेळाचे मैदान 13.4 मीटर बाय 5.18 मीटर असते तसेच हा खेळ एका बंदिस्त जागेमध्ये खेळला जातो. हा खेळ एका आयकता कृती कोर्ट मध्ये खेळला जातो. या खेळामध्ये प्रत्येक बाजूला जर दोन खेळाडू असतील तर कोडचा आकार 13.4 मीटर ते सहा पॉईंट एक मीटर असतो आणि कोर्टच्या मध्यभागी एक पॉईंट पाच मीटरचे जाळे असते. त्याचबरोबर झाडापासून सहा फूट अंतरावर दोन फूट सहा इंच लांबीची सर्विस रेषा आखलेली असते.

badminton information in marathi

बॅडमिंटन या खेळासाठी लागणारी साधने :

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॅकेट आणि शटल कॉक हे आहे. हा खेळ खेळताना दोन रॅकेटची गरज असते. रॅकेट हे अंडाकृती असते आणि ते धातूंपासून बनवले असते तसेच त्याला खाली धरण्यासाठी एक मूठ दिलेली आहे. रॅकेटमध्ये जे छोटे छोटे चौकोन असतात ते फायबरचे असतात. रॅकेटची लांबी ही 650 ते 700 मिलिमीटर आणि रुंदी 200 ते 230 मिलिमीटर एवढे असते. रॅकेटचा वापर हा शटलकॉकला मारण्यासाठी केला जातो. शटल कॉक बॅडमिंटनचे फुल किंवा बर्डी या नावाने सुद्धा ओळखले जाते. शटलकॉक दिसायला खूप लहान आणि हलके असते, तसेच त्याचे वजन चार ते पाच ग्रॅम असून त्याला 16 पंख लावलेले असतात.

बॅडमिंटन या खेळाचे नियम :

  • बॅडमिंटन या खेळाची सुद्धा काही नियम तयार करण्यात आलेले आहेत, जे या खेळाचा शिस्तपणा आपल्याला दाखवतो.
  • हा खेळ खेळण्यासाठी दोन खेळाडू असतात आणि हा खेळ तीन भागांमध्ये खेळला जातो.
  • हा खेळ खेळण्यासाठी एक खेळाडू तयार होईपर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागते.
  • एका सामन्यात 21 गुणांच्या तीन सर्वोत्तम खेळाचा समावेश असतो.
  • या खेळामध्ये शटलकॉक हे कोर्टच्या हद्दीच्या बाहेर जायला नको.
  • खेळाडूला नेट स्पर्श करण्याची परवानगी नसते.
  • रॅली जिंकणारा गट त्याच्या गुणांमध्ये एक गुण जोडते.
  • दोन्ही गटांपैकी 20 गुण मिळाल्यानंतर सर्वप्रथम दोन गुण मिळवतो तोच हा खेळ जिंकतो.
  • प्रतिस्पर्ध्याच्या खाली येणाऱ्या स्ट्रोकना रोखण्यासाठी एखादा खेळाडू जाण्याजवळ त्याचे रॅकेट धरू शकत नाही.
  • सर्वरचे पाय सर्विस कोर्टात नसतात किंवा रिसिव्हरचे पाय सर्विसच्या विरुद्ध तिरपे असतात तेव्हा खेळाडूची चूक मानली जाते.
  • खेळाडू किंवा विरुद्ध खेळाडू शटल दोन वेळा मारू शकत नाही. असे केल्यास ते चूक असते.

बॅडमिंटन सामना अधिकारी विषयी माहिती :

या खेळामध्ये सरपंच, एक पंच आणि दोन सर्विस पंच तसेच तीन रेषा पंच असतात.

बॅडमिंटन पंच :

या पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातो. नियम भंग केला तसेच गुण सांगणे यांचा व सामन्याचा निकाल जाहीर करणे ही कामे बॅडमिंटन पंच करत असतो तसेच खेळाडूंना इतर सूचना देऊन गैरवर्तन झाल्याबाबत सुद्धा खेळाडूला सांगतो व खेळाडूला बाद करायचे असेल याचा निर्णय सरपंच घेतात.

बॅडमिंटन सर्विस पंच :

जर बॅडमिंटन सर्विस पंच एकच असेल तर तो पंचाच्या विरुद्ध बाजूला बसतो. आवश्यकता असेल तेव्हा तो पंचाच्या बाजू नाही बसू शकतो. दोन्ही सर्विस पंच असतील तर दोन्ही बाजूंना मागील अंतिम रेषेच्या बाहेर किंवा पंच सांगतील तिथे बसतात. सर्विस करणाऱ्या खेळाडूची कृती सर्विस पंच पाहतात, खेळाडू सर्विस करताना रॅकेटने शटल मारतो, त्यावेळी त्याच्या पायाचा जमिनीशी असणारा संपर्क रॅकेटचा शटलना स्पर्श होतांना शटलची व रॅकेटची स्थिती सर्विस करताना केलेले फसवे यासंबंधीच्या सर्वच घटना तसेच नियम भंग झाल्याबाबतचा निर्णय सुद्धा तात्काळ पंचाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात द्यावा लागतो.

badminton shuttle and racket

बॅडमिंटन रेषा पंच :

रेषापंचाचे काम हे रेषासंबंधित असते, त्यामुळे याचाच अंतिम निर्णय मानला जातो. एखादी कृती रेषा पंचाच्या नजरेस आली नाही तर पंच निर्णय देईल किंवा तो गुण पुन्हा खेळला जाईल परंतु शटल अंतिम रेषेच्या बाहेर पडले तर रेषा पंच दोन्ही हात बाजूला करून इशारा करतील व आऊट असे म्हणतील.

बॅडमिंटन खेळ खेळल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतात :

बॅडमिंटन हा खेळ खेळल्यामुळे तुम्हाला शारीरिक व मानसिक फायदे सुद्धा होतात ते पुढील प्रमाणे जाणून घ्या.

बॅडमिंटन या खेळाचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे की, खेळ खेळाडूची शारीरिक क्षमता वाढवतो व त्यांच्या स्नायू सुद्धा बळकट करतो. बॅडमिंटन खेळामध्ये इकडून तिकडे पळत राहावे लागते व त्यामुळे शरीराचा व्यायाम होतो.

बॅडमिंटन या खेळामध्ये नियमित हालचाल करावी लागते, त्यामुळे हृदय मजबूत होते. हृदयाला चांगल्या प्रमाणात रक्तपुरवठा होतो व यामुळे व्यक्ती आपले शरीर निरोगी ठेवू शकतो व त्यांना हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो.

बॅडमिन हे खेळ खेळल्यामुळे आपल्याला शारीरिक फायदे तर मिळतात तसेच या खेळापासून आपल्याला मानसिक तणाव सुद्धा दूर झाल्याचे समजते. कारण हा खेळ खेळल्यामुळे शरीरातील ताण निर्माण करणारे हार्मोन्स खूप वेगाने कमी होतात.

बॅडमिंटन खेळामध्ये आपल्याला उड्या मारून शटल दुसरीकडे मरावे लागते, त्यामुळे आपल्या पाठीचा कणा सुद्धा लवचिक होतो. यामुळे आपल्या शरीराची लवचिकता सुद्धा वाढते तसेच या व्यतिरिक्त डायबिटीस धोका सुद्धा कमी होतो. हात पायांची हाडे मजबूत बळकट होतात. विचार करण्याची क्षमता वाढते. वजन सुद्धा कमी होतं व आपली सामाजिक अस्तित्व निर्माण होते.

बॅडमिंटन या खेळाविषयी संपूर्ण माहिती l Complete Information About Badminton l SIP l

Thanks for watching 😇 plz subscribe to our channel for more 😇#Badminton #Information_About_Badminton#बॅडमिंटन

FAQ

बॅडमिंटनच्या मैदानाला काय म्हणतात?

कोर्ट.

बॅडमिंटन या खेळासाठी कोणते साहित्य लागते?

रॅकेट आणि शटलकॉक .

बॅडमिंटन खेळाचा जनक कोण आहे?

ड्यूक ऑफ ब्युफर्डला.

बॅडमिंटन खेळल्यामुळे मानसिक त्रास कमी होतो का?

होय.

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment