वायु प्रदूषणची संपूर्ण माहिती Air Pollution Information In Marathi

Air Pollution Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो मानव हा प्राणी सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र सुरुवातीच्या काळात बुद्धीच्या जोरावर मानवाने केलेली प्रगती मात्र आता त्याला अधोगतीकडे घेऊन चालली आहे. कारण त्यांनी लावलेले विविध शोध पर्यावरणास हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे वायु प्रदूषण होय.

Air Pollution Information In Marathi

वायु प्रदूषणची संपूर्ण माहिती Air Pollution Information In Marathi

वायु प्रदूषण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ताज्या हवेमध्ये इतर प्रकारची दूषित हवा, धुलीकण, सेंद्रिय पदार्थांचे बारीक रेणू, आणि धोकेदायक पदार्थ मिसळणे होय. यामुळे अनेक प्राण्या पक्षांसह मानवाला देखील नवनवीन रोगांचा सामना करावा लागत आहे.

वायु प्रदूषण ही आजकालची सर्वात मोठी समस्या आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण हे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असताना त्याला रोखण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही, लोक कितीही सांगून देखील सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याऐवजी खाजगी वाहनालाच प्राधान्य देताना दिसतात.

आजच्या भागामध्ये आपण वायु प्रदूषण म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत…

नाववायू प्रदूषण
स्वरूपहवेमधील घातक पदार्थांचे प्रमाण वाढणे
कारणेवाहने, कारखाने, रासायनिक उत्पादने इ.
उपायवायू प्रदूषण होणाऱ्या ठिकाणीच रोखणे
परिणामरोग, धुके, कमी दृश्यमानता इ.

मित्रांनो, सजीवाच्या मूलभूत गरजांमध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे प्राणवायू होय. आणि हा प्राणवायू आपल्याला हवेतूनच मिळत असतो, मात्र वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवेतील प्राणवायूची जागा इतर विषारी घटकांनी घेतलेली आहे. त्यामुळे आपण श्वसन करत असताना हे वायू आपल्या शरीरात जातात, आणि श्वसना संबंधातील आजार निर्माण करतात.

मित्रांनो, तसे पाहायला गेले तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढणे हे देखील प्रदूषण म्हटले जाऊ शकते, कारण हवेमध्ये कुठल्याही घटकाचे प्रमाण वाढणे ही प्रदूषणाचेच लक्षण असते. मात्र आजकाल प्राणवायूचे प्रमाण वाढण्याऐवजी हवेमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड सारखे विषारी वायू, धुलीकन, विविध घातक रसायनांची वाफ, आणि सेंद्रिय पदार्थांचे वाफ इत्यादींचेच प्रमाण वाढलेले आहे.

वायु प्रदूषणाचे विविध प्रकार:

१. कण प्रदूषण:

मित्रांनो, ज्यावेळी विविध पदार्थांचे कण हवेमध्ये तरंगत्या स्वरूपामध्ये राहतात, त्याला कण प्रदूषण असे म्हटले जाते. या कनांमध्ये राख, मातीची धूळ, किंवा रासायनिक पदार्थांचे कण इत्यादींचा समावेश होतो. या प्रदूषणाला इंग्रजी मध्ये पार्टीक्युलेट पोल्युशन असे म्हटले जाते. इतर प्रदूषणाच्या तुलनेत हे प्रदूषण थोडेसे कमी घातक स्वरूपाचे असते.

वायु किंवा गॅस प्रदूषण:

मित्रांनो, मानवाच्या रोजच्या जीवनामुळे अनेक वायू निसर्गात सोडले जातात, ज्यामध्ये फ्रिज किंवा एसी मधून निघणाऱ्या वायूंचे आणि नत्र युक्त पदार्थ जाळल्या नंतर तयार होणाऱ्या विषारी वायूंचे समावेश होतो. हे प्रदूषण बऱ्याचदा घातक देखील ठरू शकते. हवेमध्ये मिसळणारे वायू किती विषारी आहेत, यावरून त्याची घातकता ठरत असते.

रासायनिक वायू प्रदूषण:

मित्रांनो, आजकाल अनेक उद्योग व्यवसायांच्या स्वरूपात मानवाचा रासायनिक वापर वाढला आहे. विविध कारखाने नवनवीन रसायने तयार करतात, त्यातून अनेक विषारी वायू वातावरणात मिसळत असतात, शिवाय या विविध रसायनांची वाफ किंवा त्यातील बारीकसे घनपदार्थ हवेत तरंगतात, आणि हवेत तसेच राहून त्यापासून प्रदूषण तयार होते. हा देखील एक घातक वायू प्रदूषणाचा प्रकार आहे. आणि वायु प्रदूषणामध्ये सर्वाधिक प्रमाण याच प्रदूषणाचे आढळते.

धूर आणि धुके:

मित्रांनो, धूर आणि धुके हे विषारी किंवा घातक नसले, तरी देखील वातावरणात एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाले तर प्रदूषण निर्माण करत असतात. धूर हा कुठलेही पदार्थ जाळल्या नंतर तयार होणारा, तर धुके किंवा स्मॉग हा पाण्याची वाफ किंवा वायुरूप पाणी हवेमध्ये वाढल्याचे लक्षण आहे.

यामुळे मानवाला गुदमरल्यासारखे होते, तसेच दृश्यमानता देखील फारच कमी होते. परिणामी अपघातांचा धोका देखील वाढतो. तसेच या प्रकारचे प्रदूषण पिकांसाठी देखील घातक समजले जाते. ज्यामुळे पिकांवर रोग किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.

वायु प्रदूषणाची कारणे किंवा स्त्रोत:

मित्रांनो, अनेक कारणांमुळे वायू प्रदूषण होत असले, तरी देखील नैसर्गिक कारणे जसे की, ज्वालामुखीचा उद्रेक, धबधब्यांमधील पाणी, जंगलामध्ये अचानक लागलेला वनवा, समुद्रकिनाराच्या मिठाचे वाऱ्याच्या साह्याने हवेत उडणे, किंवा धुके; तसेच मानवनिर्मित कारणांमध्ये कुठल्याही गोष्टी जाळणे, किंवा इंधन जाळणे, वाहने वापरणे, विविध गॅझेट मधून सुटणारे वायू, कारखाने इत्यादी कारणांचा समावेश होतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला अनेक बोधकथा सांगितल्या जातात, त्यामध्ये अति तेथे माती ही बोधकथा आपल्याला ठाऊकच असेल. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो घातकच ठरतो, प्रदूषण म्हणजे तरी काय तर ज्या ठिकाणी, ज्या पदार्थांचे, जेवढे प्रमाण असायला हवे त्यापेक्षा ते वाढणे म्हणजेच प्रदूषण होणे होय. जसे की हवेमध्ये उपयुक्त घटकांच्या तुलनेत घातक घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणे, म्हणजेच हवा प्रदूषण. तसेच पाणी ध्वनी इत्यादी प्रदूषणाचे देखील आहे.

आज मीतिला आपल्याकडे प्रदूषणावर मोठमोठी भाषणे दिली जातात, त्याची उपाययोजना सांगितली जातात, तसेच प्रदूषण कसे घातक आहे, आणि आपण त्यावर कशी मात करू शकतो याबाबत ही माहिती दिली जाते. आणि थोड्यावेळाने भाषण देणारी व्यक्ती आणि आयोजक स्वतः प्रदूषण करत खाजगी वाहनाने निघून जातात. त्यामुळे “बोलाचीच कढी, आणि बोलाचाच भात” अशी परिस्थिती झालेली आहे.

जोपर्यंत प्रत्येक नागरिक स्वतःहून पुढाकार घेऊन या प्रदूषणाविरोधात उभा ठाकणार नाही, तोपर्यंत कुठलाही देश किंवा हे संपूर्ण जग प्रदूषण मुक्त होईल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्यामुळे तुमच्या माझ्या सह प्रत्येक नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून प्रदूषणाविरुद्ध उपाययोजना नाही केल्या, तरी किमान प्रदूषण होणार नाही किंवा कमीत कमी प्रमाणावर होईल इतकी तरी खबरदारी घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्या भावी पिढ्यांच्या सुखकर जीवनासाठी फायदा होईल.

FAQ

आपण आपल्या घरगुती स्तरावर वायू प्रदूषण कसे कमी करू शकतो?

प्रदूषण निर्माण करणारे इंधन वापरणे किंवा धूर निर्माण करणाऱ्या गोष्टी जाळणे टाळून नवीकरणीय ऊर्जेचा वापर करणे, आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे इत्यादी गोष्टी करून आपण घरगुती स्तरावर वायू प्रदूषण कमी करू शकतो.

वायु प्रदूषणामध्ये हातभार लावणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता?

वायु प्रदूषणामध्ये हातभार लावणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे इंधनाचे ज्वलन करणे होय.

वायु प्रदूषण म्हणजे नेमके काय आहे?

हवेमध्ये घातक पदार्थांचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त होणे म्हणजे हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण होय.

वायु प्रदूषणाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो?

विविध प्रकारचे आजार, रोग किंवा फुफ्फुसाच्या विकाराच्या स्वरूपात मानवी जीवनावर वायू प्रदूषणाचा परिणाम होतो.

आजच्या गतीने जर वायू प्रदूषण वाढत राहिले तर काय घडू शकते?

जर ह्याच गतीने वायू प्रदूषण वाढत राहिले तर २०५० पर्यंत पृथ्वीचे सर्वसाधारण तापमान हे चार ते पाच अंशाने वाढेल, म्हणजेच जवळपास ते ५० ते ५२ अंशाला शिवेल. परिणामी हिमनद्या वितळून पृथ्वी या ग्रहाच्या नाश होईल.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वायू प्रदूषण अर्थात एअर पॉल्युशन याबद्दल माहिती पहिली. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येकाने प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण प्रदूषण कमी करण्यासाठी काय काय उपाय योजना करता ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. आणि सांगूनही प्रदूषण कमी न करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment