अकबर बिरबलची संपूर्ण माहिती Akbar Birbal Information In Marathi

Akbar Birbal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अनेक चित्रपट किंवा प्रेरणादायी कोट्स असलेल्या फोटोंमध्ये तुम्ही एक वाक्य नेहमी ऐकत/ वाचत आलेला असाल, आणि ते म्हणजे “आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र होय”.

अकबर बिरबलची संपूर्ण माहिती Akbar Birbal Information In Marathi

इथे आजोबा आणि नातवाच्या नात्याला मित्रत्वाचे नाते का म्हटले असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? तर मित्रांनो अगदी लहानपणापासून आजी आजोबा आपल्याला प्रिय वाटण्याचे कारण म्हणजे ते नेहमीच आपल्याला छान छान अशा बोधपर गोष्टी सांगत असत, आणि लहानपणी अशा गोष्टी ऐकायला आपल्याला फार मजा वाटे. यामध्ये अकबर आणि बिरबल यांच्या बुद्धी चातुर्याच्या गोष्टी देखील असत. मित्रांनो या गोष्टींमधून आपले मनोरंजन होत असले तरीदेखील आपल्याला यामधून अनेक बोध देखील मिळत असत.

अकबर बिरबल च्या गोष्टी ऐकत मोठा झाला नाही असा कोणीही तुम्हाला बघायला मिळणार नाही. यामध्ये प्रामुख्याने अकबर बादशहाद्वारे बिरबलाची परीक्षा घेण्यासाठी त्यास काहीतरी काम सांगितले जाई किंवा काही प्रश्न विचारले जात, आणि बिरबल आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर त्या प्रश्नांची उत्तर देत, आणि दरवेळी अकबर बादशहा त्यास काहीतरी बक्षीस देई.

आजच्या आपल्या या लेखांमध्ये आपण याच गोष्टीतील अकबर आणि बिरबल यांच्या विषयी माहिती बघणार आहोत…

पात्र: अकबर (अकबर बादशहा/राजा)
बिरबल (अकबर बादशहाच्या दरबारातील पंडित)
प्रकार: गोष्टी
गोष्टीचा प्रकार: बुद्धीचातुर्यावरील बोधपर गोष्टी
गोष्ट सांगण्यास/वाचण्यास लागणारा साधारण वेळ:  तीन ते सात मिनिटे

मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण अकबर आणि बिरबल च्या गोष्टीशी ओळखीचा आहे. लहानपणी आजी-आजोबांकडून आपल्याला अकबर बिरबल गोष्टींची ओळख झाली, त्यानंतर या गोष्टी आपल्याला इतक्या आवडायला लागल्या की आपण थोडेसे मोठे झाल्यानंतर अकबर बिरबल च्या गोष्टींची पुस्तके घेऊन वाचायला लागलो. आणि या दोघांची छबी आपल्या मनावर कायमची कोरली गेली.

अकबर बिरबल गोष्टींचा गाभा:

मित्रांनो, अकबर बादशहा नेहमीच काहीतरी अतार्किक योजना आखे, किंवा काहीतरी वेगळाच निर्णय घेई तर काही वेळेला बिरबलाच्या बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी तो बिरबलास निरनिराळे प्रश्न विचारी. शेवटी अकबर हा बिरबलाचा स्वामी असल्यामुळे बिरबलाला बादशहाला जास्त काही बोलता येत नसे, म्हणून मग तो अशी काही युक्ती लढवे की बादशहाला आपली चूक लक्षात यायची आणि तो सदर योजना किंवा निर्णय मागे घ्यायचा आणि वरून बिरबलाला काही बक्षीस सुद्धा द्यायचा. अशा रीतीने या गोष्टीचा शेवट होई आणि शेवटी या गोष्टीचा सार देण्यात येई.

अकबर बिरबलाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी:

मित्रांनो अकबर आणि बिरबलाच्या अनेक विविध गोष्टी आहेत, मात्र त्यातील काही गोष्टी अशा आहेत की ज्या कुठल्याही पुस्तकात हमखास आढळून येतात. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिरबलाद्वारे खूप उंचावर शिजवली गेलेली खिचडी होय. संक्षिप्तपणे ही गोष्ट सांगायची झाल्यास यामध्ये एकदा अकबर आपल्या राज्यात दवंडी पिटवतो की थंडीच्या दिवसात जो कोणी युवक रात्रभर थंड पाण्याच्या टाकीमध्ये उभा राहील त्यास इनाम देण्यात येईल.

या दवंडीनुसार एक युवक थंड पाण्याच्या टाकीमध्ये पूर्ण रात्रभर उभा राहतो, मात्र अकबर बादशहा त्या युवकांनी दिव्याकडे बघत त्यातून ऊर्जा घेतली असल्याचे सांगत त्याला इनामाची रक्कम देण्यास नकार देतो. तो युवक बिरबलाकडे धाव घेतो आणि बिरबल देखील एक युक्ती लढवतो. बिरबल तीन उंच काठ्या घेऊन त्याच्याखाली जाळ लावतो, आणि त्याच्या सर्वात वरच्या टोकाला एका मडक्यामध्ये खिचडी शिजायला ठेवतो.

अकबर बादशहाने हे बघितल्यानंतर तो मोठ मोठ्याने हसतो आणि म्हणतो, “अरे इतक्या उंचावरील ही खिचडी आणि खाली लावलेला जाळ  कशी शिजेल रे तुझी ही खिचडी?”  तेव्हा मात्र बिरबल उत्तरतो की,  ज्याप्रमाणे पाण्यात उभा राहणाऱ्या माणसाला अतिशय दूर असणाऱ्या दिव्यापासूनही ऊर्जा मिळणे शक्य होते, तसेच माझ्या खिचडीलाही शिजण्यासाठी काहीही हरकत नसावी. अकबर बादशहाला आपली चूक उमजते, आणि तो त्या व्यक्तीच्या इनामाची रक्कम त्याला देऊ करतो.

त्याचप्रमाणे ‘तुझी रेघ छोटी की माझी रेघ छोटी’,  ‘राजकन्येचा विवाह’,  जंगलात गेलेले असताना बादशहाचे बोट तलवारीने कापते, आणि बिरबल त्यावर म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठीच, ‘तलावातील मासे’, ‘मटक्यातील भोपळे आणि बुद्धी’, ‘सर्वात उत्तम घोडा कोणता’, ‘बायकोला न घाबरणारा सरदार’ इत्यादी गोष्टी खास आहेत.

अकबर बिरबल गोष्टींचे फायदे:

मित्रांनो, लहान मुलांना सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांना मनोरंजन करण्यासाठी किंवा नादी लावण्यासाठी जरी सांगितल्या जात असल्या, तरी देखील त्यामधून त्यांच्या भविष्याची जडणघडण होत असते. गोष्टीतील विविध पात्रे त्यांच्या मनावर छाप सोडत असतात. आणि म्हणूनच अकबर बिरबलाच्या गोष्टी लहान मुलांना सांगणे अतिशय फायद्याचे ठरते.

या गोष्टींमुळे मुली चाकोरी बाहेरील विचार करण्यास शिकतात, त्याचप्रमाणे कितीही कठीण प्रसंगी धैर्याने कसे तोंड द्यायचे, कुठल्याही संकटांमध्ये खंबीर उभा राहून त्या संकटाला कसे तोंड द्यायचे, समोरच्याला हजर जबाबी पणे कशी उत्तर द्यायची, तसेच आपल्या बुद्धीचा योग्य वापर कसा करायचा, इत्यादी गुणांचे जणू बाळकडूच या अकबर बिरबल गोष्टींद्वारे लहान मुलांना दिले जाते. म्हणूनच की काय या गोष्टी लहान मुलांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत.

लहान मुले या गोष्टी अतिशय लक्षपूर्वक ऐकतात, त्यामुळे लहान मुलांमध्ये एक उत्तम श्रोत्यांचे सर्व गुण विकसित होतात, त्याचप्रमाणे मुले या गोष्टी आठवून आठवून इतरांना सांगतानाही दिसतात, त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती सुद्धा अतिशय तल्लख होते.

निष्कर्ष:

मित्रांनो आपण लहानपणापासून वाचत आणि ऐकत आलेल्या अकबर बिरबलाच्या गोष्टी या काही लोकांच्या नुसार काल्पनिक तर काही लोकांच्या नुसार सत्य घटनेवर आधारित आहेत. मात्र या सगळ्या पलीकडे आपण त्या गोष्टींचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. लहान मुले ही कुठलेही ज्ञान लवकर आत्मसात करतात, आणि भविष्यात त्यांचे व्यक्तीत्व देखील त्याच प्रमाणे घडत असते.

लहानपणीच मुलांना चांगल्या गोष्टींचे धडे मिळाले तर पुढे जाऊन मुले हुशार तल्लख आणि सुसंस्कारी होण्यात मदत होते. आणि अगदी त्याचप्रमाणे अकबर बिरबलाच्या गोष्टी देखील मुलांना बुद्धीच्या चातुर्य,  सतसत विवेक बुद्धी, हजरजबाबी पणा इत्यादी गुण शिकवतात. त्यामुळे या गोष्टी काल्पनिक असो की सत्य लहान मुलांसाठी अतिशय चांगल्या आहेत.

Birbal Gela Swargat - Akbar Birbal Marathi Goshti | Marathi Story For Kids | Chan Chan Goshti

Presenting Akbar Birbal Marathi Goshti "Birbal Gela Swargat" Marathi Goshti (Marathi Story For Kids, Chan Chan Marathi Goshti) which you and your Kids will l...

FAQ

अकबर बिरबल गोष्टीतील अकबर म्हणजे कोण?

या गोष्टींमधील अकबर म्हणजे मोगल अकबर बादशहा होय.

बिरबल कोण होता?

बिरबल हा अकबर बादशहाच्या दरबारातील एक नामांकित पंडित होता.

अकबर बिरबल च्या गोष्टी कुठे वाचायला मिळू शकतात?

अकबर बिरबल च्या गोष्टींची अनेक पुस्तके बाजारात मिळतात, त्याचप्रमाणे आजच्या ऑनलाईन युगात तुम्ही या गोष्टी इंटरनेटवर देखील वाचू शकता.

अकबर बिरबल च्या गोष्टी कोणत्या प्रकारातील आहेत?

या गोष्टी बोधपर गोष्टी या प्रकारात येतात.

प्रश्न५. अकबर बिरबल या गोष्टी कोणत्या वयोगटातील मुलांसाठी उत्तम आहेत?

अकबर बिरबल या गोष्टी वय वर्षे चार ते आठ – नऊ या वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम आहेत.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण लहानपणापासून वाचत ऐकत आलेल्या अकबर बिरबलच्या गोष्टींबद्दल माहिती पाहिली. या माहितीबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तसेच आपले इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा ही माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment