APJ Abdul Kalam Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारताचे मिसाईल म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे सर्वांच्या परिचयाचे आहेत. ते एक बहुअंगी व्यक्तिमत्व होते, त्यांनी आपल्या आयुष्यात वेगवेगळे काम करून भारतासाठी खूप मोठे सहकार्य तर केलेलेच आहे, शिवाय व्यक्ती म्हणून वैयक्तिक पातळीवर सुद्धा त्यांनी अनेक कामे केली आहेत. त्यांना इसवी सन २००२ मध्ये भारताचे ११ वे राष्ट्रपती बनण्याचा बहुमान मिळाला.
ए पी जे अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती APJ Abdul Kalam Information In Marathi
तसेच त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओ इत्यादी संस्थांसाठी सुद्धा कार्य केलेले आहे. तसेच ते वैज्ञानिक अभियंता देखील होते. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आणि अंतराळ मोहिमांमध्ये भरीव योगदान दिल्यामुळे त्यांना भारताचे मिसाईल मॅन असे नाव देण्यात आले. तसेच भारताची बहुचर्चित पोखरण अणुचाचणी-२ जी १९९८ यावर्षी पार पडली, त्यामध्ये फार मोठे योगदान दिलेले आहे.
राष्ट्रपतीपदी विराजमान होण्यापूर्वी ते ९० च्या दशकामध्ये पंतप्रधान यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांचे कार्य फार मोठे आहे. थोडक्यामध्ये त्यांचे कार्य समजणे अतिशय अवघड आहे, मात्र आज आपण त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राला सुरुवात करूया…
नाव | ए पी जे अब्दुल कलाम |
संपूर्ण नाव | अबुल पाकिर जैनूलब्दीन अब्दुल कलाम |
उपाधी | पीपल्स प्रेसिडन्ट, मिसाईल मॅन |
जन्म दिनांक | १५ ऑक्टोबर १९३१ |
जन्म ठिकाण | रामेश्वरम, जिल्हा रामानंद, तत्कालीन ब्रिटीश भारतातील मद्रास प्रेसिडेन्सी प्रांत, (सध्याचे तामिळनाडू) |
भावंड | ३ भाऊ व १ बहीण |
आयुष्य | मृत्यूसमयी ८८ वर्षे |
मृत्यू दिनांक | २७ जुलै २०१५१ |
स्मारक | पेई करंबू, रामेश्वरम्, तामिळनाडू राज्य. |
मित्रांनो, जन्माने तमिळ मुस्लिम असणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ या दिवशी रामेश्वरम या धनूषकोडी जवळील गावात झाला. त्यांचे वडील हे मासेमारी करणाऱ्या बोटी घेऊन समुद्रात जात असत. त्यांचे नाव जैनुलाबदिन असे होते. अब्दुल कलाम यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, तसेच त्यांचे वडील मासेमारी करतानाच त्यांची बोट मच्छीमारांना देखील भाड्याने देत असत. त्यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले.
लहान असताना अब्दुल कलाम यांना शिक्षण घेण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला, मात्र शिक्षणाची आवड आणि विज्ञानाप्रती प्रेम त्यांना स्वस्त बसू देत नव्हते. त्यांनी लहान वयातच पेपर टाकून आपल्या शिक्षणाचा खर्च भागविला. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे वडील अतिशय सुव्यवस्थित, प्रामाणिक, आणि उदार व्यक्तिमत्व होते. तोच वारसा वडिलांकडून घेऊन अब्दुल कलाम यांनी आपल्या उभ्या आयुष्यात त्याच तत्त्वांचे पालन केले.
डॉक्टर अब्दुल कलाम हे वडिलांकडून मुस्लिम असले तरी देखील त्यांची आई मात्र एक ख्रिश्चन होती. भावंडांबद्दल बोलायचे झाल्यास अब्दुल कलाम यांना त्यांच्यापासून मोठे असे चार भावंड होते, ज्यामध्ये तीन भाऊ आणि एक बहीण होती. त्यांचे कुटुंब त्यांच्यासाठी सर्वस्व होते.
अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मुळ गावीच झाले. त्यानंतर त्यांनी जोसेफ विद्यापीठातून बीएससी चे शिक्षण १९५० मध्ये पूर्ण केले. तसेच येथेच त्यांनी १९५४ ते १९५७ या दरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला. अब्दुल कलाम यांना लहानपणापासून फायटर प्लेन चे पायलट बनावे अशी इच्छा होती.
राष्ट्रपती म्हणून डॉ. ए पी जे अब्दुल कलाम:
मित्रांनो, भारतरत्न प्राप्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी १९९२ ते १९९९ पर्यंत डीआरडीओ येथे आर अँड डी विभागाचे सचिव, तसेच संरक्षण मंत्री यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केल्यानंतर इसवी सन २००२ मध्ये भाजपा या पक्षाद्वारे प्रायोजित केलेल्या एन डी ए पक्षमार्फत कलामांनी भारताचे प्रमुख अर्थात राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला.
राष्ट्रपती पदाची शपथ त्यांनी १८ जुलै २००२ या दिवशी घेतली. कलाम यांचा राजकारणाशी दूरपर्यंत ही संबंध नव्हता, मात्र त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारताच्या सर्वोच्च पदावर अर्थात राष्ट्रपती पदावर बसविण्यात आले. कुठलेही राजकीय वलय नसताना या पदापर्यंत पोहोचणे म्हणजे एक दिवास्वप्न होते, मात्र माणसाचे कार्य हीच त्याची ओळख असते, यानुसार डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांसाठी ही गोष्ट सहज साध्य झाली.
निष्कर्ष:
मित्रांनो, भारताचे मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम २०१५ मध्ये आपल्या मधून गेले. आयुष्यभर या माणसाने देशाची सेवा हेच आपले अंतिम ध्येय ठेवले. संपूर्ण हयात भर देशासाठीच कार्य करणाऱ्या या अवलिया माणसाने आपल्या ज्ञानाचा वापर करून भारत देशाला क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी आणि भारताची शक्ती वाढवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
भारताची सुरक्षितता हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पृथ्वी आणि अग्नी यांसारखी क्षेपणास्त्रे देशाला समर्पित केली.२०२० पर्यंत भारत हा महासत्ता व्हावा हे त्यांचे स्वप्न होते, आणि केवळ त्यांनी हे स्वप्न पाहिलेच नाही तर ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत देखील घेतली.
विज्ञान या क्षेत्रामध्ये त्यांना फार रुची असल्यामुळे त्यांनी विज्ञानाचा आधार घेत भारत देशाला वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण केले. त्यांचे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे संबंध फार चांगले होते. या दोन्ही जोडगोळीने मिळून देशासाठी फार मोठे कार्य केलेले आहे.
एपीजे अब्दुल कलाम हे धर्माने मुस्लिम असल्यामुळे इतर मुस्लिम राष्ट्र त्यांना नेहमी साद घालत असत, मात्र मातृभूमीशी असणाऱ्या अतूट नात्यामुळे त्यांनी भारत देश कधीच सोडला नाही. ते एक उत्तम नेतृत्व गुण असणारे नेते म्हणून देखील ओळखले जात. त्यांच्या मते तरुण हा देशाचा कणा आणि भविष्य असते, त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणातून आणि लिखाणातून तरुणांना फार महत्त्वाचे धडे दिलेले आहेत.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी | डॉ ए पी जे कलाम जीवन परिचय
डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी | डॉ ए पी जे कलाम जीवन परिचयआपण काय शिकलो ?डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती डॉ ए पी जे कलाम जीवन परिचय #डॉएपीजेअब्दुलकलाममाह...
FAQ
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लावलेला सर्वात पहिला शोध कोणता?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी होवर क्राफ्ट हा सर्वात प्रथम लावलेला शोध असून, त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन प्रकल्पाकरिता या होवर क्राफ्ट ची निर्मिती केली होती. त्यांनी या ओव्हरक्राफ्टला नंदी असे नाव दिले होते.
अब्दुल कलाम यांच्यातील वेगळे गुण काय होते?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नेहमी वेगळा विचार करत असत. त्यांना वेगवेगळे शोध लावण्याची, अंधश्रद्धेबाबत संशोधन करण्याची, शक्य नसलेल्या गोष्टी शक्य करण्यासाठी आणि विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट कोणता आहे?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरील चित्रपटाचे नाव आय ॲम कलाम असे असून या चित्रपटात हर्ष या अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारलेली आहे.
एपीजे अब्दुल कलाम यांना कोणत्या उपाध्या देण्यात आल्या होत्या?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन व पीपल्स प्रेसिडेंट या उपाध्या देण्यात आल्या होत्या.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी बनवलेल्या क्षेपणास्त्रांची नावे काय होती?
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी बनवलेल्या क्षेपणास्त्रांची नावे अग्नी आणि पृथ्वी असे होते.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्या विषयी शक्य होईल तेवढी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तसेच एक तरुण म्हणून देखील तुम्ही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे फार मोठे चाहते देखील असाल, त्यामुळे इतरही आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती वाचता यावी यासाठी या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा.
धन्यवाद.